श्री
श्री
परिस्थितीचा योग्य अर्थाचा आकलन करणे. *योग्य अर्थ होणे* , हा प्रवास आहे सत्य ओळखत राहण्याचा. ह्याला प्रवास म्हणायला हवा.
मूळ संकल्पना जी आहे परिस्थितीची, ती अस्तित्व भावाशी निगडित असते. ज्या प्रकारे वासना, स्पंदन, संबंध होत राहतात त्या शक्तित, त्या प्रमाणे स्थळ, काळ, क्रिया आणि परिस्थितीशी नाते आपले होते. "मी" देखील परिस्थितीच आहे, जी अनंत प्रवासात आहे, आणि जी अनंत संस्कार घेऊन आलेली आहे.
आपण जीव आहोत. ती एक अस्तित्व शक्तीची स्थिती आहे. जसे स्पंदने शुद्ध होतात, तसे सर्व संबंध, जाणीवा, क्रिया, परिणाम शुद्ध होत जातात. शुद्ध म्हणजे विशाल, सूक्ष्म आणि सर्वांमध्ये असणारा दुवा. आपल्याला अस्तित्व "संबंध" ह्या पद्धतीने समजत जाणार आहे, सत्य आहे की नाही, हे आत्ता कळणे अवघड.
म्हणून भगवंताशी संबंध जोडावे, त्या शक्तीशी संबंध जोडणे.
दररोजच्या जाणिवेत किंव्हा व्यवहारात आपण खूप स्वार्थी आणि विघटित वावरत असतो. हे कबुल करावे. म्हणजे भीती कुठून येते आणि ती कशी प्रकट होते, ह्याचे थोडेतरी भान व्हायला लागते. भीती आहे, ह्यात कबूल करायला काही न्यूनपणा नाही. ममत्व त्यामुळे प्रकट होते, हे ही कबूल करावे. ते नैसर्गिकही आहे. भगवंताची इच्छा आहे, तर त्याचे स्थान असणारच. फक्त त्यात अडकू नये, त्याला सर्वस्वी मानू नये. दृश्यात कुठलीही गोष्ट स्थिर आणि पूर्ण भाव प्रकट करत नाही आणि ती आपल्या मनाचा आरसा दाखवते. जसे आपले मन, तसे दृश्याचे रूप आणि आकार. ते बदलणार, वेगळे भासणार, तात्पुरते राहणार आणि प्रतिक्रियात्मक राहणार. त्यात आपण का आणि किती गुंतवून घ्यावे स्वतःला?! हा प्रश्न आहे. तो प्रश्न योग्यच आहे.
त्या प्रश्नाच्या उत्तराचा शोध म्हणजे नामस्मरण.
हरि ओम.
श्री
आपण चक्रासारखे गोष्टी आत ते बाहेर ते आत घडवत असतो. त्याचे आकलन होणे महत्वाचे. म्हणजे "मी" हा भाव रेषेसारखा न राहता, चक्र सारखा जाणवायला हवा. म्हणजे गोष्टी येत राहणार, वावरणार, बदलणार आणि निघून जाणार आणि ते संबंधितही असणार - ह्याचे आकलन होणे महत्वाचे. आज मी इथे आहे , तो काही पहिल्यांदा नाही आलो. आज, हा क्षण देखील परत, परत येतो. माझ्या भोवतालच्या व्यक्तींशी संबंध काही पहिल्यांदा असे रूप नाही घेत, ते संबंध युगानुयुगे चालून आलेले आहेत. दृश्य आकार बदलेल, पण आतील संबंधांचे रूप तसेच असते.
हे जाणवणे आले. तसे झाले, की आपण काय करायला आलो आहे, काय करायला हवे आणि कार्य कसे करायला हवे, ह्या बद्दल विचार करू शकू. त्या गूढ प्रवासासाठी नामस्मरणात सतत राहणे.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home