Wednesday, August 06, 2025

श्री

श्री 

संयम ठेवणे, ह्याचे स्थान आहे. मनासारखे गोष्टी न घडणे आणि शेवटी विषयाचा विट येणे, त्यातच आपले हित आहे. कारण विषय सोडून देखील ज्यात आनंद भाव येतो, तोच कायम टिकतो. 

आपण चांगले कार्य करत राहणे. ह्यात "चांगलेपणा" म्हणजे निरहेतू, निःस्वार्थी भाव. ह्याचा अर्थ रुपात किंवा देहात न मर्यादित असणारे कार्य. किंव्हा ते कार्य जे अशा ठिकाण्यातून प्रकट होते, ज्यात रूपाचा किंव्हा देहाचा लाग नाही. 

साहजिकच तसा भाव होण्यात खूप श्रद्धा आणि सैय्यम बाळगायला लागते. त्वरित परिवर्तन होईल, असे समजणे चुकीचे ठरते, कारण सूक्ष्म स्थितीचा परिणाम सर्व व्यापी असतो, खूप आतून येतो आणि सर्व हालचालींच्या पलीकडून प्रकट होतो. बाहेरच्या हालचालीतून सूक्ष्म प्रकृतीत जाणे आणि परत तिथून दृश्यात अवतरणे - हे कार्य खूप गूढ आहे. त्यावर असीम श्रद्धा स्थिर करावी. 

निर्धास्तपणे योग्य कार्य करावे. त्याचे चांगले फळ निश्चित होते. 

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home