श्री
श्री
न्यून बाळगू नका. कुणी कुणाच्या संबंधात येत नाही, आणि त्यातून इतक्या वेगात बदल आपण घडून आणतो, की त्याचा परिणाम भलताच होऊन बसतो स्वतःवर आणि इतरांवर. काय आहे, की हेतु स्वच्छ जरी असला, तरी वेगामुळे, विघटन मुळे, तो खूप स्वार्थी वाटू शकतो किंव्हा निरर्थकही. It is a matter of perspective or imagination because of relative motion.
सत्य पहिले तर हालचाल किंवा वेगळेपणा काहीच नसते. तरीही जीवाच्या रूपामुळे तसे भासते आपल्याला आणि आपण प्रतिक्रिया देतो आणि प्रपंच भोगतो. ह्याला संकल्पना नाही म्हणायचे तर काय?!! काही जण ह्याला स्वप्नही म्हणतात किंव्हा दारूची धुंदी.
तात्पर्य हे, की "वेगाने" गोष्टी वेगळ्या वाटू शकतात आणि खूप त्रासिक परिणाम करतात मनावर. Fragmentation. विघटन क्रियेमुळे वेग वाढतो. तो वाढला की परत जोडण्याचा अट्टाहास आपण धरतो. तो नाही जोडता आला, की त्रासिक होतो. हे चक्र आहे.
थोडक्यात, शांत होणे म्हणजे वेग हळू करणे. तो हळू होणे म्हणजे अस्तित्वाचे स्वरूप सूक्ष्म होत जाणे, एकात एक मिसळणे आणि शेवटी शुद्ध, स्थिर होणे.
हरि ओम
0 Comments:
Post a Comment
<< Home