Tuesday, August 12, 2025

श्री

श्री 

कुणीही काहीही करत असतं...मुख्यतः सामूहिक आणि वैयक्तिक वृत्ती असतात. किंव्हा विचारांची मर्यादा भगवंतापासून ते स्थूल देहापर्यंत असते. हा "मी" जो आहे, त्याचा संबंध अथांग शांत माध्यमा पर्यंत असतो, तिथून साखळी प्रकट होत असते आणि स्मरण देते आणि त्यावरून इतर चक्र आणि परिणाम. सर्व अनुभव प्रकट होतात आणि त्यात वावरणे होतं. 

विघटन थांबत नसत आणि कितीही क्षणाचे विघटन केलं, तरी तात्पुरतेपण काही जात नाही - उलट ते अधिक वाढतं, वेगळेपण अधिक वाटतं आणि अजून अस्वस्थ वाटतं. अस्वस्थचा पर्याय शांती भाव प्रकट होण्यात आहे...म्हणजे श्रद्धेने वावरणे. कुठलीही गोष्ट बुद्धीने मुळापासून जात नाही...शांत होणे हा उपाय आहे. 

स्पंदनांचे रूपांतर मन आणि दृश्य ह्यात घडून येते. गोष्टी होणे, असणे, जाणे हा खेळ शक्ती प्रज्वलित ठेवते.  त्याला थांबवणे शक्य नाही, विचाराने सोडवणे शक्य नाही, काहीतरी क्रिया करून त्याचे उत्तर शोधणे शक्य नाही. ही वस्तुस्थिती पूर्णतः स्वीकारावी लागते. त्यात कितीही बदल घडू द्यावे स्थळात, काळात, व्यक्तीत.... ती एक निमित्त किंव्हा एक घटना मानावी, जी होणार आणि जी भगवंताच्या इच्छेने घडणार.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home