Monday, July 29, 2024

श्री

 श्री 


स्फुरण खूप गूढ आणि पसरलेले असते. त्याची सुरुवात आणि शेवट कळत नाही बुद्धीला आणि त्या प्रमाणे बुद्धी वागत राहते - शंका, भीती, त्रास, चिंता. म्हणजे ह्याचा अर्थ की बुद्धीचा स्वभाव हा स्फुरणातून घडतो आणि त्यामुळे अर्थ निर्माण होतात आणि जगही. जग भासणे स्फुरणाची दृश्य स्थिती किंव्हा स्फुरण परिवर्तन होत दृश्यात येतं. म्हणजे स्फुरण ही भगवंताची क्रिया आहे, कार्य आहे आणि त्यातून आपण होतो, बदलत राहतो, गुंतून राहतो, अनुभव घेतो, प्रतिक्रिया देतो आणि हे चक्र सुरू राहत. हे असणार आहे. अस्तीत्व म्हणजे शुध्द अद्वैत स्थिती आणि दृश्य जगाचा अनुभव.

तरीही राग येतो, चिंता करतो, विचारात राहतो, दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो, अट्टाहास धरतो, अपेक्षा करतो वगैरे. आणि असे करत राहताना दृश्याचा परिणाम भोगतो.  

गोष्टींचं होणे, आकारास येणे, भास होणे, निघून जाणे, बदलत राहणे फक्त भगवंताच्या हातात आहे, म्हणून त्याला पकडण्याचा आणि त्यात गुंतण्याचा अट्टाहास करू नये. त्याला विशेष बौद्धिक अर्थ लादण्याची जरुरी नाही. आणि बुद्धीतून विचार चक्र द्वारे "प्रतिक्रिया दाखवण्याची" गरज नाही. 

जे आहे ते आहे. जे येणार आणि निर्माण होणार ते होणार. जे जाणार, ते जाणार. हा बदल किंव्हा स्फुरण भगवंताचे आहे. त्याला शांततेने स्वीकारा.

हरि ओम.

श्री

 श्री 


आपल्या हातात कार्य करणे भगवंताने सांगितले आहेत. गोष्टींची निर्मिती, ती शक्ती, शक्तीच वावरणे, जाणीव असणे, त्यातून आकारास येणे, बदल होणे, अनुभव येणे त्याच्यातील हे घटक आहेत. 

असे होणार, आपण गुंतणार, संबंधित राहणार, तात्पुरते वाटणार, परिणाम होणार, दृश्याचा परिणाम होणार, दृश्य दिसणार. हे सत्य नाही किंव्हा हा भाव योग्य नाही, हे मनाला सांगायला लागतं. 

त्यातून जाणीव, भाव शुध्द करणे किंव्हा होणे म्हणजे काय हे ध्यानात घ्यायला लागत आणि तशी वाटचाल करायला लागते. मुळात आपण कोण आहोत, किंव्हा अस्तीत्व म्हणजे काय आणि त्यात अनेक स्तर असतात का, हे जाणणे. ते जाणणे कुठल्याही गुणात असून करता येऊ शकतं, कारण सगळे गुण एकमेकांच्या संबंधात असतात आणि प्रत्येक गुणाला शांत होण्याची गरज असते. म्हणून भगवंताची कृपा, त्याच स्थान आपल्या जीवनात आणि त्याचा परिणाम - ह्या गोष्टी आपल्या गुणातून जाणवायला लागतात. 

त्यासाठी वृत्ती, आकार, गोष्टी, संबंध आणि अनुभव दिलेले आहेत. त्याचा आनंदाने स्वीकार करावे.

हरि ओम.

Saturday, July 27, 2024

Shree

 Shree


In an education system, perhaps the default role (where I too was brought up)  had been to create people that produce and deliver things...meant to serve a market. The pace is quickening in recent times.

Fundamentally then what becomes the role of asking the question of self? Why am I here and what am I doing here? Is doing meant to produce and evaluate or to just be engaged? Does doing have a motive or does it need not? Should doing begin by an intent or doing happens from Being? Am I an individual or am I connected? Am I answerable to something? 

When will these questions be responded or explored if we only _produce_ things for returns?! And what does one get after producing?... हा तर आणखीनच गहन प्रश्न आहे?!!...why produce and what to produce?! 

Hari Om.

श्री

 श्री 


एखादी जाणीव अशी का यावी किंव्हा तैय्यार व्हावी, हा माझ्यासाठी बौद्धिक प्रश्न जरी असला, तरीही ही पलीकडून आली आहे, हे स्वीकारण्याची सवय करणे शहाणपणाचे ठरेल. म्हणजे जाणीव काहीही असो आणि त्याच्यामुळे परिणाम चक्र काहीही ठरो, तरी त्रासून घेण्याची गरज नाही. जाणीव आपण ठरवतो का ती होते, हे समजून घेणे. जाणीव माध्यम काय निर्माण करते आणि कसे हे ओळखणे. त्याला प्रवास मानणे आणि म्हणून सतत बदलत राहणे हे स्वीकारणे. 

एकंदरीत ज्या काही असंख्य गोष्टी निर्माण होतात, किंव्हा आकारात येत राहतात, त्या मागे भगवंताचे प्रबोधन असते. ते भगवंताचे कार्य आहे. त्यात आपली जाणीव काम करते. इथे काम म्हणजे खऱ्या असणाऱ्या वस्तूंची संकल्पना आणि परिणाम. ते म्हणजे काम किंव्हा कृती किंव्हा कार्य. 

हरि ओम

Friday, July 26, 2024

Shree

 

Shree

 

I have been observing the origin of how does a tendency develop and suffice to say that there is no fixed point to think in a particular way. Thinking and being particular is an ability of mind to conceive and act on anything and since it is a loop, it can create a situation. As we move around the world of forms, we see that forms have “movements” of change, character, interconnectedness, relations, meanings and physical movements of coming and going. This we see it all happening when we are dwelling in this phenomenal world. This seeing and thinking and analyzing and inferring is dependent again on our own self and hence just as things are relative and cannot be said with certainty what it is or what it is not – this understanding too comes from our own state of mind (which has got to be temporary!). Again where does mind originate and how would it function and what it creates and where and when it goes? All is the making of the force of Existence. Nothing can be dismissed or subletted – all remains in our mind and all comes back in some other form, some other day and in some other situation – like a cycle of vibrations! Whatever we may think, it creates vibrations and forms and forces of engagement and hence no matter how truthful we may think ourselves to be, our quality of engagement generates the corresponding feeling within us how far we have evolved. We have definitely come from God and we just cannot fool that fact and dare not suppress this reality. If not now whatever we face, we will face things later. There is no such thing as escape. All is within us. So the fundamental search for variables of fear or ego is quite useless – that would never perhaps stop vibrations! Fear or ego is to be seen as those are and they are required to “pass” through the mind. Let all thoughts with their connections and impacts come and go. All comes from Beyond, so all is required to be welcomed.

 

Currently thereis much too distraction and apathy of experiences getting created by information explosion. Memory is getting affected like nothing else before! To retain or not to retain and what to retain and how are becoming fundamental inquiries. What to say, how, when, where and alignment are also getting challenged internally and externally. All in all, it is an atmosphenere of toppling. Become silent.

 

Hari Om.


Thursday, July 25, 2024

श्री

 श्री 


साहजिक आहे की एक रूप घेऊन, एक गुण घेऊन, आपल्याला अनेक आकारात, शक्तींच्या समूहात, दृश्यात गुंतायला लागतं. तो नियम आहे जगाचा. त्या नियमाच कारणही वृत्तीतून उद्भवत जो भगवंताने मांडलेला आहे किंव्हा त्याची इच्छा आहे. हे गुंतणे, आकार बघणे, गतिमान होणे, बदल दिसणे, अपूर्णे वाटणे, तत्पुरत अनुभवणे - एका प्रकारचं कार्य आहे, ज्याची सुरुवात आणि शेवट जीवाच्या आकलनाच्या पलीकडे असते. 

शुध्द होणे म्हणजे वरील क्रियेच्या परिणामाकडे बघून देखील जाणीव वाढवत राहणे. अस्तित्वाची परिस्थिती काहीही हो विचार आणि भावनांच्या पातळीवर, भगवंत जाणता येतो. म्हणून परिस्थितीवर जास्ती विचार किंव्हा चिंता करत जाऊ नये - एका प्रकारे गोष्टीचा चावा घेण्या सारखे आहे. त्यातून काय मिळणार? समाधान तर नाहीच! 

भगवंताचे स्मरण आणि त्याचे कार्य हे जाणणे समाधानी स्थिती पर्यंत नेईल. भगवंताकडे विषय किंव्हा वस्तू अश्या दृष्टीने बघू नये, मग तो जाणिवेत येत नाही. विषय सोडले किंव्हा वस्तूंचा अट्टाहास सोडला तर तो साध्य होतो. "पलीकडे" होणे ह्याला संबोधित केलं आहे. ह्याच्यात एक *भाव* अभिप्रेत आहे - जाणिवेतून. 

हरि ओम.

Sunday, July 21, 2024

Shree: fragmentation

Shree: fragmentation

 

Algorithm is already a fragmented way of looking at reality of Existence. In fact any such ‘form’ of perception that causes a process or a physical entity is seen only because one gets fragmented within. त्याला पायरी पायरी ने घसरून, सूक्ष्मा पासून ते स्थुला पर्यंत अवतरणे असे म्हणतात. Fragmentation is a process set in consciousness that results in creation, movement, connections, sequences, forms, from vibrations to intellect to feelings to a body. More is the fragmentation; more is the nature of form one so perceives. It seems because we “see forms”, it indicates the level of a fragmented existence we perceive! The sense of individualism or privacy is also embedded in this nature of existence – of fragmentation. This has many repercussions on the nature of perception – fundamentally being of dependence, isolation, stress, surveillance, control, order and so on, summarily sensed as disconnect. What one should know from this that there happens a “change within us” that creates more harm than good and in the process lets out those feelings or forms that are harmful for the phenomenal world. To become an individual or private freak is a kind of “vibration” or a “message” sent to the web of cosmos which has an effect and comes back to you in some ways which inflicts harm again. The problem with individualism that one engages as a language is that the message of universal connect becomes further weakened. One fails to acknowledge the voices having larger dimension of space and time – culture, history phenomenology, philosophy and so on – to name a few. But even more critical is that philosophy, which is meant to blurr the idea of self, is also seen as a “fix it” solution to contemporary problems and herein lies the uiltimate impact of the individual mindset! Messages encoded in great works or texts or studies or forms of art can no longer be “read” with the required intent.

 As an idea of progress, no matter what systems come, what tools get invented, if they come with the intent of fragmentation, their efforts in creating tools of management and control and coordination leads to further fragmentation within! The enormous speed and suffocatingly controlling systems that one experiences today in the work front are all an indication of that universal attitude for freedom or individualism or privacy and again ironically the way of looking at knowledge systems to “fix” the tendency!

 It is said that to become complete, certain practices need to be imbibed in the mind, so that it takes the form of completeness (tranquility or transcendence). The object that we see has literally come from Beyond; the changes we see also happen by the presence of Beyond and our actions that we intend to do can also take on the intent of being Beyond.

 An algorithm can be viewed to go Beyond – only if we allow it to do so for our own consciousness.

 

Hari Om.

 


Friday, July 19, 2024

Shree

Shree

Instead of justifying what sort of thought “appears” or gets “created”, I think it is necessary to “feel the creation” of the thought. In this context, “feeling” is used as a process of coming from Beyond and letting the vibrations linger and then go away. Justification has no end and can get debated unnecessarily and essentially the expression is always incomplete, intangibly born and coming outside and some transformation has taken place. This has many, many unlimited ways of coming into the phenomenal world and is eternally being done. This is Divine Action and the mind is an instrument to give some shape to this action. It is only an instrument, but not the primary cause. Let it be known.

Hari Om. 

 


Shree

 Everything gets born from imagination or Being. Even the idea of space, time, relations, movement – as an integral experience. What gets seen or perceived “now” has connections with many other impressions of the past and the future and idea of existence and also other subtle states of Being. These collectively “make” or “create” perceptions that, depending on the nature of imagination, we feel “individual” or “collective” or a combination of both. This process is the Truth of existence and is eternal. From this process we come to the formation of inquiry – what is appropriate then? We also feel “many” and conditions and change and dependence and intents and tendencies and patterns and forces affecting us. This is a “flow” of vibrations and this flow is from consciousness. 

Who I am as a human therefore is only an imagination or a state of Being that can mold, change, and connect – as a destined process. There need not be any sort of expectation of self, action, perception, space, time and any other thing. That does not mean we are not there. We are suggesting here that our being in the phenomenal world is NOT conditional or something expected to produce anything from personal motives. 

Things happen. This happening comes from Beyond or by the presence of Beyond.

 Hari Om.

 


श्री

श्री 

अस्तित्वाचं कार्य सर्व ठिकाणे आहे, हे ध्यानात ठेवायला लागतं. अस्तित्वाचं परिणाम ओळखावा लागतो. द्वैतमय जग निर्माण होत राहणे आणि त्यात आपण स्वतःचा अर्थ मांडणे हा एक परिणाम आहे.

अर्थ मांडताना स्वतःची जाणिव कारणीभूत आहे, हे जाणणे. अर्थ लावताना अनेक संबंधित घटक सामावलेले आणि बदलते आहेत, हे जाणणे - म्हणजे आपण परावलंबी आहोत. त्या परावलंबी राहण्याचा परिणाम म्हणजे एका प्रकारचं विचार चक्र आणि भावना चक्र. त्यातून उमटणार अहं भाव किंव्हा माझे पणा. त्या अहं भावतून निर्माण होणारे अनुभव - जे सतत गुंतागुंती, बदल, तत्पुर्तेपण आणि न्युन भावना निर्माण करतात. त्या भावनेतून दिसणारे आकार, संबंध, परिस्थिती आणि त्यावरून आपली कृती किंव्हा न थांबणारी धावपळ. 

हे सगळं अस्तीत्व किंव्हा दृश्यच असणे (किंव्हा भासणे) मनात किंव्हा जाणिवेत चालू असतं. बाहेरील स्थितीच अस्तीत्व किंव्हा वावर किंव्हा स्वभाव किंव्हा परिणाम किंव्हा आकार हे सर्वस्वी आतील जणीवेशी संबंधित असतं. प्रत्येक जीवाचा अर्थ तो त्याच्या रचने प्रमाणे निर्माण करत राहतो. तरीही मानवी जीव ही एकच स्थिती आहे (अहं वृत्तीची किंव्हा भीतीची) जिचे असंख्य पद्धतीने अपुरे अर्थ निर्माण होत राहतात आणि म्हणून एकमेकात आपण गुंतून राहतो. 

वरील सर्वस्वी भगवंताच्या शक्तीचा परिणाम आहे. तो परिणाम इतक्या सूक्ष्म पातळीपासून घडतो की दृश्यात येई पर्यंत " आपण " ही संकल्पना निर्माण होते आणि पूर्णपणे भगवंत स्थितीला विसरायला होत! भगवंत कायम आहेच, म्हणून त्याच्यातून निर्माण होणारे आणि परिणाम करणारे चक्र देखील कायम राहतात. म्हणून दृश्यात सुरुवात आणि शेवट कळत नाही, तो शोधण्याचाही प्रयत्न बुद्धीचा लटका पडतो. तिथे श्रद्धेचा जन्म होतो. 

श्रद्धेच्या बळावर भगवंताचे अस्तीत्व निर्माण होत, त्याच्या शक्तीच कार्य कळत, आपण सूक्ष्म होत जातो आणि शेवटी भगवतस्वरुप होतो. हा प्रवास मानवी जीवाला दिला आहे. तसे होत जाणार, ती खात्री बाळगावी. 

हरि ओम.

श्री

 श्री 

 लोकांचं म्हणणं असतं की सुधारणा केली की "आनंद" मिळेल...पर्यायाने राग कमी होईल असे त्यांना सांगायचे असते कदाचित!  सुधारणा झाली (जसे की systems नामक प्रकार) की गोष्टी हातात आयत्या मिळतील किंव्हा प्रकट होतील अशी बाळबोध समजूत असते! I think you only can change the sequence of variables or the definition of variables. 

This means the manner of creation of memory through experiences of body, mind, and vibrations alters. If the incidence of using body was extreme in historical times, it leads to a perception and imagination or feeling of environment+ people in a particular way. Compare this with virtual systems of engagement where the use of intellectual logic is extreme and that of bodily presence (in real space -time) is minimum. Or, I can say that the presence (and therefore perception) of body gets altered as the idea of space-time gets changed/ reimagined! This means there exists a connection of space-time with inner and outer tendencies and their effects or feelings of environment, people, relationships and so on. So it is one interconnected medium. 

 एका ही घटक्यात बदल झाला की सर्व इतर घटक्यांमध्ये बदल होतो. म्हणजे ज्या पद्धतीने भावना पूर्वी यायच्याआता त्या पद्धतीने येत नाही किंव्हा निराळ्याच भावना येऊ पाहतात! जवळच उदाहरण द्यायचं झालं तर ज्या पद्धतीने शिकवण्याचा परिणाम मुलांवर व्हायचा "पूर्वी"आता ती शिक्षण पद्धती अजिबात काम करत नाही! उलट होणारी प्रक्रिया अशी असते की शिक्षकाला भिंतीवर डोक आपटू की काय असे वाटू शकेल! 

 अर्थ खूप खोलवर आहे. ह्यात मनाचे कंगोरे दिसून येतात. नातीगोतीव्यवहारसंस्कृतीनियमआकारहेतू.....पूर्वीच्या संकल्पनांना मुरड घालण्याची गरज आहे. आणि सहजासहजी होणार नाही ही गोष्टकारण मानवी स्वभाव चिवट असल्यामुळे खूप मनस्ताप भोगायला लागणार आहे.

 असोगुंतणे आपण कधी कधी उगाचच करतो. मेट्रो आली म्हणून सुविधा झाल्या. असतील. मनोवृत्ती वरवर शांत झालेल्या वाटतात. तसे पुढच्या काळात उफळणारे वृत्ती दाबून किंव्हा मारून गेलेल्या "वाटतील"पण तसे काहीही "गायब" होत नाही! नव्या आकारास त्याच चिवट वृत्ती बाहेर येऊ पाहतात आणि निमित्त मिळालं की झालं! 

 Generally what people mistake as "new experience" is only a sort of recalibration of the fundamental behaviour of mind! It is the same extent of mind that is under work! 

 In developed countries, generally public spaces appear extremely "silent, orderly, disciplined" and many more adjectives equivalent to this mentioned feeling. But I guess that's on the surface. Deeper down, we have the same fears, feelings about existence. Noone admits this, because it is strange that human expression is hardwired to resist any revelation from other or to appear vulnerable. It is a lost battle, according to me, if one doesn't acknowledge the vulnerability of a phenomenon of form! Anger actually is a kind of admittance of having no idea of what do we do here as people?!! One foolishly thinks that one is "in control of things", whereas, in reality the truth is profoundly different.

 दृश्यात येण्यात खूप कष्ट असतात...स्तरातूनस्थितीतूनवृत्तीतूनमनातूनआकारास येणे! आणि एकदा आलोकी इतकं गुंतून राहणे की ती वस्तू डोक्यातून न निघणे. आणि शेवटी त्याच वस्तूत असंख्य पद्धतीने गुंतून राहणे काहीही अर्थ नसतांना ( *उगाचच*). अर्थातहे नैसर्गिक असावंदेवाकडून आलेलं कार्य. मेट्रो ची चाव चाव किती होते! कुठलीही गोष्ट घ्या...चाव चाव असतेच! तरीही आपण काही चावा घेण्याचं सोडत नाही! बघा आताकी वृत्ती किती खोलवर गेली आहे ते!

 म्हणून का होईनानामस्मरणाचा ध्यास घ्यायला सुरुवात करायला लागते. ही देखील प्रक्रिया हळू होणारी आहे. सैय्यम खूप हवा. कृपा होईल. 

 हरि ओम.

 

Saturday, July 13, 2024

श्री

 

श्री 

 वृत्तीचं कार्य किंव्हा परिणाम खूप खोल, अदृश्य पातळीवर होत असत. तिचं कार्य गूढ आहे, आणि ते परिवर्तन होत असताना विचार, भावना, शरीर, जग, संबंध, अर्थ असे सारे गोष्टी निर्माण होतात. म्हणून अनुभवाला अनेक स्तर आहेत, अनेक स्थिती आहेत, अनेक गुंतागुंतीच प्रकरण आहे. त्याला आपण जीवन म्हणतो. ते होत असताना निर्मिती द्वैत आणि स्वतंत्र जीव अशी भावना निर्माण करते. स्वतंत्र (वेगळेपणा) भाव हा *भास* आहे जो खूप परावलंबी प्रकरणातून होतो! 

 More is the "distance" between any two objects; more is the force of dependence between the two! This means that "object" signifies dependence, relationship, change, connections, urge to control, personal tendencies and many other subtle things of creation. A "thing" is not only visible or physical, but it includes or vibrates also in various invisible planes! The presence of a "thing", therefore, starts at much invisible levels! So some vibration is always going to be present within. The fundamental vibration is the presence of God/ consciousness. 

 वृत्ती किंव्हा अस्तित्वाची शक्ती कसं कार्य करते, हे विचारांच्या खूप पलीकडे प्रकरण आहे! आपण कितीही आटापिटा केला आणि गुंतागुंती उलगडण्याचा प्रयत्न केला, तरी शांतपणा येईल का? आपण "वेगळे" आहोत (जी वृत्ती तसे दर्शवते सध्या) त्यामुळे विचार आणि कृती आपल्याला गुंतून ठेवते. तरीही ह्याचं उत्तर किंव्हा तोडगा विचारांमधून पूर्णपणे सामावलेला नाही. त्यासाठी श्रद्धा बरोबरीने वाढवायला लागते. ती वृत्ती शांत करते. जशी वृत्ती शांत होते, तशी श्रद्धा वाढते. 

 येणारे अनुभव, क्रिया, बदल, ह्या बद्दल चिंता नसावी. तो अस्तित्वाचा गुणधर्म आहे आणि म्हणून त्यात वावरतांना कार्य करणे आणि नामस्मरण करणे ह्या गोष्टी जीवाने जोपासाव्यात. सर्व भगवंत करतो आणि ज्या घडामोडी होत राहतात त्याच्या पाठीमागे त्याची इच्छा असते. 

 हरि ओम.

 

  श्री 

 कार्य होणे. ती दैवी इच्छा आहे. अस्तित्वाची शक्ती आहे. दृश्य कसे घडते, त्यातील घटक कोणते, संबंध कसे, गती किंव्हा गुणांची निर्मिती कशी वगैरे हे कार्य आहे. Action.

 कार्य आहे त्यावरून परिणाम आहे, जीव आहे, संबंध आहे, हेतू आहे, कृती आहे. शोध आहे, भीती आहे, तत्पूर्तेपण, निर्मिती आहे, जग होण्याची व्याख्या आहे (ideas of cosmogony, ancestors, people, environment, connections therefore  exist or get expressed). Therefore the mind "arrives" at the process of synthesis in new ways of imagination, memory, sequence, association, relationship, action etc. What role memory "had" in our lives before will be different from what role it can play now. Hence memory will always be there. What it keeps on creating, is a fruitful inquiry.

 Above is spoken extensively in phenomenology and in inquires of tribal architecture. How people can and do "dwell" is the inquiry. *Anything is valid*, for, the act of making experience or expression valid is fundamental. Philosophically, it is an act of consciousness getting translated as actions of humans. Hence the connection. 

 Therefore all terms of culture, technology etc. will be recreated again by us. Those terms mean synthesis. 

 Such messages are encoded in the following books (to name a few)

 Tribal architecture 

Essential Texts

Search for a form

Pattern Language 

Spaces of the Soul

A lifeworld

Dwelling, Place and Environment 

 हरि ओम.

 

श्री: शांत होणे

श्री: शांत होणे

 

घाई करून चालत नाही. मन अनेक वृत्ती निर्माण करत आणि इथे + तिथे धडपड करायचा अट्टाहास धरतं. मन ही शक्ती आहेआणि एका प्रकारच्या जाणिवेतून हा परिणाम निर्माण होतो. 

 तरीही घाई करून उपयोगाचं नाहीकारण ज्याचा शोध आहेजो मोलाचा अनुभव आहेतो दृश्याच्या परिणामांशी निगडित नाही आहे. त्यावरून शांती भावाची व्याख्या पूर्ण अवलंबून नाही. हे स्वाभाविक आहे. त्यामुळे शोध ही गरज निर्माण होते जीवाची. शोध हे अट्टाहासाने होतो का?! नैसर्गिक प्रक्रिया ही की जेव्हा होईल शांती भावाची प्रचिती तेव्हाच होईल. 

 स्वतः बद्दल विचार केला कि जाणवत कि आपल्या कृतीवर, हेतूवर, वृत्तीवर काहीही ठरवू नये. दृश्य दिसत, परिस्थिती येते, लोकं वागतात, ते बोलतात, ते प्रक्रिया देतात, आपण काहीतरी सांगतो, काहीतरी मांडतो, काहीतरी कार्य करतो – हे कुणावर ही (आणि स्वतःवर ही) अवलंबून मानण्याची गरज नाही. मुळात कुठल्याच अश्या निर्माण होणाऱ्या गोष्टींवर सुरुवात किव्हा शेवट बघू नये (किव्हा तसे विचार आणल्याची गरज का असावी?!). सुरुवात किव्हा शेवट मानणे आणि त्याचा ध्यास घेणे हे खूप दुखला कारण बनू शकत.  बुद्धीची वागणूक अशी आहे कि ते सुरुवात शोधण्याचा प्रयत्न करेल आणि त्याच्या चक्रात आपण वावरत राहिलो तर सुटका नाही. “मूळ” शोधणे किव्हा होणे किव्हा अनुभवणे हे “सुरुवात” संकल्पना पेक्षा वेगळ आहे. मूळ होतांना आपण शांत होतो, विशाल होतो, स्थिरावतो. तसा भाव सुरुवात शोधतांना मिळत नाही.

 म्हणून वृत्ती कुठे चिकटते आणि सारखी मनाला आठवण करत लावते, ते बघावे. ती वृत्ती, त्या संकल्पनेतून काढून भगवंताला अर्पण करा किव्हा वृत्तीला शांत करा. मुख्यतः वृत्ती “ मी” ह्या संकल्पनेला चिकटून राहते म्हणून जन्म, मरण, जीवन ह्याची शाश्वती मिळत नाही आणि भीती वाटते आणि काहीही केल्या ती भीती काही जात नाही. हे मान्य करणे पाहिलं. दुसरी गोष्ट कि त्या भीती बद्दल, जी इतकी सूक्ष्म आहे, ती इतरांना सांगता हि येत नाही पूर्णपणे. म्हणजे ती “निर्माण” झालेली वस्तू आहे, जिच्यात बदल, गुंतागुंती, चंचलपणा राहणार.

 प्रकरण अस आहे कि वृत्ती शांत होऊ देणे. त्याचे अनेक मार्ग असावेत. त्याच्या अगोदर स्वतःला पूर्णपणे स्वीकारा दोष न देता. स्वतःला स्वीकारा यात सर्व जगाला स्वीकारा हे ओघाने आलच. म्हणजे सर्व अस्तित्वाच्या घडामोडी, स्तर, स्थिती, विचार, भावना, अर्थ, संबंध, कार्य – ह्यांना असू देणे. माझा प्रवास, अनुभव, क्रिया, संबंध – ह्या सर्व गोष्टी होत राहणार – त्यातून perfect होण्याची संकल्पना ठरत नाही/ ठरत नसते. प्रवास, अपेक्षा, नाती, संबंध, क्रिया, काम  - कसल्याच गोष्टींची काळजी असू नये/ विषय मानु नये. कुठली गोष्ट कुठल्या रुपात होईल, काय घेऊन येईल, काय दाखवेल आणि काय घडेल आपल्या वावरण्यामुळे  - हे सर्वस्वी भगवंताला सोपवणे आणि आपण शांत राहणे.

 

हरि ओम.

 


श्री: संस्कार

 श्री: संस्कार


Tools become cumbersome if we become dependent on the tool or think "only" from the eyes of the tool. The tool by itself is not complete, but gives  a newer glimpse of the nature of Existence. It will be dependent on space and time (on imagination). Tool is a product of imagination and by using it, the imagination can change too. This reciprocal relationship exists in everything, the inside - outside concept. 

Always be aware of this relationship of the mind. What it creates, how it creates, why it creates and how in turn, it gets engaged by what it creates! संस्कार ह्याला म्हणत असतील.

थोडक्यात शक्तीचा परिचय असे म्हणू शकतो की ते निर्माण करत, त्यातच गुंतून राहत आणि त्या निर्मितीचे संस्कार होत राहतात. हे आत - बाहेर संबंध आहेत. मूळ संस्कारांचे श्रेय भगवंताला आहे, कारण त्यातूनच सर्व निर्मिती होत राहते, परिणाम होतात, वृत्ती येते वगैरे. ह्या आत - बाहेर प्रकरणात अस्तित्वाची प्रचिती येत राहते. आपण अस्तीत्व आहोत, एक शक्तीच कार्य. त्यातून आपण होतो, वावरत राहतो, क्रिया करतो, गुंतून राहतो. हे काही चिंतेच कारण नाही. तो विषय कसा होईल?! हे कार्य होत होणार - तो अस्तित्वाचा स्वभाव आहे. तो स्वभाव जाणून शांत होत राहणे म्हणजे नामस्मरण.

हरि ओम.

Thursday, July 11, 2024

Shree: Data

Shree: Data

Today’s nightmare is ‘data’. But symbolically speaking extrovertedness and dependence of any kind causes fear or a nightmare – as an imagination of the mind. Is it required to be bothered about “data”? I feel it has lost the significance on many grounds as a measure for discovering peace. Here are some of my understandings –

1.       Rate of change is too fast to make any sense of data in terms of variables, meaning, short and long term measures, analysis, consolidation and revelation. A wholesome experience requirtes allowance for change, analysis, consolidation and looking ‘beyond’. It is applicable for life, relationships and anything of phenomenon. Too fast a change disturbs this equation.

2.       Data assimilation is reduced to a linear logic and only some tangible and measurable expression – that too becomes intolerant of many organic, intangible dimensions of existence. A human being is beyond a logical dimension that is the reason we are ‘not’ machines and have feelings and intuition. These work beyond logic and systems of productions. This has to be ironically admitted in an age when we find it increasingly difficult to look beyond any logical framework! By hastening the logical thought – one ends up in that way only – more logic and perhaps more stress and more stupidity! Look at any elder and he/she will remind oneself that their feelings, expectations and approach to life is beyond any logical system of analysis. Herein we are actually asking empathy for elders, which a logical system won’t even acknowledge.

3.       Life, people and situations are ingrained with feelings too – I don’t see data acknowledging this subjective perspective of feelings. And taking a polar stand is also not an answer to buck this tendency. I feel what I feel and increasingly see it pointless to justify any position – this can be either liberating or frustrating.

4.       Data is equated to access, speed, and production. Again, the intangible way unfolds a perspective that even tons of data may not generate. Patience is a virtue that the instant culture cannot imagine.

5.       Data is based on intellect. Awareness of Intangible presence or dimension of Existence is based on trust or faith. Trust also informs the intellect and I only see this dimension of trust getting compromised by increase in speed of change or of generation of data. The ability to accept enormous complexity and contradictions is based on trust. In order to do this, it is not necessary to understand complexity or contradictions. A fundamental connect with anything in a tranquil state of mind is the ingredient of trust. This should be practiced everyday.

6.       Memory is rubbed off. So, the meaning of traditions, culture, environment and how they generate a feeling of peace require to be rediscovered and NOT to be confirmed with established notions of those experiences. Yet decoding the process of reading and conceiving places is essential before it is said as some rhetoric or a formula. Essentially a peaceful place is “felt within as an experience” and is not externally present.

7.       Data assumes a fixing solution to the problem of humanity or thoughts. This, I feel, is going against the nature of Being – that accepting our incompleteness is a natural phenomena and then working our way through it is a fundamental need of a human being.

8.       Data assumes that things ought to be expressed and told always and judgment or evaluation depends on that. I don’t think that this should be the case. There are a lot of spaces that “become” anything or take on any form.

9.       Data assumes refinement, exclusion, perfection, staticness and compartmentalization. Life or Existence is opposite to these values.

Hari Om. 

 


Shree: Resilience

Shree: Resilience

 

Time of peace unfolds. How one becomes peace is a matter of discovery and doesn’t necessarily mean decoding or getting or fixing the relationship of space and time. Variables, the making of the same and then establishing connections – maybe a “tendency” of the mind, but is not a determinant to uncover peace as a feel or character of Existence. The issue is about vibrations and the tendency, if left unchecked, to create ‘fear’ as a way to determine all perceptions, thoughts, actions etc. The issue is about awareness, that is expressed or gets expressed as vibrations through thoughts and feelings and perceptions and situations and connections and changes and responses. It is also not necessarily about responses or sequences or appropriateness or timeliness of actions or reviewing actions or analysis of any kind. It is not necessarily about the nature of Existence as is perceived by the intellect.

This, then becomes, resilience. To arrest change of any kind is the weakest way of being resilient. Anything that allows anything to become, come and go without feeling of any disturbance or of engagement, is resilient in response. Fundamental values, phenomenological stance probably make us more resilient as beings – not for anything, but only as a process of realization.

We only have questions, not answers. I am not sure of anything and that is all ok, I feel.

 

Hari Om. 

 

 


Wednesday, July 10, 2024

श्री

श्री 

वस्तू समजून घेणे हे तेव्हाच शक्य होत जेव्हा आपण दृश्याचा स्वभाव धारण करतो. म्हणजे सुख दुःख भोगतो त्या स्वभावामुळे. आपण गुंतून राहतो. गुंतणे ही वृत्ती आहे आणि कितीही त्यात धडपड केली तरी पूर्ण समाधान त्या वृत्तीतून मिळत नाही. 

तरीही ही सृष्टी, गती, गुण, वृत्ती, परावलंबन गूढ शक्ती मधून निर्माण झालेलं आहे ज्यात आपणही होतो, वावरतो, गुंततो आणि अनुभवतो. हा शक्तीचा परिणाम आहे, तो झेलायला लागणारच. शक्ती ही दैवी क्रिया आहे, भगवंताची इच्छा आहे, म्हणून त्यात दृश्याच स्थान राहणार. 

दृश्य भगवंताची आठवण करून देऊ शकत. जो बाहेरील प्रकार आहे भगवंताचा, तो म्हणजे दृश्य आणि त्यातले अनेक स्तर. जसे आपण अंतर्मुख होऊ, तसा भगवंत जाणवायला लागतो. 

आज काल आपण लोकं खूप आवाजात वावरतो. अती परावलंबी संकल्पना त्रास देते. उतावळेपणा करून, काहीतरी दाखवून काय मिळणार आहे स्वतःला, हे विचारणे. तो मार्ग योग्य नसेल तर सोडून द्यावा. वस्तूच्या मागे लागलो, तर तसेच गुण आपण धारण करतो.  

तसे व्हायचं नसेल तर भगवंताची आठवण करा. आठवण म्हणजे खूप सूक्ष्म होण्याची क्रिया, तो फक्त शब्द नाही. गोष्टींचं होणे, असणे, जाणे, बदलणे ही त्याची इच्छा आहे, त्याच कार्य आहे. म्हणून सतत भगवंत असतोच सर्व गोष्टींच्या पाठीमागे. बुद्धीच्या तर्काने गोष्टींचं मूळ " जाणवत " नाही, कारण सूक्ष्म जाणीव बुद्धीच्या पलीकडे असते. म्हणून त्यासाठी जाणीवा सूक्ष्म व्हायला लागतात. ते झाले की बुद्धीला प्रतिभा शक्ती मिळते. 

हरि ओम.



श्री 

आपण देवावर श्रद्धा ठेवू, की तोच करता आहे आणि योग्यच गोष्टी घडवून आणतो. आपल्याला मूळ माहीत नाही, आपण चिंतेत असतो, मी करता आहे असे समजतो. ही विचार शरणी आहे. ती योग्य नाही कारण त्यात आपल्याला त्रास होतो. दृश्याचे परिणाम असतात, त्यात वावरून ताबा मिळवणे हा हेतू नसावा मनाचा. सर्व निर्मिती आहे, तर कसला ताबा मिळवणार?! दृश्यात भगवंताला ओळखणे हे आपलं ध्येय आहे. Realization.

सर्व गोष्टी पलीकडून आलेल्या असतात आणि गुंतलेल्या देखील. जे येत दृश्यात, त्याला निर्माण करणारी शक्ती भगवंताची आहे, म्हणून सर्वांच्या मुळाशी *तो* आहे. असे का आणि तसे का, ह्यात पडू नये. सध्या विखुरले पणा खूप असेल तर राहू दे. आपले कर्तव्य करावे आणि भगवंताला सोपवावे. भगवंताला धरून ठेवण्याचा प्रवास प्रत्येकाचा निराळा आहे. 

हरि ओम.

Monday, July 08, 2024

श्री: चौकट

श्री: चौकट

 

मुळ शोधू नये – त्याने त्रास पदरात पडेल बुद्धीच्या तर्काने. गोष्टी अश्या का होतात आणि कुठल्या स्वरुपात, आकारात, स्वभावात, गुण धर्म घेऊन “येतात, वारतात आणि बदलतात” हि दैवी शक्ती आहे, त्यात जीवाच काही कर्तृत्व नाही. म्हणून स्वतःची जाणीव दैवी स्थितीची करायला लागते. दैवी स्थितीचा हेतू आणि कार्य खूप वेगळ्या पद्धतीने अस्तित्वात असत, जीवाच्या तुलनेने. म्हणून ती शक्ती काय आहे, कुठला भाव घेऊन साकारलेली आहे, काय कार्य करते, इच्छा काय असावी त्या शक्तीची – हे प्रश्न जाणीव वाढवत उत्तर मिळतात. जाणीव वाढवण्याच कार्य असं आहे कि सर्व स्वीकारणे. पळून जाण्याची गरज नाही किव्हा चौकट असण्याची गरज नाही. कार्यात, व्यक्तीत, वृत्तीत, स्थितीत, आपण चौकट निर्माण करतो, निर्माण करतो आणि तसे वावरतो. चौकट होणे होत असावं. त्यातूनच संबंध, गती, येणे आणि जाणे होत राहत. म्हणजे सर्व एकच आहे आणि बदलत राहणार आहे हे निश्चित.

 आता जाणीव अशी होत जायला हवी कि चौकट निर्माण करतो म्हणजे कुठल्या हेतूने करतो? त्याने काय होत? आपला स्वभाव चौकटीमुळे कसा घडतो? त्यातून कळेल कि चौकट टाकून देण्याची गरज आहे. मी हि चौकट आहे – ती गरजेची आहे का? म्हणून सर्वांवर निरतिशय प्रेम कराव आणि सर्व गोष्टी, वृत्ती, परिस्थिती, कार्य स्वीकाराव्या. सर्व काळ आणि स्थळ स्वीकाराव्या. सर्व आपलाच आहे. सर्व प्रवास हालचालीचा आहे, सर्व प्रवास शांततेकडे होणारा आहे – भगवंत दाखवणारा आहे.

 हि एक गोष्ट. दुसरी गोष्ट अशी कि स्पष्टीकरण देणे म्हणजे त्या भूमिकेत शिरणे – त्याचा परिणाम असतो. तो करावा कि नाही, हा प्रश्न आहे. बोलून, स्पष्टीकरण देऊन, आपण तीच वृत्ती होतो. म्हणून काय बोलाव आणि विचार करावा हे ध्यानात ठेवावे. आणि शेवटच कि सर्व गोष्टी बुद्धीच्या दृष्टीने “चक्रात” वावरतात म्हणून बोलण्याला काही समाधानकारक अंत मिळेल असे काही सांगता येत नाही! हे कळले कि समाधान आपण होतो – आपण बोलू किव्हा नाही बोलू! समाधान कुठल्याही परावलंबी संकल्पनेला धरून नसते.

 चक्र मनात असत आणि ते भगवंताकडून निर्माण होत, परिणाम होत, वृत्तीतून ते बुद्धी पर्यंत येत आणि क्रिया घडवत. ते थांबवता येत नाही आणि कदाचित थांबवू हि नये. म्हणून चक्र शांत करणे हे अध्यात्माच ध्येय आहे/ परिणाम आहे. आपण भगवंताच्या सानिध्यात आहोत किव्हा त्याच्याच घरी वावरत आहोत हे शांत होऊ जाणवत.

 

हरी ओम.