Shree
Shree
A formal way of appearance is a way of initiating action.
So is an informal way...
There are preferences for above approaches to cause or
create action and it rises from inner perception of existence. To cause work is
an Undertaking, but not from us or not by us but _through_ us.
In this sense perhaps, existence, perception and action
aren't different (or just different forms of expressing the same truth).
Why do we act, is a fundamental inquiry. Who is this
"we" and what does it do?! I don't think it should matter how
appearance should be. It shouldn't matter how a form happens. It shouldn't
matter how movement happens. It shouldn't matter how any sequence materializes.
It shouldn't matter how space or time behaves or changes.
"How" is for realization only. It shouldn't be
for any form of control.
Hari Om
Shree
There is no need for any urgency. The cycle of Time is
established and creates work on Its own. Urgency need not be made any
_personally_ motivated idea, because all is the Will that causes work to
happen.
It is also quite weird that we choose to align so much of
our thinking to phenomenal actions that what gets also created are a host of
effects on minds and bodies.
So relax in whatever journey one experiences at present.
Journey is a movement given to us. Acknowledge the same.
I can be anything. I can work in any form. I can express
in any way possible. What is done _through_ me is the essence and not _by_
me.
Hari Om.
श्री
देवाच्या जवळ यायचा मार्ग म्हणजे काळजी किंव्हा चिंता स्थळाची आणि काळाची एकदम
शिथिल करावे. म्हणजे स्वतःचीही काळजी खिडकीतून बाहेर फेकून द्यावी.
इथे मी खिडकी म्हणालो, म्हणजे भिंत आणि छपराची मर्यादा मीच घातली आहे आणि
अस्तित्वाशी संपर्क येण्यासाठी तिथे दार आणि खिडक्या दिल्या आहेत,
जेणे करून ऊन, वारा, पाऊसाची चाहूल लागू
शकेल. बाहेरचा निसर्ग मला बोलावतो, पण मी काही माझे कवच
सोडत नाही!! म्हणजे दार, खिडकी, भिंती,
छप्पर एकच वस्तू खुणावते तसे पाहिले तर - ती म्हणजे भीती आणि अस्तित्वाचा खरा
अर्थ होण्याचा शोध.
प्रत्येक टप्प्यात आपण कुठलीतरी वास्तू करू, त्यात राहू,
त्यातून बाहेरची चाहूल लागत राहील आणि मग आपण त्याच्या पलीकडे जात राहू. हे
आहे चक्र. ना घर माझे, ना खिडक्या माझ्या, ना बाहेरचे अंगण
माझे, ना बाहेरची चाहूल माझी. थोडक्यात "माझी"
असे समजून घेणे, ही झाली संकल्पना, ज्यामुळे ह्या
वास्तू जाणवत राहतात.
ह्याच्यातून बाहेर यायचे असेल तर मनाने दाखवलेल्या मार्गाला सोडायला हवा,
मर्यादित ओळखायला हवा. त्याच्यातून आपण शांत होतो.
हरि ओम
श्री
बऱ्याच प्रश्नांचे उत्तरे मला माहित नाही. मी कोण आहे,
हे देखील मला माहीत नाही पूर्णपणे. ह्या स्थिती मध्ये कार्य होते,
त्याचे अर्थ प्रकट होतात, हालचाली होते,
परिणाम होतात, चक्र वावरत राहते वगैरे. अस्तित्व शक्तीची काही
व्याख्या नाही. ते केवळ असते. त्यातून मी, हा भाव,
कसा होतो, कसा बदलत राहतो आणि कुठे जातो,
ते तो शक्ती ठरवतो.
परिणाम देखील कार्य आहे, गूढ आहे. बुद्धी
देखील अस्तित्वात असण्याची खुण आहे. कार्य सिद्ध होण्यासाठी नसते. तो फक्त
असण्याचा परिणाम असावा.
हरि ओम.
श्री
आपल्याला उत्तरांचा शोध होत असताना उतावळे होण्याची गरज नाही. शोध म्हणजे
देवावर भरवसा, तो ज्या पद्धतीने उत्तर देईल,
आपल्याला जवळ करेल, अनुभव देईल, जाणीव देईल,
त्यावर निश्चल विश्वास ठेवावा.
माझ्या आत खूप शंका आहे. ती अट्टाहासातून काढता येत नसावी. ती कालांतराने शांत
होईल. ती कशी होईल शांत, त्यासाठी भगवंताची जाणीव वाढवत राहणे,
हा उपाय सांगितला आहे. शंका म्हणजे न्यूनपणा नाही...ही समजूत झाली आहे इतर
काही त्या बरोबर येणाऱ्या भावना कडून. हे _संबंध_
झाले आहेत. संबंधाला कारण लागत "नाही" (म्हणजे संबंध होणे ही क्रिया
गूढ आहे...होत राहते...भगवंताची इच्छा आहे).
मला हे स्वीकारावे लागेल की वरील क्रियेतून "माझी स्वतःची" प्रतिमा
झाली आहे. इथ पर्यंत भगवंताने आणले आहे, तर पुढेही तोच मार्ग
दाखवेल मला. ह्या प्रतिमाला सूक्ष्मता देणे, हे तो सांगेल मला
आणि तसे अनुभव संक्रांत करून देईल...
सगळं एकत्र कसे होईल, ह्याची चिंता असू नये. जीवाला चिंता त्रस्त करते.
क्षण एक एक करून सत्या पर्यंत कसे नेईल, ह्याचा मार्ग भगवंत
दाखवेल. भगवंताच्या शक्तीवर श्रद्धा वाढवत राहावी.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home