Saturday, October 18, 2025

श्री

 श्री 


 *अस्तित्वात वावरणे* ही विलक्षण गोष्ट आहे. तिला स्वीकारण्यात काळ जातो. स्वीकारणे ही देखील मोठ्ठी क्रिया असावी, प्रवास असतो, मार्गाचा शोध असतो, अनुभव असतो, भाव असतो, द्वैताचे स्तर असतात, साखळी असते, अंतर्मुख होणे असते, *कार्य* समजून घेणे असते, चिंतन करणे असते, माफ करणे असते, शंका घेणे असते, श्रद्धा घेणे असते, भोग अनुभवणे असते, शांत राहणे असते, परिस्थितीचा अर्थ ओळखणे असते, टप्पा असतो, प्रमाण असते. 

आपण, ही संकल्पना काय आहे, हे ओळखणे आले. मी काय, तुम्ही काय, नाती काय, आपले कोण, वगैरे हे अनुभव संक्रांत होतात स्मरणात, त्यांचे परिणाम होतात मनात, तसे क्रिया आपण करत राहतो आणि परिणामांना सामोरे जायला लागतं. हे चक्र आहे. मुळात चक्राचा सूत्रधार कोण आहे, ही क्रिया का होते, हे कार्य का असते, ह्याचा शोध हा मार्ग दाखवतो. 

आज एक आहे, तर उद्या दुसर काही. परिस्थिती सतत बदलत राहते, तर धरण्याची प्रवृत्ती का असते?! 

धरणे ही क्रिया का प्रकट होते, काय होते आणि त्यात परिवर्तन कसे होते? हेच अस्तित्वाचे स्तर, की धरल्यामुळे (ह्या गुणामुळे) *प्रकट होणे* होणार आणि *विलीन होणे* हे ही होणार. *दोन्ही गोष्टी एकाच अस्तित्व* गुणातून होत राहतात, म्हणून अस्तित्व कायम असले पाहिजे. जे कायम असते, त्या अनुभवाला "सत्य" असे संबोधित केले गेले आहे. 

बऱ्याच वेळेला हा प्रश्न असा असू शकतो, की वरील गोष्टी कळल्यामुळे त्याचा "उपयोग" व्यवहारात तातडीने करता येईल का - साखळीमुळे निर्माण होत असलेले *कोडी* सोडवण्यासाठी?! एका अर्थी हा प्रश्न महत्वाचा आहे. त्याचे उत्तर म्हणजे *शोध*. उपयोग होत असावा, पण गूढ पद्धतीने व्हावा,  म्हणजे भगवंत ठरवेल. हा प्रश्न स्वतःसाठीचा आहे, तो जाणून घेण्याचा आहे. हरिपाठ - "तळ हातावरील आवळा ठेवण्यासारखा" भगवंताचा अनुभव असतो. 

कुणावर काही परिस्थिती येईल, प्रारब्ध कसे असावे, हालचाली कशा होतील, हे शांतीने जाणून घ्यावे. हेतू शोधू नये, त्याचा उपयोग होत नाही आणि उगाचच बेचैनी प्रज्वलित राहते. इथे हेतू म्हणजे भगवंताची जाणीव खूप पुसत ठेवून व्यवहार करणे. जाणीव कशी शुद्ध होते, तसा व्ययक्तिक हेतू अर्थातच मावळतो. ते मावळला, की सुख किंव्हा दुःखाचे हालचाली, परिस्थितींचा परिणाम हे सर्व मनातील चिकटलेले अनुभव गळून पडतात. 

नामात रहाण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू ठेवणे.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home