श्री
श्री
कार्य का करतो आपण विचारांचे, भावनांचे, कृतीचे, ह्याचे चिंतन असावे लागते. Why does one think and what is thinking?चिंतन ही एक क्रिया समजावी, जिथे शंका, विचार, विघटन, एकत्रीकरण, संबंध, जाणीव होणे, शिस्तीत असणे, सैय्यम, श्रद्धा - हे भावना वावरत असावेत. त्यातून मार्ग जाणिवात येण्याची शक्यता उद्भवते. नामस्मरण म्हणजे एक प्रकारे चिंतनच आहे.
भगवंताचा भाव होण्याला बऱ्याच क्रिया असावेत. जरीही मूळ क्रिया नामस्मरणाची ठरवली गेली, ते होत राहताना, इतर चिंतनाचे क्रिया पदरात सामील होतील. म्हणजे अपेक्षांचे महत्व कमी होईल, शंका येतील आणि मावळतील, श्रद्धा वाढत राहील, कृती आणि कार्यात फरक जाणिवेत येईल, चिंता आणि कष्ट कमी प्रकट होतील, भीती कमी होईल, स्पष्टीकरण दुसऱ्यांसाठी कमी होत जाईल, स्वतःमध्ये अंतर्मुख होण्याची प्रक्रिया सुरू होईल, स्वतःचे विचार फक्त बघत राहण्याची शक्ती संपादन होईल, मूळ शोधण्याचा अट्टाहास कमी होईल, सारे स्वीकारले जाईल, वृत्तीचा प्रभाव कमी होत जाईल, वगैरे...
वरील क्रिया एकाच वेळेला होतात. *एकाच वेळेला* - हा भाव, शब्द, संबंध, साखळी, चक्र - असे सारे सुचवितो. म्हणजे चिंतन कार्य स्वीकारावे, नैसर्गिक मानावे आणि त्या कार्याच्या परिणामांवर श्रद्धा ठेवावी. म्हणजे चिंतन शांती मध्ये अनुभवणे आणि त्यातून काय मिळेल असा विचार जरी आला, तरी त्याला प्रतिक्रिया न देणे.
थोडक्यात आपण काय करतो? विचारांच्या मागे जाण्याची अपेक्षा कमी करतो. विचार ही एक स्थिती आहे, ज्यात गुंतून राहण्याची गरज नाही असे स्वीकारतो. विचारांची साखळी गूढ आहे, हे स्वीकारतो. विचारातून स्वतःला सिद्ध करण्याचा अट्टाहास सोडून देतो. विचारांवर प्रतिक्रिया देत नाही. जर विचार, ह्या घटकेवर प्रतिक्रिया देण्याची गरज उरली नाही, तर त्यात स्थळ आणि काळावर देखील प्रतिक्रिया देणे थांबते. म्हणजेच सूक्ष्मपणा येतो आणि शांतीने वावरणे शक्य होते.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home