श्री
श्री
आपण कप्पे का करतो, हे बघावे. कप्प्यात आपण इतके बुडून जातो, की समोरची हाक देखील ऐकू येत नाही! इतके आपण रूपाला, आकाराला, त्या भावनेला घट्ट पकडून वावरतो! ह्या भावनेचे मूळ कुठे असते आणि ते कसे निर्माण होते, ह्याचे चिंतन करावे.
अस्तित्वात सर्व कार्य होते, स्तर, स्थिती, साखळी, चक्र, भाव, परिणाम, रूप, आकार, हालचाली, गती, बदल वगैरे. हे कार्य खूप विलक्षण आहे आणि त्याला कशाचीही मर्यादा नाही. ते कार्य अनंत रूप आणि आकार घेऊन वावरते, पण मूळ माध्यमाला धक्का लागत नाही! म्हणून कार्य काय समजावे, हे जाणून घ्यावे. इथे जाणे, तिथे जाणे, ताबा मिळवणे, सिद्ध होणे, आकार बघणे, व्यवहार करणे म्हणजे कार्य आहे का? कार्य रुपाशी आणि आकाराशी निगडित असायला पाहिजे का? की ते सर्वांच्या पलीकडे असू शकते?
राग येणे म्हणजे कार्याची सीमा खूप आकुंचित आहे आणि क्षणात जाणीव आहे. शांत असणे म्हणजे कार्याला सीमा अमर्यादित आहे आणि जाणीव सूक्ष्म आहे, अनंत आहे, स्थिर आहे. म्हणून कशामुळे काय होते आणि कुठल्या भावना येतात, ह्याचा जास्ती विचार करू नये. आपण स्थिरतेकडे कार्य करावे, जे योग्य वाटेल ते करावे आणि सर्व फळांचा स्वीकार करावे.
आपल्यासाठी मार्ग कार्यातून आहे आणि कार्य म्हणजे मनाच्या शक्तीवर संस्कार होत जाणे आणि शुद्धतेचा अनुभव येणे.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home