Tuesday, August 12, 2025

श्री

श्री 

विचार आणि भावना एक प्रकाराचे संस्कार रुजू करतात मनात. मन, हे शक्तीचे एक स्वरूप किंव्हा स्थिती आहे, जिच्यात साखळी प्रकट होत राहते आणि भाव निर्माण होतो, चक्र निर्माण करते आणि दृश्याशी संबंध जोडते - द्वैत अनुभव. ह्याने स्मरण तैय्यार होते किंव्हा जाणिवेचे एक _स्वरूप_ (स्वतः बद्दलचे रुपाची कल्पना!). म्हणजे शेवटी सर्व _कल्पनाशी_ निगडित आहे. जशी कल्पना, तसे दृश्याशी संबंध किंवा त्याचा अर्थ. सर्व मनातच घडत आहे! मन काही एक बिंदू नाही की ते देहात असेल किंवा मेंदूत सापडेल...ती अस्तित्वात _वावरण्याची स्थिती आहे_. It is a state of existence, not contained in a body or a brain. आपण मनाला देहाचे संस्कार देतो, म्हणून ते मर्यादित वाटायला लागतं आणि देहाचे सुख, दुःख किंव्हा भोग मन अनुभवत. म्हणजे जशी मर्यादा, त्या प्रकाराचे अनुभव मन प्रकट करते. देहातून मन सूक्ष्म झालं तर अनुभव बदलतील. मग ते देहपुरते मर्यादित राहणार नाही आणि सुख किंव्हा दुःखाची बाधा होणार नाही. 

म्हणून आपण काय बोलतो, ऐकतो, कृती करतो...ह्याने मन घडतं जातं, संबंध प्रज्वलित राहतात आणि त्यातच आपण गुंतत राहतो. कुठून सुरुवात होते, ह्यात पडण्यात तसा काही अर्थ नाही, कारण सर्व हालचालींचे उगम भगवंत आहे आणि त्याचे कार्य म्हणजे अदृश्यातून अनेक रूप, आकार, संबंध प्रकट करत राहणे. 

मन अमर्याद करण्यासाठी/ होण्यासाठी नामात राहणे.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home