श्री
श्री
सगळ्या गोष्टी विचारातून कळतील का, हे माहित नाही.
आपले रूप अनेक क्रियेतून होते, म्हणून सर्वांगीण जाणवणे आले. किंबहुना जाणीव क्रिया सर्व स्तरात पसरलेली असते किंवा सर्व स्तरात स्थित असते, म्हणून सर्व साखळीच्या घटकांचा आधार लागतो (perception is wholistic and not a point or not located at a single location), एखादी गोष्ट "पूर्ण" समजून घेण्यासाठी. म्हणजे "गोष्ट" देखील सर्व साखळीत स्थित असते, फक्त दृश्यात नाही! किंव्हा गोष्टींचे "गुण" सूक्ष्मापासून ते स्थूलपर्यंत प्रकट होत असतात! म्हणून गोष्ट "कशी आहे आणि तिचे वर्तन कसे आहे" त्यासाठी गूढ जाणीव व्हायला लागते, तिथे फक्त मर्यादित स्थूल बुद्धी वापरून चालत नाही.
ह्याचा दुसरा अर्थ असा ही होतो की सर्व घटकांच्या संबंधातून एक बिंदू म्हणजे बुद्धी. म्हणजे बुद्धी देखील तिचे रूप आणि गुण सर्व घटकांच्यातून घेते...ती स्वतंत्र नसते! म्हणून सर्व घटक एकमेकात गुंतले असल्यामुळे तात्पुरते, बदलणारे, अस्थिर वागतात. त्यातून म्हणून परिस्थिती तशी भासते, आणि कशाचाही तसा पूर्ण आधार मिळणे कठीण.
तिसरी गोष्ट अशी की ह्या सर्व साखळीचा परिणाम प्रत्येकात वेग वेगळ्या पद्धतीतून उमटत असतो. तो एकाच पद्धतीने सुरू करावे आणि शेवट व्हावा, असा अट्टाहास सोडून द्यावा...म्हणजेच की एकाच पद्धतीने जगाकडे बघावे, अशी समजूत योग्य नाही.
चौथा अर्थ असा की प्रत्येकाचे प्रश्न वेगळ्या रूपाचे निर्माण होतात आणि त्याचे उत्तर त्याला स्वतःच्या मार्गातून कालांतराने उमगतात. म्हणून दुसऱ्यांना दोष देऊ नये, सैय्यम ठेवावा आणि स्थिर व्हावे. प्रत्येकजण वेगळ्या पद्धतीने बहिर्मुख असते, प्रत्येकाला अपुरेपणाची भावना त्रस्त करते, प्रत्येकजण काळजीत असते, प्रत्येकाला आधाराची भूक असते...ते कोड स्वतःला आत्मसात करायला लागते - इथे दुसरा काही करू शकत नाही विशेष. आपण शांत रहावे ह्या परिस्थितीत.
पाचवी गोष्ट अशी की मनाने दाखवलेला मार्गात _परिवर्तन_ होणे अभिप्रेत आहे (transformation and evolution). त्यासाठी मनाच्या त्या भाषेला "पकडून" राहणे योग्य नाही, कारण भाषेचे मर्यादा असतात, त्यातून पूर्ण सत्य रूप जाणवत नाही.
प्रपंच आहे तसा असू द्यावे. कोडी सोडवण्यातून सुरू करत, शांती भावाकडे जवळ जाणे, स्वतःचा परिवर्तन करणे.
हरि ओम.
श्री
प्रपंच असा का आला, त्यातील संबंध, लोक, वृत्ती, काम, काळ, बालपण ते आत्ताची परिस्थिती, बुद्धीतील वाढ, संकल्पना, धरणे असे का येतात, हे सर्व अस्तित्व कार्य म्हणून ओळखावे. त्या कार्यात "मी" एक घटक म्हणून झालो किंव्हा आलो.
अनुभवांचे वावरणे, साखळीतील घटक, सूक्ष्म शक्तीचे वावर ते स्थूल स्थितीचे संबंध, काळातील निर्णय, समस्या, प्रश्न, भावना, जबाबदाऱ्या, कामाचा वेग, बदल, चक्र, ऐकणे, बोलणे, गिळणे, बघणे, देह... हे असे का येते बरोबरीने, तेभगवंत भावनेवर सोपवावे, म्हणजे शुद्ध भावनेने स्वीकारावे.
शुद्ध म्हणजे भगवंताची जाणीव, त्याच्या कार्याची जाणीव आणि अनुभवांचे *स्थान* (कार्य, साखळी, स्थिती, भाव, संबंध, चक्र, परिणाम). शुद्ध म्हणजे सत्य, एक, व्ययक्तिक न करणे, निरहेतू, आपुलकी भाव, परिवर्तन, स्थिर. ते आपोआप जाणीव ठेऊन होत राहील, शुद्धतेची चिंता नसावी. जे काही प्रारब्ध येऊ पाहील, ते स्वीकारावे शांतीने. प्रारब्ध, परिस्थि, परिणाम, संबंध, रूप - हे भगवत इच्छेने येत राहते, ते ओळखावे आणि शांती भाव मनात संक्रांत होऊ देणे.
शांत होऊन काहीही बिघडत नाही, काहीही निघून जात नाही, काहीही हरवत नाही, काहीही कमी किंव्हा जास्त होत नाही. ते असण्याचा नैसर्गिक टप्पा मानावा, म्हणून हे भोग असतात योग्य _परिवर्तन_ होण्यासाठी.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home