श्री
श्री
सांगणे, विचार मांडणे आणि त्यातून सिद्ध होणे, हा अट्टाहास सोडून देणे. जे सांगणे असेल, ते दृश्यशीच मांडणी असेल, म्हणजे परावलंबन, परिस्थिती, साखळी, भाव, चक्र, विघटन, तात्पुरतेपण, परिणाम असे काहीसे घटक. सूक्ष्म होत जाताना हे घटक असतील, फक्त त्याचे रूप बदलतील. म्हणजे संबंध किंव्हा जाणीव बदलू पहिल.
आपण करण्यासाठी, सांगण्यासाठी, ऐकण्यासाठी, अर्थ सिद्ध होत नसतो, किंव्हा तो हेतू धरून सिद्ध होऊ नये. हेतू धरणे आणि शांती लाभणे हे विभिन्न क्रिया आहेत.
शांती धरण्यासाठी किंव्हा स्थिरावण्यासाठी हेतूचा *त्याग* करायला लागतो, म्हणजे जरी काहीही उमटलं किंव्हा प्रकट झालं, तरीही शांती स्पंदनाना धक्का लागता काम नये, त्यातून आपली नजर हटता कामा नये. शांती भावात कायम वावरायला हवे, तोच भाव अस्तित्वात *कायम असावा*.
हरि ओम.
श्री
कार्य करणे महत्वाचे आहे. जीवासाठी कार्याचा अर्थ काय असतो, हे ओळखणे त्याचे ध्येय मानून घ्यावे. इथे "ध्येय" शब्द "जाणीव" ह्या अर्थाने वापरला गेला आहे. ध्येय जाणिवेपेक्षा वेगळी असावी का? किंव्हा ध्येयाची दिशा किंव्हा मार्ग जाणीव शुद्ध होण्यासाठी वापराव नाही का?
जाणीव शुद्ध होणे हे ध्येय राबवताना अनेक गोंधळ जीवाला साहजिकच त्रस्त करतील. हे होणार. त्यातून स्थिरतेचे उत्तर किंवा अर्थ अनुभवणे अभिप्रेत आहे. प्रपंच तसा तापदायक आपली वृत्ती करते. म्हणून संबंध असे निर्माण करावे, की तो तापदायक न होता, शांतीतच स्थिरावेल.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home