श्री
श्री
अस्तित्व आणि त्याचे परिणाम हा आपल्यासाठी एकच महत्त्वाचा विषय आहे. जो पर्यंत ते सत्य (संबंध आणि कार्य) जाणिवेला उलगडत नाही, तो पर्यंत मन आणि तिच्यातील विचार आणि भावना चक्र प्रज्वलित राहतील. कार्याचा परिणाम गूढ आहे, तो वृत्ती निर्माण करतो आणि प्रकार वृत्तीतून सुरू होऊन अनेक स्तर ओलांडून शेवटी देहात प्रकट होतो. _प्रकट_ हा अर्थ इथे _स्मरण_, असा ही वापरू शकतो.
क्रियेतून स्मरण होते, जे होणारच. स्मरणातून अनुभवाचे स्वरूप जाणिवेत येते. आपण त्याच्या मार्गे, वरील क्रिया प्रमाण मानून परत त्याच्या पलीकडे जाऊन स्थिर होऊ शकतो.
वरील क्रियेला तसा काही हेतू नाही. म्हणून त्याला कार्य म्हणायचे. निर्मिती होणे हा त्या कार्याचा एक परिणाम. प्रपंचात आपण हेतुला धरून असतो, म्हणून कार्याचा भाव मनात नसतो व्यवहार करत असताना. हेतू व्ययक्तिक आहे, कार्य भगवत स्वरूप आहे. हेतुला परिस्थिती आणि विचार लागतात, कार्याला दोघांचीही जरूरी नसते. हेतू वरून वेगळेपण किंव्हा तात्पुरतेपण प्रज्वलित राहते, कार्यामुळे अशा भावना प्रकट होत नाही. हेतूमुळे सर्व विश्व स्थूल भासते, कार्यामुळे सर्व विश्व सूक्ष्म असते.
कार्याचा अनुभव मनात संक्रांत होण्यासाठी किंव्हा मन कार्याचे रूप घेण्यासाठी, आपण कर्तव्य करत राहावे, चिंतन करत राहावे, नामस्मरण करत राहावे, श्रद्धा वाढवत रहावे - असा मार्ग सुचविला आहे.
हरि ओम.
श्री
प्रपंच, ह्या अनुभवाला आपण पकडून असतो. जस अस्तित्व गूढ आहे, तसे पकडून राहण्याचा गुण खूप खोलवरून उमटत राहतो, म्हणून त्याचा ठाम पत्ता कळायला प्रयास लागतात.
स्वतःला ह्या वरील प्रकारामुळे दोष देऊ नये. प्रपंच, हा अनुभव मनात संक्रांत होणारच. किंबहुना "मन" ही वस्तू असणारच. त्यातून मार्ग आखून मनाला भगवत स्वरूप करायचे आहे. हा मार्ग देखील सरळ रेषा सारखा असेल, असे नाही. तो कसा होईल, कधी होईल, केव्हा होईल, कसा परिणाम होईल - हे सर्व प्रश्न भगवंतावर सोपवावे. प्रपंचातून पलीकडे होण्यासाठी सध्या आपल्याकडे जे महत्वाच्या गोष्टी आहेत, ते म्हणजे - कर्तव्य, प्रयत्न, प्रयास, श्रद्धा, चिंतन.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home