Saturday, July 26, 2025

श्री

 

श्री 

 शांती म्हणजे योग्य संबंध आणि कार्य करणे. काहीही नको, असे होत नाही. कार्य तर राहणारच अस्तित्वात...त्या कारणामुळे/ कार्यामुळे/ स्पंदनामुळे काय होऊ पाहते, हे महत्वाचे आहे. त्याला आपण "भगवंताची इच्छा" असे संबोधले आहे. 

 म्हणजे शांती आपल्याला विचारत, भावनेत, कृतीत आणणे महत्वाचे आहे. जाणीव सूक्ष्म झाली की शांती येते, अंतर्मुख झालो, स्वावलंबित पद्धतीने गोष्टी केल्या, स्थिर झालो, सर्वांसाठी कार्य केलं - की शांती भाव संक्रांत होतो. 

 एका बाजूला स्वतःचे प्रयत्न आहेत, की मनाला अधिक सूक्ष्म कसे करत रहावे. दुसऱ्या बाजूला परिस्थिती स्वीकारणे आहे, की आपण मोठ्या प्रवासात आहोत, ज्यात गनिमी काळापासून असंख्य क्रियेतून आपण "होतो", दृश्यात येतो, व्यवहार करतो. म्हणजे शुद्ध जाणिवेत परिवर्तन होऊन जीवाची जाणीव होते आणि ती व्यवहार करते. त्यातून निष्कर्ष करावे की श्रद्धा का महत्त्वाची असते आणि ती कशी प्रकट करावी. 

 तिसरी गोष्ट ही की स्वतःच्या मर्यादांवर न्यून बाळगू नये, चिडू नये, त्रासिक होऊ नये. स्वतःची वावरण्याची स्थिती स्वीकारावे. कोडी सोडवण्याचा अट्टाहास करू नये. स्वतःचा स्वभाव किंव्हा दुसऱ्यांचा स्वभावातील गुंता सोडवणे कठीण...तो श्रद्धेने स्वीकारला जातो. सिद्ध होण्याचा अट्टाहास असू नये. कर्तव्य करत राहावे. जे होईल त्यातून, ती भगवत इच्छा आहे, असे खरे मानणे. 

 चौथी गोष्ट म्हणजे अनुभवाचे स्थान रेषेपासून ते चक्र होणे योग्य ठरेल. तो जाणीव शुद्ध होण्याचा मार्ग. म्हणजे सर्व काही - ज्याला आपण काल घडून गेलेल्या गोष्टी, आत्ता चे क्षण आणि उद्याची संकल्पना - सर्व एकाच ठिकाणी भेटतात आणि सर्वां मधली विभागणी निघून जाते. The _idea_ of past, present and future dissolves or merges. So it is always a matter of imagination, which we harbour or relate to or create. Imagination is a function of awareness of Being. So a heightened awareness will lead to a corresponding quality of imagination of Being. 

 पाचवी गोष्ट ही की भगवंताच्या कृपेची प्रार्थना करावी.

 

 हरि ओम.

 

0 Comments:

Post a Comment

<< Home