Monday, October 13, 2025

श्री

श्री 

प्रपंचाचे अनुभव प्रवाह सारखे येत असतात. म्हणजे गोष्टी येणे, वावरणे, विलीन होणे हे स्थित असते. त्याच क्रियेत आपलेही एका पद्धतीचे, त्या परिस्थितीशी एकरूप होत, हालचाली अनुभवात येतात आणि "मी" ह्या भावनेची जाणीव प्रज्वलित राहते. मी देह पुरता मर्यादित नसून, विशाल आणि सूक्ष्म असतो आणि बऱ्याच *स्थितींशी संबंधित* असतो आणि *त्याच्या कार्यामुळे प्रकट झालो असतो*. 

म्हणून येणारे अनुभव अस्तित्वातील अनेक स्तरांच्या कार्यामुळे प्रकट होत असतात आणि बदलत असतात. आपले कार्य हे, की ते दिव्य कार्य ओळखावे, ध्यानात आणावे.  

काहीतरी कृती करणे भाग आहे आपल्याला आणि चक्र अनुभवात येत राहणे, हे ही आहे अनुभवात. कृतीशी आपले नाते शुद्ध करत राहावे आणि त्यासाठी नामाचा उच्चार सतत करत राहावे. अनुभवाच्या हेतूची चिकित्सा करू नये, त्याने व्याकुळ होऊ नये, अनुभवांचे प्रयोजन अडवू नये, त्यात स्वार्थी हेतू मिसळू नये. *अनुभव दैवी कार्यातून उद्भवते.*

हरि ओम.


श्री 

पूर्णत्व कोडी किंव्हा विषयातून येत असते का? सर्व प्रवाह असतो आणि आपण सागरच्या मध्य भागे असतो, जिथे रूपातून किनारा दिसणे कठीण. किनारा दृश्य असेल का? दृश्यात कुठलीही गोष्ट स्थिर नसल्यामुळे त्याचा आधार मिळणे कठीण आणि ते जरी आले, तरी एक दिवस जाणार. म्हणून किनारा दृश्यात दिसला, तरीही त्याचे परिवर्तन दुसऱ्या कशातरी रूपात होणार आणि प्रकरण बदलत राहणार. 

म्हणून येणे आणि जाणे, ह्या हालचालींना अर्थ आपल्या सिद्ध होण्याशी *जोडू नये*. तशी जाणीव होण्यासाठी हालचालींच्या परिस्थितीत नामाची सतत आठवण करत राहावी.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home