श्री
श्री
गोष्टींचे होणे, संबंधात येणे, बदलणे, निघून जाणे, नवीन काहीतरी येत राहणे आणि त्यातून गहन भावना निर्माण होत राहणे - हे शांतीने घ्यायला लागते.
त्यात कर्तव्याचे भान जागृत ठेवायला लागते. स्थिर होणे शक्य आहे, तो भाव आत्मसात करणे शक्य आहे. त्या मार्गावर राहणे. कुठली परिस्थिती कशी होते, कोण काय बोलते आणि घडामोडी कशा होत राहतात, ह्याने आपली शांतता अवलंबून होता कामा नये. शांती भाव भगवत अस्तित्व भाव आहे, म्हणून तसे होणे आपल्याला शक्य का नाही?!
एका मर्यादे पलीकडे कोडी किंव्हा विषय बघणे सोडून द्यावे...त्याने काही हिताचे होत नसते. कोडी मानसिकता आहे, ते खरे नाही किंव्हा खोटेही नाहीत. ते निर्माण करतो आपण आणि त्यात गुंतून राहतो. म्हणून जे काही होते, ते भगवंताच्या कृपेमुळे होते, हे सदैव ध्यानात राहू द्यावे.
हरि ओम.
श्री
बोलण्याचे खूप सारे हेतू असतात लोकांचे. काहीना नुसती बडबड करायची असते, सल्ला ऐकून घ्यायला नको असतो. मी असा विचार करतो की समस्या कुणी मांडली माझ्या समोर, तर ती "आपण" तातडीने सोडवायला हवी, हा मीच केलेला भ्रम आहे. आपण शांत रहावे.
संवाद कोडी न सोडवता देखील होऊ शकतो. किंबहुना संवादाचा विस्तार कोड्यांपेक्षा खूप मोठा आणि सूक्ष्म आहे. शांत राहून ते कळते.
कुणी ओरडले, तर त्यात पूर्ण सत्य नसते. त्यातून आपण बिनडोक ठरत नाही किंव्हा काहीच ठरत नाही! कुणी का ओरडते, त्यात खूप गूढ कारण असेल, जे गनिमी काळापासून आत्ता ते एक रूपात आपल्या समोर व्यक्त होत असेल. म्हणजे कुठल्याही भावनेला "प्रवाह" मानावा, म्हणून ते नुसते बघावे.
परिस्थितीमुळे खूप भावना व्यक्त करायच्या वाटत राहतात काही जणांना. भावना मांडू नये किंव्हा व्यक्त करू नये, अशी अपेक्षा करणे योग्य नाही. भावना येणारच. तो अस्तित्वाचा गुण आहे. ज्या व्यक्तीला इतरांचे भावना शांतीने ऐकून घेता येतात, तो महान आहे. भावना म्हणजे पूर्ण सत्य नाही...ती एक निर्मिती आहे स्थळ आणि काळाची. त्या प्रमाणेच सगळं असायला हवे, असे काहीही नाही.
स्वतः काम करताना हेतूने बघू नये. आपण शांतीने काम करत राहावे.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home