Monday, October 20, 2025

श्री

 श्री 


खऱ्याचा आणि कृत्रिम संकल्पनेचा स्वभाव असतो. त्या प्रमाणे *मानण्यावर* त्या संकल्पनेची क्रिया होते, त्याची साखळी होते, भाव होतो आणि हालचाली होतात आणि परिणाम होतात. मनाच्या धरण्यावर, हालचालींवर, एखादी संकल्पना पूर्णपणे आत्मसात केली जाते आणि त्याप्रमाणे मनावर संस्कार होत राहतात...

१) कृत्रिम स्थळ आणि काळ , किंव्हा virtual environment, त्याचा एक स्वभाव असतो. त्यात गुंतून राहिल्यामुळे तोच स्वभाव आपले मन धारण करते आणि तश्याच समजुती, संकल्पना, विचार, भावना घडतात आणि त्या प्रमाणे इतरांशी आपण व्यवहार करतो. 

२) ज्या स्थळात आणि काळात आपण वावर करतो, (real space and time), त्याचाही _स्वभाव_ असतो आणि त्यावरून स्मरण आणि व्यवहार होते इतरांशी. 

(१) आणि (२) हे भिन्न गोष्टी आहेत. मूळ प्रश्न असा आहे की नुसती पिढी बदलत नाही, तर त्या पिढींची मूलतः भाषा (१) का (२) ह्यातून त्यांचा व्यवहार होत आहे आणि म्हणून दोन पिढींच्या संवादाना अधिक _प्रश्न_ उद्भवणार आहेत. 

प्रश्न कोडे असतात का? हा आणखीन आध्यात्मिक प्रश्न झाला. प्रश्न कशावर अवलंबून असतात का आणि कशासाठी?! मग मूळ प्रकार काय असतो? कदाचित आध्यात्मिक मार्गातून वरील समस्यावर प्रकाश टाकला जाऊ शकतो. 

तसे पाहिले की "मी" ह्या संकल्पनेतून खूप साऱ्या क्रिया आणि अपेक्षांचे डोंगर रचले जातात.  त्यातून जे काही चक्र आणि परिणाम होतात, त्याने पदरी कष्ट होतात. मग मूळ प्रश्न "मी" ह्या संकल्पनेवर, जाणिवेवर येतो. ती जाणीव शुद्ध केली तर अनुभव कसा असावा?! 

करून बघावे!

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home