Thursday, October 23, 2025

श्री

 श्री 


वास्तव्य जाणवणे "इथे", हा अतिशय महत्त्वाचा भाव असतो. Learning to Dwell...(Heidegger). 

आपण जरी "होतो", तरीही मूळ स्वभाव स्थायी असतो - इथेच असतो. 

मनाचा एक स्वभाव वळवळ करण्याचा आहे, म्हणजे विघटित क्रियेत गुंतून राहण्याचा आहे. त्यामुळे त्या क्रियेचा _परिणाम_, म्हणजे वेगळेपण आणि तात्पुरतेपण आणि अस्थिर भावना, ह्याला सामोरे जाणे भाग पडते. त्यावरून असंख्य रूपे , आकार दृष्टीस येतात, हालचाली भासतात, बदल जाणवतात, परावलंबी प्रतिक्रिया देत राहतो आपण आणि बेचैनी वाटत राहते. असा प्रकार तर आणखीनच AI मुळे किंव्हा virtual environment मध्ये अधिक प्रखर होताना दिसत आहे....वेगवान, त्वरित, व्यक्तित्व/ खाजगी, संबंध तोडणे, सत्याचे भान हरवणे, आपुलकी संपुष्टात येणे, वगैरे असे काही "अवगुण" अंगी आत्मसात करताना दिसत आहेत. 

ह्याची रेष जर आपण मागे वळून बघितली इतिहासात, तर असे दिसून येईल की कुठल्या ना कुठल्यातरी स्वरूपात असा स्वभाव मनात असायचाच. आणि तीच रेष जर स्वतःचा आत डोकावून पाहिली, तर खूप आतील वृत्ती पर्यंत तो भाव प्रज्वलित होताना दिसेल. ह्याचा अर्थ की आपण त्या वृत्तीला "धरून" राहिलेलो आहोत, मग सुधारणा ती कसली?!! 

त्याच पद्धतीने, ह्या वृत्तीला शांत करण्याची विवेक बुद्धी देखील आपल्या आत आणि इतिहासात कायम दिसून येते. संस्कृती, पर्यावरण, सामूहिकता, सहानुभूती, सैय्यम, आपुलकी, समाज भान...असे त्यात संकल्पना दिसून येतात आणि त्यावरून कृती, कलाकृती, नात्यांचे स्वरूप, समाज व्यवस्था असे ही रेखाटन केले गेलेले दिसते त्या त्या काळात. 

वरील दोन्ही गोष्टी आपल्या आत वावरत असतात. आपण होणे म्हणजे विघटन क्रियेला प्राधान्य देणे. भगवंताची आठवण होणे आणि तो मार्ग पत्करणे किंव्हा कर्तव्य करत राहणे, म्हणजे श्रद्धेला आणि शांती भावाला प्राधान्य देणे. त्यातील एक सत्याचा मार्ग आहे, आणि दुसरा कष्टी होण्याचा. 

तसंच, सध्याचा आपले प्रपंचाचे स्वरूप किंव्हा भाव काय उमटतो आहे त्याकडे बघावे. बऱ्याच गोष्टी निसटून जातील, त्यावर आपण काहीही करू शकणार नाही, बऱ्याच गोष्टींचे झीज होण्याला आपल्याला बघत राहायला लागणार आहे, बऱ्याच गोष्टींचे भोग इतरांना आणि आपल्यालाही सामोरे जायला लागणार आहे, बऱ्याच गोष्टींवरून *तरीही* उतावळे होता कामा नये, बऱ्याच गोष्टींसाठी नाईलाज आपला असतो. बऱ्याच गोष्टी सोडून द्यायला लागतात आपुलकीने. बऱ्याच गोष्टी येऊ द्यायला लागतात, वावरू द्यायला लागतात आणि निघून द्यायला लागतात. 

असे सारे शांतीने आत्मसात करायला लागते. एका अर्थी चांगलच आहे की आपल्याला पर्याय नसतो, त्या अंतिम सत्याचा. त्यावरूनच सत्य आत्मसात होते, असे दिसत आहे. 

Acceptance of vulnerability is the biggest strength. Admittance of the same, is being very honest or truthful. 

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home