Saturday, October 11, 2025

श्री

श्री 

गोष्टींचे येणे, दिसणे, वावरणे, निघून जाणे, संबंधित राहणे, परत वेगळ्या रूपात भासणे, हे चालू राहते अनुभवात. कुठून येतात, का येतात, कसे येतात, कसे बदलतात आणि कुठे जातात, हे गूढ प्रश्न आहेत, ज्यांचे उत्तर अनुभवात परिवर्तन होत उलगडले जातात. 

सगळ्याच गोष्टी यायलाच हव्या एका विशिष्ठ पद्धतीने, विशिष्ठ वेळेस - ही खूप मोठ्ठी अपेक्षा आहे, जी खूप त्रासिक ठरू शकते आपल्याला. आपला "हेतू" गोष्टींवरून (स्थळ आणि काळाचा परिणाम) ठरवू *नये*. म्हणजे स्थिर व्हावे. पलीकडे व्हावे. शांत व्हावे. निरहेतू किंव्हा सूक्ष्म व्हावे. तो मार्ग कुठल्याही स्थितीत, कुठल्याही साखळीतून, कुठल्याही संबंधातून, कुठल्याही गोष्टीतून साकार होऊ शकतो. ह्याचाच अर्थ असा की शांती भाव कशातही संक्रांत होऊ शकते, किंव्हा पलीकडे होण्याची क्रिया कुठल्याही परिस्थितीतून घडू शकते. 

म्हणून परिस्थित, गोष्टी, बदल, साखळी - ह्याचे फारसे महत्त्व नाही किंव्हा हेतूवरून ह्या गोष्टींची पारखणी करू नये, किंव्हा हेतू विलीन होऊ देणे. 

अजून एक अर्थ असा आहे, की जी काही साखळी निर्माण होते, ती संपूर्ण स्वीकारणे आणि ती क्रिया स्वीकारणे आणि त्यातून संबंध शुद्ध करत राहावे. सगळ्याच गोष्टी "समजून" घेण्याच्या नाडी गरज नसते, कारण त्या गोष्टी ध्यानी असायला हव्यात, असे काहीही नाही. भगवंत आपल्या जे कळून घ्यायचे असते, तेवढेच तो योग्य वेळेला देत असतो. आपल्याला ध्यानात त्याच गोष्टी येतील, ज्या पाठवला गेल्या आहेत किंव्हा ज्याची हाक मारली गेली आहे, इतर गोष्टी ध्यानी येणार नाहीत. गोष्टी आपल्या वृत्तीवर निर्माण होतात - त्याचे अस्तित्व वृत्तीवर असते. वृत्ती शुद्ध झाली की तसे संबंध अनुभवात येतात. 

म्हणून शांतीचे ध्यान नेहमी करावे.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home