श्री
श्री
बुद्धी किंव्हा मी हे रूप शांत होऊ देणे, हे जीवनाचे धोरण समजून घ्यावे. शांत म्हणजे सत्य आत्मसात होणे आणि मुळात अनुभवाचे बीज कुठून आणि कसे येते, हे ओळखता येणे आणि ते शांतीने स्वीकारणे. इथे _ओळखणे_, ही शुद्ध जाणीव होण्याचा परिणाम आहे, किंव्हा मन स्थिरावण्याचा.
विचार येऊ द्यावे आणि प्रवाह स्थित राहू द्यावे. विचार निघून जाऊ द्यावे. विचार येणे आणि जाणे, हे काल चक्र सुचविते, तर तसे होत राहू द्यावे.
दररोज मन विषय निर्माण करून त्यात गुंतून राहते, चक्रात सापडते, इकडे तिकडे जाते आणि बेचैन होत राहते. ह्याला _अस्थिर_ स्वभाव म्हणावा. रुपात आणि आकारात आणि त्यांच्या हालचालीत गुंतून राहणे - हे अस्थिरतेचे लक्षण समजावे. त्याचे _कारणही गूढ_ असते, म्हणून ते ध्यानात येत राहणार. म्हणून प्रश्न असा निर्माण होतो की अस्तित्वात असल्यामुळे संबंध कसे होऊ द्यावे?
मूळ संबंध स्वतःशी आहे, म्हणजे त्याच ओघाने - सत्याशी. म्हणून तो कसा शुद्ध करत रहावा, इथे लक्ष द्यावे. संबंध कुठेच पळून जात नाही. ते सामोरे जायला लागतात. म्हणून अभ्यास जो हाथी घ्यायला लागतो, तो संबंधांचा असतो.
मन स्थिर होऊ द्यावे - असा मार्ग आत्मसात होऊ द्यावा. सर्वात महत्त्वाची गोष्ट अस्तित्वातील म्हणजे स्थिरता. त्यासाठी नामस्मरण.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home