Saturday, October 11, 2025

श्री

 श्री 


सर्वात महत्त्वाचे शिकवण हे असावे की एखाद्या विषयाचा अभ्यास करो किंवा तो सोडून दुसऱ्याचाही करो, भगवंत सगळीकडे कार्य करत असतो. ह्याचा सर्व व्यापी अर्थ असा आहे की सगळं ठीकच होत असते आणि आपण शांत रहावे. एकाच विषयाकडे सारखे लक्ष द्यावे, ह्याने प्रश्न सुटतील असे नाही. 
जेव्हा सुटायचे असतात, ज्या परिस्थितीत, ज्या साखळीत, ज्या स्थानात, ज्या काळात, ज्या कृती करताना - तेव्हा ते प्रश्न सुटतात. म्हणजे प्रश्न कुणी नाकारत नाही, पण ते का असतात, कसे वावरत राहतात, कशात दडलेले किंव्हा पसरलेले असतात आणि कसे सुटतात - हे भगवत कार्यावर निर्भर आहे. म्हणजे प्रश्नांचे सोडवणे मानवी भूमिकेवर स्थित नसते, ते जाणिवेशी किंव्हा सूक्ष्म प्रकृतीशी निर्भर असावे. म्हणून त्यांना स्थळ आणि काळाची अपेक्षा घालून चालत नाही. 

स्थळ आणि काळाच्या अपेक्षांचे कवच बाजूला करणे स्मरणात, म्हणजेच शांत आणि सूक्ष्म होणे, भगवंताचे होणे. 

वरील गोष्टीचा सामान्य व्यवहारात असा अर्थ निघतो की गोष्टींच्या असण्यावर (होणे, वावर, जाणे आणि संबंधांचे कार्य) टीका करू नये किंव्हा दोष देऊ नये किंव्हा त्रासिक होऊ नये. एखादी गोष्ट अशी का सामोरे येते, आत्ताच का येते, अशा रुपात का येते, असे विचार मनात का आणते, अशा प्रक्रिया करायला भाग का पाडते - हे शांतीने स्वीकारावे आणि कार्य करत राहावे. 

लोकांच्या हेतूवर बुद्धीने विघटन करू नका, कारण त्याने समाधान मिळतेच असे नाही. हेतू तर अस्थिर स्वभावाचा असतो, म्हणून एकात एक रंग मिसळून ज्याची प्रचिती होते ते असमाधानी ठेऊ शकते! 

म्हणून अंतर्मुखाच्या स्वभावाने जग अनुभवा. आपण जग देह, भावना, बुद्धी ह्याने अनुभवतो, म्हणून तसे परिणाम भोगतो. आत्मा द्वारे जग अनुभवता आले, तर शांती भवनाचे दर्शन होईल.

हरि ओम.



Shree 

Above writing suggests an important place of " internalisation" of a phenomenon or a situation. चक्र किंव्हा आत ते बाहेर ते आत असा संबंध, जो गूढ असतो, त्याला internalisation म्हणायचं. ह्या संपूर्ण साखळीवर जाणीव असते. 

ह्याचा अर्थ की दोन निराळे जगाचे अनुभव असतात, जे संबंधित असतात, पण ते संबंध गूढ असतात आणि बुद्धीच्यात सामावलेला नसतात. म्हणून श्रद्धा लागते, तरच त्या साखळीचा त्रास करून घेत नाही आपण. 

विचार मांडण्याच्या क्रियेत, दृश्याचा स्वभाव सूक्ष्म स्थितीवर लादला जातो. तसे केल्यावरच सूक्ष्म स्थिती स्थूलात मांडतात येते आणि तसे केल्यावर हालचाली आणि परिणाम होतात. 

Herein there is a dilemma. Is it necessary to express the unmanifested? The answer to be learnt is "no"! and in this learning, the journey becomes personal or beyond description. Therefore to accept and move beyond this dilemma, again, inculcating trust  becomes important.

Hari Om.

0 Comments:

Post a Comment

<< Home