श्री
श्री
आपण कधी कधी खूप आपल्याच प्रपंचाचा विषयात बुडून गेलो असतो. बदल, गती, संबंध, साखळी आपल्या हुकूमावर नाही प्रकट होत किंव्हा रूप घेत. ह्याचाच अर्थ इच्छा भगवंताची काम करते, आपली नाही.
ही गोष्ट स्वीकारणे म्हणजे कसलाही स्थळाचा, काळाचा, क्रियेचा, घडामोडींचा अट्टाहास धरू नये. मी कुठेही जाईन, कधीही जाईन, कसेही जाईन, कसेही हालचालीत असीन, ऐकीन, बोलीन, हसीन...त्यात हेतू संपादन असू नये.
आज हे झाले, उद्या ते झाले...सर्व मान्य असावे. कोण काय बोलेल, किंव्हा प्रतिक्रिया देईल, ह्याचे खरेच महत्व नाही. तसे बोलणे एका प्रकारे तात्पुरते, अर्धवट, खोटे असते. त्यावरून मतितार्थ काही करून घेण्याची तशी गरज नाही.
बोलणे आणि ऐकणे आणि कुठलाही व्यवहार संपत नाही. प्रवाह संपत नाही, चक्र संपत नाही, बदल संपत नाही. हेतू गळून जायला हवा. वेगातून किंव्हा थांबून तसे काही सत्य उलगडत नाही पूर्णपणे.
सत्यात विलीन होणे आहे.
हरि ओम
0 Comments:
Post a Comment
<< Home