Tuesday, November 04, 2025

श्री

 श्री 


भगवंत भाव *अनुभवाचे* एक सत्य रूप आहे. भाव म्हणजे असणे. असण्याच्या अनेक क्रिया/ स्तर/ स्थिती/ प्रकार/ साखळी/ मर्यादा/ परिणाम असतात. असणे, हे कार्य, शक्तीतून घडते. "शक्ती" आहे, म्हणून "असणे" हा भाव आहे, म्हणून "कार्य" ही क्रिया असते, म्हणून "स्थिर" हा अनुभव संक्रांत होतो किंव्हा स्थित होतो. 

आपण "असतो" अस्तित्वात, त्यामुळे अनुभव असतात आणि भोग असतात. त्या अनुभवाचे रूप म्हणजे परावलंबन आणि गुंतलेले असणे. अनुभवातून गोष्ट वेचून काढणे, म्हणजे एक प्रकाराची क्रिया करणे, जिच्यामुळे _गोष्ट_ होते. ह्याचाच अर्थ असा, की रूप किंव्हा आकार दिसणे, ह्यात क्रिया सामील असते मनात, ज्यामुळे परिणामांना सामोरे जायला लागते. 

जे पेरू, त्याचे झाड अवश्य होते आणि त्यांची फळे मिळणारच. हे सत्य आहे. 

भगवंताचे कार्य आणि आपली क्रिया/ प्रयत्न दोन्ही एकाच वेळेला चालू असतात. ते कसे, ह्याची फारशी चिकित्सा असू नये. मान्य आहे, की कुतूहल किंवा चिंतेपोटी माहिती असणे, हा हेतू असावा मनाचा, तरीही श्रद्धा भाव वाढवत आपण आपले कर्तव्य करत राहावे. 

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home