श्री
श्री
बहिर्मुखपणामुळे दृश्यात होणाऱ्या हालचाली, बदल, संबंधात, रूपात, आकारात आपण विषय शोधतो, गुंतून राहतो, चक्रात वावरतो, परिणाम भोगतो, स्मरणात असतो. हा अस्तित्व स्थितीचा _एक प्रभाव आहे_.
"मी" हा भाव आहे किंव्हा एक प्रकारची शक्ती आहे, जिचे कार्य होत राहते. कार्य इथे म्हणजे भगवंताची इच्छा, म्हणून ते स्वीकारावे लागते. माझे होणे, असणे, वावरणे, कृती होणे, निघून जाणे - हे कार्य आहे.
कार्य ह्याचा अर्थ की माझ्या कृतींना वैयक्तिक रंग लावण्याची गरज नसते. एखादी गोष्टी अशी का ध्यानात येते, अशी का परिणाम निर्माण करते, अशी का व्यवहारात ठेवते - ह्याची चिकित्सा करण्यात वेळ घालवण्याची गरज नसते. आपण तो वेळ घालवतो, कारण "मी करता" ह्या सर्वांगीण भावनेला खूप घट्ट धरून ठेवलेले असते.
आता ह्याच सर्वांगीण अंतर्मुखातून प्रकट झालेल्या भावनेला शांत होऊ द्यायचे असते. म्हणजेच _कार्याचा_ भाव सर्वांगीण होणे अभिप्रेत आहे.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home