Wednesday, August 06, 2025

श्री

 श्री 


कार्य होणे, ह्यात भगवत इच्छा सामील असते. कार्याचा उगम, व्यवहार, वावर, परिणाम, हे सर्व भगवंत बघतो. म्हणून त्यातून प्रकट आणि संबंधित होणाऱ्या सर्व रूप आणि आकार तोच बघतो. सर्व वस्तूंच्या आत तोच स्थित असतो. साहजिकच त्याचा अर्थ असा निघून येतो की प्रकट होण्यात "बहिर्मुख वृत्ती आणि स्मरण" प्रज्वलित ठेवले जाते आणि भगवंत होण्यात "अंतर्मुख भाव" प्रज्वलित होतो.

म्हणजे अस्तित्वाच्या रूपाला दोन भाग आहेत - जे अंतर्मुख आणि बहिर्मुख असे संबोधले जाते. आपल्याला लक्ष (जाणीव) अंतर्मुख बनवायची असते. तशी जाणीव झाली, की भगवंताचा अनुभव मनात संक्रांत होतो. शेवटी मन शक्तीचा प्रकार आहे...त्यातूनच अस्तित्वाशी संबंध आपला _जोडला_ जातो. शक्तीच्या एका धरून ठेवलेल्या स्थितीमुळे आपण विचारांशी आणि भावनांशी एकरूप होतो आणि ते केल्यामुळे दृश्याचे व्यवहार तसे दिसून येतात. शक्तीचे खरे रूप कळले, म्हणजे सूक्ष्म पर्यंत आपण गेलो, की शांती भाव उदयास येतो.

हरि ओम.


श्री 

पळून जाणे ह्यातून काहीही होत नाही. आतील चंचलता का असते, हे सगळ्यांना साहजिकच माहीत असणार. आणि ती चंचलता आतील मार्गाकडे खुणावते. त्याला दुर्लक्ष करण्याची जरुरी नाही, किंबहुना तसे करताही येणार नाही. 

चंचलता भगवंताच्या शक्तीने दिलेली आहे, म्हणून तिचा स्वीकार करावा. त्यातून भगवंत पर्यंत वाट असते, जी शोधायची असते. 

जो काही आपण अर्थ समजून घेतो अस्तित्वात वावरण्याचा, तो सर्वस्वी भगवंतामुळे प्रज्वलित झालेला असतो. आपल्या होण्याला, वावरणाऱ्या, बदलांच्या स्थितीला भगवंताच्या असण्याची *पूर्ण* संबंध आहे. म्हणून काल, आज, उद्या - ह्यांचे स्थान, संकल्पना, अनुभव, व्यवहार - पूर्णपणे त्याच्या स्वाधीन असते. त्यावर निर्धास्त श्रद्धा ठेवावी.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home