श्री
श्री
अस्तित्व कायम असल्यामुळे त्याच्या कुठल्यातरी प्रकट होणाऱ्या स्थितीशी मन तैय्यार होतं. म्हणजे सर्व कार्य अस्तित्व शक्तीच करते आणि ते मनाचे रूप घेते, पण ते घेत असताना त्या रूपाचे स्मरण वेगळे होते. त्या स्मरण शक्तीच्या बळावर त्या जीवाला किंव्हा त्या आकाराला स्वतःचा अर्थ आणि दृश्यांची व्याख्या भासते. तरीही हे सांगत असताना बरेच मोठे टप्पे मांडले आहेत.
कापूस जसा वेगळा करून एक, एक धागा वेचून काढू शकतो, त्यातली गत ह्या टप्प्यात सुद्धा आहे. म्हणजे सूक्ष्म पातळी पर्यंत जाणे आले आणि वरचे विधान त्या सूक्ष्म पातळीत बघणे आहे. त्या सूक्ष्म पातळीत पोहोचल्यावर, सर्व शक्तीचे कार्य - हेतू, साखळी, संबंध, भाव, चक्र - जाणून येते. ते जाणण्याचा परिणाम म्हणजेच शांत होणे. किंव्हा शांत होत राहण्याची क्रिया म्हणजेच जाणणे.
संबंध आणि कृती हे विघटित स्मरणामुळे भास निर्माण करते आणि हालचाली करायला भाग पाडते. हे सारे स्तर ओलांडून सूक्ष्म झालो, की दृश्याचा पगडा ढिला होऊ पाहतो.
हरि ओम
0 Comments:
Post a Comment
<< Home