Thursday, July 31, 2025

श्री

श्री 

स्मरणाची उत्तम अवस्था म्हणजे प्रत्यक्ष भगवंताचा भाव. आपण साक्षात भगवंत आहोत, सूक्ष्म आहोत, अस्तित्व आहोत, हे ओळखणे. 

 *स्मरण* , ही संकल्पना, म्हणून गूढ आहे, लवचिक आहे, त्यात बरेच घटक आहेत, त्यात भाव आहे, जाणीव आहे, आणि त्यातून होणाऱ्या क्रिया आहेत, ज्यात संबंध येऊ पाहतात. 

इतर वेळेला आपण कुठल्यातरी स्मरणेच्या स्थितीत असतो, म्हणून त्या प्रमाणे दृश्याशी संबंध ठेवतो आणि त्याचे परिणाम भोगतो किंव्हा अनुभवतो. मग ते स्मरण देहाचे असावे, किंव्हा भावनेचे, किंव्हा बुद्धीचे, किंव्हा वृत्तीचे...त्यावरून रूप आणि आकाराचा अर्थ प्रचितीला येतो. 

अध्यात्माचे म्हणणे आहे, की स्मरण शुद्ध करावे. त्यातून सत्य कळेल आणि ते कळून घेताना विचार आणि भावना बदलून येतील आणि शांती संक्रांत होईल. म्हणजे ही परिवर्तन होण्याची क्रिया आहे.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home