Friday, August 08, 2025

श्री

श्री 

गती, संबंध, विचार एका दृष्टीने प्रकट होणारी क्रिया, मर्यादित स्वरूप, तात्पुरतेपण, वेगळेपण, वृत्ती दर्शवतात, हे स्मरणात राहु द्यावे, म्हणजे आपण त्यात सिद्ध होण्याच्या हेतुने गुंतत नाही. म्हणजे जो काही संबंध होत असतो, साखळी होते, कार्य घडते, ते मोकळ्या मनाने येऊ द्यावे, बघावे, वावरावे, सोडून द्यावे. गोष्टी कशा होतात किंव्हा आकारास येतात आणि कार्य घडतं, हे गूढ आहे आणि विचारांच्या पलीकडे आहे. 

विचारांची आणि भावनांची मर्यादा असल्यामुळे, त्या भाषेचा अट्टाहास कदाचित धरला जातो आणि अपेक्षा त्यावरूनही निर्माण होऊ शकतात. असे का घडले, ह्याच पद्धतीने का घडले, असे का बोलले गेले, असे का काम झाले वगैरे... हे विचार येत राहणे त्या अपेक्षांचे चित्रण आहे. त्याने दुःख होईल, दुसरे काहीही नाही. म्हणजे दुःख भाव परावलंबी आणि काल्पनिक अस्थिर भाव म्हणायचा. त्या पद्धतीने सुखा बद्दलही आपण सांगू शकतो. 

मग दोन्ही भावना काल्पनिक, तात्पुरत्या झाल्या! काय केलं म्हणजे दुःख किंव्हा सुख होईल, हे विचार करणे मर्यादित ठरते आणि त्रास देते. चिरकालीन शांत भाव कसा संक्रांत होऊ द्यायचा ह्याचे चिंतन करावे. शांती भाव सत्य आहे, काल्पनिक नाही, अस्थिर नाही, स्थळ किंव्हा काळाच्या भाषेत नाही.

तरीही विचारांची शक्ती ही समजायची की ती सत्याचे कार्य दाखवून देऊ शकते, मार्ग निर्माण करू शकते, आधार निर्माण करू शकते आणि कुठल्याही क्रियेचे स्पष्टीकरण स्वतःला देऊ शकते, जेणे करून जाणीव स्वच्छ राहते आणि मनाचा गोंधळ किंव्हा घाबरून जाण्याची शक्यता कमी होऊ शकते. हा मार्ग सरळ असावा असे नाही. आगीतून जाऊ असेही वाटू शकेल. 

तो मार्ग समजावा. मार्ग असतो प्रत्येकाला, जो भगवंताने दिला आहे. भगवंतावर श्रद्धा ठेवून त्या मार्गावर लागावे. काहीही जरी झाले, तरीही आपली श्रद्धा स्थिर ठेवावी. योग्य फळ अनुभवात प्रकट होतेच.

हरि ओम.


श्री 

विचारात घर्षण होतेच. Criticalness. तो अविभाज्य भाग आहे मनाचा. लोकांना उगाचच वाटत की सर्व खात्याटोप घर्षण "काढून" टाकलं की विचार "मोकळे" होतील. आणि सध्याची जागतिक प्रगतीची दिशा तशी वाटचाल करीत आहे, असे वाटते. त्यातून production, multitasking, efficiency, faster, AI असे संकल्पना मनाने निर्माण केलेले दिसत आहेत. 

तो मार्ग विवेक बुद्धी वापरून पारखावा. घर्षण (context, limitations, situation) असणारच, आणि त्यातून शांत होण्याचा अभ्यास आहे, _घर्षण काढून देण्याचा नाही._ उलट असही म्हणतात येईल, की घर्षण शिवाय विचारांचा जोर नाही आणि शांती नाही. किंव्हा घर्षण काढूनच टाकलं, तर विचार उरणार नाही किंव्हा विचारांना काहीही योग्य "थारा" राहणार नाही. 

म्हणून झगडा महत्वाचा असतो. तो नको म्हणणे वेडेपणा आहे.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home