श्री
श्री
एखादे विचार असे का येऊ पाहतात आणि असे का निर्माण होतात, हे सर्वस्वी श्रद्धेने स्वीकारायला लागते. श्रद्धा म्हणजे अदृश्य स्थितीच्या कार्यावर विश्वास. किंबहूना श्रद्धा आणि अदृश्य स्थितीचा खूप जवळचा संबंध असावा. किंव्हा श्रद्धेच्या बळावर अदृश्य स्थिती पर्यंत मन पोहोचू शकते.
अदृश्य शक्तीचे कार्य असते, भाव असतो, जाणीव असते. त्यातूनच स्थळ आणि काळाचे रूप आणि परिणाम प्रकट होत राहतात आणि परत त्या अदृश्यात गडप होतात.
लोकांना वाटत की अदृश्य म्हणजे नसणे किंव्हा न दिसणे. तो फार स्थूल अर्थ झाला. अदृश्य म्हणजे इंद्रियगोचर नसणे, इंद्रियांच्या भाषेत न सांगता येणे, आकारहीन असणे, पलीकडे असणे, शांती भाव असणे,कायम असणे, निरहेतू कार्यात वावरणे. हा *भाव आहे*, हे विसरू नये, फक्त शाब्दिक संकल्पना नाही. म्हणून त्या भावनेत स्थिर व्हायला लागतं. सर्व विश्व त्या माध्यातून प्रकट होत राहतं, आणि त्या सर्व विश्वाचा भाव आहे शांती किंव्हा भगवंत.
मार्ग ज्याचा त्याचा शोधायचा असतो किंवा आत्मसात करायचा असतो. इथे दुसरा कुणी काही आपल्यासाठी करू शकत नाही. तसंच आपण दुसऱ्यांसाठी पूर्णतः देऊ शकत नाही. गोष्टींचे, व्यक्तींचे होणे, वावरणे, जाणे - हे असणार आहे अनुभवात. सर्व रूप येऊ पाहतील आणि निघून जातील - ह्या हालचाली अभिप्रेत आहेत. त्या कार्यावर श्रद्धा ठेवावी.
हरि ओम.
श्री
सर्व भगवंत माध्यम कार्य करते. आपल्या जाणिवेत असे आणायला हवे की जे काही आपण करण्याची इच्छा व्यक्त करतो, आणि अनुभव येऊ पाहतात, ते भगवंताशी संबंधित असतात, त्याच्या असण्यामुळे प्रचितीला येतात आणि त्याच्यासाठीच असतात. म्हणजे आपला हेतू भगवंताला अनुसरून असावा.
प्रपंचांच्या मागण्याला कधीही कंटाळू नये, पळून जाऊ नये, त्रासिक होऊ नये, चिंतेत राहू नये. प्रपंच भगवंताने मांडला आहे, आपण त्यात आपले कार्य करावे आणि त्याचे स्मरण ठेवावे. आपली जाणीव सध्या मर्यादित असावी, तर तसे असू द्यावे. त्या मर्यादेचा स्वीकार करून, प्रमाण मानून भगवंत ओळखावा आणि त्याच्यात विलीन व्हावे. विचार आणि भावनेच्या भाषेतून भगवंत पर्यंत पोहोचावे.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home