Friday, August 15, 2025

श्री

 श्री 


आपण एखादी गोष्ट Focus करतो, म्हणजे सर्व प्रवाहातून ते वेचून काढतो...म्हणजे मोजके घटक घेऊन ते रूपात किंवा आकारात किंवा क्रियेत आणतो. 

ह्याचे बरेच अर्थ निघतात. की ही क्रिया ध्यानात नसेल तर कुठलेही विषय निर्माण होतात आणि त्यात आपण विनाकारण गुंतून राहतो. दुसऱ्यांच्या विषयात संबंधित यावे की नाही, हा पूर्ण हक्क आपल्यापाशी असतो. विषय होणे ही क्रिया तात्पुरती असल्यामुळे, त्यात समाधान नसावे. व्यवहाराच्या पातळीवर हे लक्षात असू द्यावे. वरील क्रियांच्या प्रमाणे विषय इतर घटक घेऊन येतो, जे परावलंबी आणि बदलणारे असते, म्हणून समाधान भाव जागृत होणे कठीण. 

सत्य पहिले तर विषय एकांकित "वाटतो", पण त्याचे पाया मुळे अनेक ठिकाणी पसरले असतात. "वाटणे" ही मनस्थिती आहे, सत्य त्याही पेक्षा निराळे असू शकते. म्हणून विषयावर कार्य करणे थांबत नाही आणि त्यावर आपले अस्तित्व अवलंबून ठेवायचे का, हे बघावे. ह्यातून हेही दिसते की मतभेदात गुंतून राहू नये, दुसऱ्यांना दुजारा देणे किंव्हा नाही, ह्यात काही विशेष तथ्य नाही.  

विषय किंव्हा गोष्ट किंव्हा रूप किंव्हा संकल्पना त्याच्या बरोबर गुंतणारा गूढ भाव प्रज्वलित ठेवतो. तीच "आपली" जाणीव. म्हणून अनुभव गोष्टी पासून ते शांतीकडे परिवर्तित करायला लागते. 

आपण देह नाही, बिंदू नाही, आकार नाही, रूप नाही. आपण वळवळ नाही. आपण स्मरण नाही. 

मग काय म्हणायचे आपल्याला?!

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home