Tuesday, November 04, 2025

श्री

 श्री 


सर्व एकच असते. Interrelationship is to be realized, not argued as such. Truth is to be realized, not put forth for any discussion or debate. 

Realization is an inward journey that has very little to do with others. 

गोष्टींचे होणे, असणे, जाणे, गुंतून राहणे, साखळी असणे, भाव होणे, स्तर असणे, क्रिया होणे - हे जाणून आणि आत्मसात करून घेण्याच्या गोष्टी आहेत स्वतःला. त्याचे बरेच अर्थ निघतात, जसे की सूक्ष्म शक्तीचा वावर, स्थूल विश्वाचा आधार काय असतो, विचार आणि भावना कुठून येतात आणि कसे येतात, विचारांचा किंव्हा भावनांचा पुढे होणारा परिणाम, भोग, चक्र, निर्णय. 

आपल्यासाठी _अनुभव_ जाणवणे हा महत्वाचा टप्पा आहे. त्या मार्गातूनच शांतीकडे आपली वाटचाल घडू शकते. थोडक्यात अनुभवांचा स्वीकार करणे आले आणि ते स्वच्छ मनाने बघणे आले. कालांतराने त्यात परिवर्तन होऊन (सूक्ष्म होऊन), शांती भावात स्थिरावणे होते. 

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home