Tuesday, August 12, 2025

श्री

श्री 

काहीतरी मिळवायलाच हवे म्हणजे सिद्धपणा येईल, ही अपेक्षा असते आणि त्यातून मनाची वळवळ चालू राहते. ती वळवळ शांत करायला लागते. तो मार्ग भलताच गूढ असतो - म्हणजे तो पत्करला की काय मिळेल ह्यावर पूर्ण श्रद्धा वाढवायला लागते. काय केलं की शांती मिळेल, तसे पाहिले तर बौद्धिक विषय आहे आणि त्याच्या पलीकडील स्थिती ही आहे. 

त्या परिस्थितीतून "प्रयत्न" संकल्पना उदयास येते आणि "कृपा" (जी पलीकडील रहस्य दर्शवते). 

आपल्या विचारात दोघांचाही समावेश लागतो. म्हणजे विचार आणि श्रद्धा. विचार करून विवेक बुद्धीचा वापर करावा आणि श्रद्धेला त्याचे त्याचे कार्य करू द्यावे. दोन्ही एकाच वेळेला परिणाम करत राहतात मनावर म्हणून त्यांना स्पर्धा सारखे बघू नये किंव्हा चौकटीत मांडल्यासारखे किंव्हा पहिले काय आणि नंतर पलीकडील काय. किती केले म्हणजे पलीकडील स्थिती येईल, असा विचार फसवा असतो, तो संपतच नाही. म्हणून जे काही आहे, त्यात "समाधान" कसे प्राप्त करावे, हा अभ्यास आहे. 

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home