श्री
श्री
शांत वाटायला जो मार्ग उचित वाटतो, तो घ्यावा. शांत कालांतराने वाटेल, अधून मधून सुरुवातीला वाटेल. साखळीची चिंता खूप करू नये. साखळीला कसे बघतो ह्यावर सगळ आहे. साखळीला जर अपेक्षाही लादली किंव्हा हेतू, किंव्हा तात्पुरतेपण, किंव्हा वेगळेपण, किंव्हा अट्टाहास किंव्हा अहं वृत्ती...तर चिंतेला आपण आमंत्रण देतो. साखळी कशासाठी असते हे ओळखावे. दृश्य कशासाठी असतं?
ओळखणे - विचार आणि श्रद्धेची सांगड आहे. काही गोष्टी कर्तव्य म्हणून करायच्या असतात, ते हातून घडणार असतात आणि काही गोष्टी भगवंत पर्यंत पोहोचण्यासाठी कारण ठरू शकतात.
कुठलही रूप पूर्ण नसत आणि सर्वस्वीही नसतं. मग त्यात बुद्धी असो की भावना. रूपाला शांत होण्यासाठीचे _माध्यम_ बघावे. It is a tool. I (Existence or consciousness) am _not_ the tool, however. Tool creates, connects, interacts, engages, perceives, remembers, and is triggered by an _intent_.
Interaction is a big umbrella concept, which creates "many" and this "many" causes all sorts of phenomena. त्याला आपण अदृश्य माध्यमातून दृश्य प्रकट होण्याचे कार्य म्हणू आणि परत अदृश्य ह्याच्यात विलीन होणे, असे म्हणू.
ते कार्य कुणाचे असते आणि कश्यामुळे होते? त्याचे उत्तर सांगितले आहे "भगवंत". म्हणजे प्रत्येक जीवाला भगवंताचा अनुभव आत्मसात केल्याशिवाय चैन पडू शकणार नाही.
तो अनुभव सरळ रेषा सारखा संपादन कदाचित होणार नाही. तो गूढ पद्धतीने प्रकट होऊ शकेल. त्या गूढ पद्धतीला आपल्या जीवनात स्थान करण्यासाठी चिंतन आणि श्रद्धेची जरुरी आहे.
हरि ओम
0 Comments:
Post a Comment
<< Home