Wednesday, October 29, 2025

श्री

 श्री 


गोष्टी _आठवणे_ ही क्रिया आहे, साखळी दर्शवते, हेतू सिद्ध करते. तसंच, गोष्टींच्या _करण्या_ बद्दल आपण बोलू शकतो. जो काही हेतू असावा, जो आतून प्रकट होतो, त्यातून संबंध, परिस्थिती, बदल, भाव, गोष्टींचे वावरणे सिद्ध होते किंव्हा स्थित होते. हेतूवर सर्व आधारित आहे. म्हणजे हेतू एक प्रकारे कार्य दर्शवते - हेतू राहणार. त्यातून साखळी, चक्र, परिणाम, प्रारब्ध अशा गोष्टी स्थित होणार. आणि त्यामुळे विचार चक्र आणि भावना चक्र. 

ह्याचा असा ही अर्थ निघतो की चक्र _स्थित_ असतेच, आणि जे काही स्थित असते, ते दैवी उद्भवत असते...म्हणजे त्या माध्यमाच्या असण्यामुळे हे कार्य _प्रकट होत राहते._ ते आपल्या अगोदर असणार आहे आणि नंतरही...म्हणजे आपण एक प्रवाह आहोत, तात्पुरते आहोत, निर्माण झाले आहोत आणि अशी एक अफाट शक्ती स्थित आहे, जिच्या कार्यामुळे आपण "इथे" येतो...

वावर असणे, _स्थित_ असणे म्हणजे कार्याचे अनेक रूप असणे, नुसते बसणे होत नाही! किंबहुना _फुकट_ असा क्षण नसावा. प्रवाह चालतोच... आणि त्या बरोबर प्रवाहाचे सर्व गुण धर्म आलेच. 

माझे असणे किंव्हा होणे, हे हेतू पूर्वक नसते, ते _होते_. त्या दृष्टीने सर्व जग असतेच. त्याला हेतू नसतो, तो दैवी इच्छेचा भाग आहे. म्हणजे जग होणे, हे कार्य असणारच किंव्हा होणारच. ज्या भावनेतून जग होते, ते *शांत* असतो. शांती भावनेतून हे सर्व कार्य घडत किंव्हा स्थित होत. म्हणून शांती भावाची देखील क्रिया असते!...

हरि ओम


श्री 

मतभेद होणार. कुठलीही गोष्ट होणार. विचार नको, संबंध नको, भावना नको, त्यांचे परिणाम नको, प्रश्न नको, असे म्हणून चालत नाही. "नको" अशी संभावना अस्तित्वात नाही. अस्तित्व शांत तरी असते किंवा दृश्य तरी - कुठल्यातरी स्थितीत आपण स्थित असतो. म्हणजे दृश्यातून पुढे जाण्याचा मार्ग म्हणजे शांती भाव आत्मसात करावं. मागचं मला काही ठाऊक नाही, ते माझ्या ध्यानी येत नाही, पण त्याचे परिणाम होत असणार. पण पुढचा टप्पा म्हणजे शांत होणे, हा आहे. त्यासाठी विचारांच्या आणि भावनेच्या मर्यादेतून शांत भाव आत्मसात करायला लागते. आपल्यासाठी *मन*, हाच मार्ग आहे शांती अनुभवण्याचा. 

म्हणून सर्व काही मन, जे दाखवते, ज्यात गुंतून राहते, जसे व्यवहार करते, ते स्वीकारावे आणि दोष देऊ नये किंव्हा तसा विचार निर्माण होऊ देऊ नये. 

मन म्हणजे आपण किंव्हा अस्तित्व नाही. मनाच्या स्वभावाला, निर्मितीला, धरून राहण्याची गरज नाही, त्यात गुंतून राहण्याची गरज नाही, विषय मांडण्याची किंव्हा कोडी सोडवण्याची गरज नाही. विषय कुणीही मांडू शकते, कोडी कुणीही सोडवू शकते, क्रिया कशीही होऊ शकते....त्यात विशेष ते काय?!! 

शांत होण्यात कौशल्य आहे, कारण दररोजच्या प्रपंचात मनाचा तसा स्वभाव नसतो. 

वरील गोष्टीतून असे स्थित होते, की भांडणाला घाबरू नये, तो टाळता येईल, असा अट्टाहास बाळगू नये. खंत बाळगू नये, जबाबदाऱ्यांचे ओझे करू नये. सांगितल्या प्रमाणे मनाच्या स्वभावाला धरून राहण्याची गरज नसते, त्यात तसे काहीही तथ्य नसते, ते खरे किंव्हा सत्य नसते. 

म्हणून भगवंताचे सतत चिंतन करावे, म्हणजे सत्य काय आहे आणि ते कसे ओळखावे, हे जाणवेल.

हरि ओम.


श्री 

सर्व गोष्टी आकारात नसतात आणि ते वेगळेपणाने बघता येत नाही, ते इंद्रियांना ओळखता येतीलच, असे काहीही नाही...तरीही त्याचा वावर मात्र असतो. दुसऱ्या अर्थाने ते भगवंताकडून स्थित असते, म्हणून प्रत्येक गोष्टीचे दैवी कार्य - कारण असते. म्हणून सर्व गोष्टींचे सरळ उत्तर नसते, ते गूढ असते. ते सैय्यमाने स्वीकारायला लागते. 

लोकं आपल्या पासून काहीतरी लपवतात, असे विचार करणे म्हणजे भ्रम आहे, समजूत केली गेली आहे. ती सत्य नाही. सत्य ओळखण्यासाठी, मन शांत करायला हवे. काहीतरी दृश्य येणे, तसा स्वभाव होणे, निघून जाणे, अदृश्य होणे, स्तर असणे - ह्या गोष्टींचा वावर राहणार. त्यामुळे लोकांचे स्वभाव होतात, व्यवहार होतो, आपुलकी होते, दुरावा होतो, दुःख होतं, भोग येतात, निर्णय घ्यायला लागतो, कर्तव्य करायला लागतं वगैरे.

कुणी काहीही लपवत नाही, कारण लपवायला जागाच नसते! वेगळेपण किंव्हा तात्पुरतेपण, ही निर्माण झालेली स्थिती आहे. ते एक स्थितीच दर्शन आहे. ते *खरे नाही.*

हरि ओम


श्री 

जीवाचे अनुभव हे स्थित असते अस्तित्वात. म्हणजे त्या अनुभवातून, त्या परिणामातून, त्या "मी" स्वरूपातून आपल्याला जायला लागते, त्यात पळवाट नाही. त्या प्रवासात अनुभवाचे रूप कसेही असेल, ते भगवंताच्या कार्यातून निर्माण होते, हे ध्यानात ठेवणे. 

त्यासाठी नाम घेत राहावे. ती त्याची आठवण आहे कुठल्याही स्थितीत प्रज्वलित ठेवण्याची. भगवंताचे नाम कार्य करते मन परिवर्तन करण्याचे.  नाम हे भगवंताशी *संबंध* जोडत राहते. ते करत राहावे. 

परिवर्तन कसे होते आणि शुद्धता कशी येते अनुभवास, ह्याचा विचार खूप करू नये. ती होते. परिवर्तन काळाने येईल, त्वरीत येणे कठीण. पण येईल, हे नक्की, कारण तो भगवंताशी एकरूप होण्याचा नैसर्गिक गुण आहे. एकरूप होण्यास परिस्थिती, प्रसंग, प्रारब्ध, भोग काहीही येऊ शकतील...त्यातून श्रद्धा डळमळीत होऊ देऊ नये. कर्तव्य करावे. त्याचा अर्थ स्वतःच्या बायकोला देखील सांगता येईल असे नाही. आपण स्वस्थ रहावे. स्वस्थ म्हणजे श्रद्धा ठेवणे कार्यावर.

नाम म्हणजे मुख्य ध्येयाची आठवण कुठल्याही परिस्थितीत. परिस्थिती म्हणजे विचारांचे सैरबैर धावणे आणि खूप विषय निर्माण करत, अहं वृत्ती मिसळून, त्यात गुंतून राहणे. ही स्मरण आहे, ज्यामुळे मुख्य ध्येयाचा विसर पडतो. आपण इथे कशासाठी आलो आहे, हे विसरतो आणि क्रियेत स्वार्थीपणाने गुंतून राहतो. 

तसे होऊ नये, स्थिर होण्यासाठी, नामस्मरण करत राहावे.

हरि ओम.


श्री 

कुठल्याही क्षणात खूप सारे क्रिया आतून घडत असतात किंव्हा स्थित असतात. त्यामुळे संबंधांचा वावर सूक्ष्म स्थिती ते स्थूल स्थिती पर्यंत होतो....हे समजून घेण्यासाठी वापरलेले शब्द. अनुभव गूढच असतो. म्हणून आपल्याला काहीही वाटो, आत अनंत प्रवाह, वृत्ती सुरू असतात आणि त्यांचा परिणाम होत असतो. 

ते सर्व शांत होण्यासाठी, नाम सतत घेत रहावे. नाम खूप आत जाऊन, सारे क्रिया शांत करते, जाणीव शुद्ध करते. आत जात राहताना, बाहेरील परिस्थितीचा काहीही संबंध नसतो, म्हणून बाहेर काहीही चालू जरी राहिले, तरी नाम घेत राहावे.

हरि ओम.


श्री 

क्षण सत्यात पहिले, तर भगवंत भाव आहे. त्याच्या व्यतिरिक्त पाहिले, तर आपला विचार काय सुचवतो, तसे दिसते. 

I think I bother myself too much about authenticity and it's justification as if my worth depends on it. I think that history is where truth is, or philosophy is where truth is, or creation is where truth is, or feelings are where truth is, or responsibility is where truth is, or patience is where truth is....That's the problem or where I am stuck. All above answers are partly correct, for an alignment of all of them is a search I may be engaged in....that all above things would somehow dissolve or collapse to make a perfect realization. That experience of realization may not be linear or sequentially addressed. 

I think worth (of self) is Existential truth and it *shouldn't be dependent* on any form of imagination. Imagination is always incomplete, changing, construct, situational, sequential, variable and so on. That is its _nature_, so why should the idea of worth be made dependent on imagination?!!

Worth म्हणजे खरं स्वतः सिद्ध असण्याची जाणीव. म्हणजे संपूर्ण अंतर्मुख असण्याची स्थिती आणि शांती भावना. स्वतः सिद्ध होण्यास स्पष्टीकरण नाही, दुसरा नाही, वेगळे नाही, तात्पुरते नाही, परावलंबन नाही, संबंधांचा प्रकार नाही, हेतू नाही, हालचाल नाही, परिणाम नाही. 

प्रपंच हा स्वतः सिद्ध भाव आत्मसात करण्यासाठीचा *टप्पा* आहे. It is a pit stop and a journey to realization. As suggested above, it can happen at any moment but effort is required - which is how I may be pursuing at the moment. In this pursuit, justification of anything is *not* required at all. I am allowed to create thoughts in any manner. जसं सत्य स्वतः सिद्ध आहे, तसंच त्यातून आलेले विचारही स्वतः सिद्ध असतात...म्हणजे ते कार्य असल्यामुळे तैय्यार होऊ द्यावे आणि शंका घेऊ नये.

Relax. Things work out. 

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home