Saturday, November 01, 2025

श्री

श्री 

पुढे कधी खंत नको, म्हणून "आत्ता" perfect वागायचे, असे समजून घेणे तसे सरळ नाही किंव्हा तसे वागून चालणारही नाही. 

पुढे काय होईल, ते मला ठाऊक नसतेच कधी, आणि त्यामुळे पुढे फळ काय असेल ह्याच्या आशेवर आत्ताचा क्षण घालवणे, म्हणजे वर्तमानात न राहणे, असे वाटते! 

फळ जे येईल ते स्वीकारावे. आणि अनुभवातून परिपक्वपणा आल्यावर हे ही कळते की येणाऱ्या गोष्टींचे कपडे नवीन जरी भासले, तरी मूलतः प्रकार तोच राहतो! मग रेष बघण्यापेक्षा "चक्र" समजून घेणे योग्य ठरते! 

दुसरी गोष्ट ही की चक्र गतिमान असल्यामुळे साहजिकच ते बदलत राहते, म्हणून धरून राहण्याला कितपत मुल्य द्यावे आपण?! 

तिसरी गोष्ट ही, की जर चक्र गतिमान राहणार आहे, तर त्याला चालना देणारी शक्ती अद्भुत असायला हवी आणि आपल्या पलीकडेही असावी! मग ती का स्वीकारू नये?!! 

थोडक्यात गोष्टी परत येतात, चक्र जाणवतं आणि कधी कधी खंत वाटते. हे अटळ आहे आणि ते अनुभवांचे "परिवर्तन" सुचविते. परिवर्तन होण्यामध्ये खंत, सोडणे, श्रद्धा, हळुवारपणा ह्या सर्व घटक असणार आहेत. तसे होऊ द्यावे. 

काही भावना खूप खोलवरच्या असतात. आणि ते येऊ द्यावे लागतात. जसा थंडपणा आपण थोपवू शकत नाही, तसेच ह्या सर्व भावना आपल्या अनुभवात येणार. हाच आहे मार्ग.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home