श्री
श्री
सर्व आयुष्य हे भगवंतासाठी असते. भगवंतातून दृश्य जगाच्या हालचाली ध्यानात येत राहतात, अनंत रूप, आकार, संबंध, स्मरण, हेतू, क्रिया असे ध्यानात येत राहते.
म्हणजे सर्व काही होऊ द्यावे, संबंधित रहावे, परिणाम होऊ द्यावे. त्यातून जीवाला प्रश्न पडतात, शोध होतो, मार्ग पत्करला जातो आणि सत्य जे काही आहे, ते आत्मसात होते.
परिवर्तन होत राहणे आणि आत - बाहेर (दुहेरी) परिणाम होणे, हे अपरिहार्य घटक आहेत जीवाच्या अस्तित्वात. म्हणून प्रश्न पडणारच आणि बेचैनी येणार आणि त्यातून _शोध_ होणार.
ही मानसिकता कदाचित काही सांस्कृतिक समाजामध्ये नमूद केलेली आढळते. इतर ठिकाणी जास्त करून बौद्धिक शक्तीला प्राधान्य दिलेले आढळते.
कुठेही जा, काहीही करा, कसलेही काम करा, कशातही स्वतःला गुंतून घ्या - सत्याचा शोध हा होणार - म्हणजे "समाधान" कशाने प्रस्थापित होते, शांत कशाने वाटते - ह्याचा शोध होणार.
ते सांगता येते का, ते दाखवता येते का, ते कुठल्या आकारात सामावता येते का, त्यातून इतरांना मार्गदर्शन घडवता येते का - त्या मार्गावर जात राहताना योग्य काय ते कळते.
इथे *प्रत्यक्ष* अनुभवाला प्राधान्य असते. _प्रत्यक्ष_ स्वतःच्या रूपातून प्रकट होणारी संकल्पना आहे, म्हणून मार्ग ज्याचा त्याचा असतो, शोध ज्याचा त्याचा होतो, प्रारब्ध ज्याचे त्याचे असते, परिणामांचे भोग ज्याचे त्याचे होते. हे सर्व शांतीने स्वीकारावे. एकातून अनेक होणे, संबंधित राहणे, तात्पुरते असणे आणि परत एकात विलीन होणे - हे चक्र आत्मसात होणे म्हणजे *शांत* होणे.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home