Friday, August 01, 2025

श्री

 श्री 


भगवंत म्हणजे कोण, हे ओळखणे सध्या आपल्यासाठी अवघड जाते. ते कळून घ्यायला "जाणीव" खूप सूक्ष्म होणे आले. ह्याचा दुसरा अर्थ, की "भगवंत" शब्दाचा काहीही अर्थ असो, तुम्हाला तो अर्थ तुमच्या पद्धतीने अनुभवायचा असतो. तो अर्थ उमगुन घेण्याचा "मार्ग" जो सुचविला आहे, तो म्हणजे नामस्मरण. त्याने मन सूक्ष्म होते आणि तसे परिवर्तन होण्यामध्ये अर्थ प्रचिती आहे. 

वेगळ्या पद्धतीने सांगायचे झाले, तर आपल्यात _साखळी_ कशी होते, हे बघावे. साखळीचा भाव कुठला असतो, तो प्रवाहात असतो का, तो बदलत राहतो का, तो इतर गोष्टींवर अवलंबून असतो का, त्याची सवय होते का, तो भावना जागृत ठेवतो का - ह्या सर्व गोष्टी जाणून घेणे होय. 

साखळीला प्रतिक्रिया देण्याचा मोह टाळता आला, तर शांती भावाच्या अनुभवाकडे आपण जाऊ शकतो.  

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home