श्री
श्री
स्मरण कशाचे असते? त्यातून काय धरलेले जाते आणि काय सोडलेले जाते? त्यातून कुठले स्तर निर्माण होते आणि त्यातून कुठले भाव होते? म्हणजे स्मरणातून खूप क्रिया आणि वेगवेगळ्या भावनांचे संबंध प्रकट होत राहतात.
आज जेव्हा मी एक फोटो झाडाचा पहिला एक व्यक्तीने पाठवलेला, तर तो आकार बघून कसले स्मरण झाले, कुठल्या भावना मनात आल्या? त्या झाडाचे नाव, ते कुठे आले, दिवसाचे किरण, जागा, त्याचे वय, पर्यावरण ह्या बद्दल विचार येऊन क्षणात सर्व विचार परिवर्तित झाले एका गोष्टीवर - आनंद भाव.
तो भाव, सर्व गोष्टी ओलांडल्या, की सर्वांमध्ये असतो आणि ज्यावरून खरे संवाद सर्वांशी होतात. स्पंदन येत राहणार, त्यातून _बदल_ होत राहणार. स्पंदन, जे अस्तित्वाचे कार्य आहे, त्यातून अनेक साखळी मिळून, वृत्तीचा उगम होऊन, स्मरण होऊ पाहते.
बदल कार्य कसे होते, हे जाणवायला हवे. कार्य म्हणजे ते होत राहणार. त्याला का, कधी, कुठे, केव्हा असे प्रश्न विचारणे वेडेपणाचे ठरते. व्यक्ती, स्वभाव, हेतू, संबंध, आकार, भावना, विचार - हे होत राहणार...त्याला घडू द्यावे. कसलाही आकार किंव्हा रुपा बद्दल आपण काहीही म्हणू शकत नाही. ती सर्वस्वी भगवत इच्छा मानावी. सर्वांना शुद्ध भावनेने स्वीकारावे. बदल, परावलंबन, स्थिती, स्तर ह्या गोष्टी राहणार आहे.
खरं तर, आपण स्वतःला घाबरतो आणि स्वतःच्या मर्यादा लपवण्याचा प्रयत्न करतो. स्वतः पासून पळून जाणे अशक्य. त्यापेक्षा स्वस्थ होऊन शांतीने बघा की काय उमटत राहत स्वतः मध्ये. कालांतराने ते उमटण्याचे परिणाम शांतीत रुपांतर होतील.
हरि ओम.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home