Friday, November 07, 2025

श्री

श्री 

प्रारब्धने ज्या गोष्टी येऊ पाहतात आणि निघून जातात, त्यांच्यावर विचार अवलंबून करण्याची गरज असते का? हा प्रश्न/ ही संकल्पना स्वतःला विचारा. 

म्हणजे रूप, देह, स्थळ, काळ, वृत्ती, परिस्थिती ह्यावर विचार स्थित करावा का?! आणि तो चक्रासारखा सतत चालू राहतो आणि गोष्टींवरून इकडे, तिकडे, आत, बाहेर, साखळी, संबंध, आणि तात्पुरतेपण, भीती अशा साऱ्या वस्तू त्या बरोबर *प्रकट* करतो. ह्यातच आपली शक्ती वापरली जाते! अध्यात्माच्या दृष्टीने शक्ती *खर्च* होते! 

वरील अस्तित्वातून होणाऱ्या गोष्टी कशा होतात आणि कोण करते?! हे एकदा आत्मसात केले की विचार "स्थिर" होऊ शकतात, कारण सर्व घटक एकाच माध्यमातून प्रकट होतात अशी जाणीव संक्रांत होते. म्हणजे विघटन जरी होत राहिले, तरी त्याचा परिणाम मनावर कोरला जात नाही. नाविन्य किंव्हा निर्मिती जरी झाली, तरी विचार स्थिर राहतात. 

हरि ओम

0 Comments:

Post a Comment

<< Home