Friday, August 01, 2025

श्री

 श्री 


कार्य सर्व भगवंत करतो, त्याची अस्तित्व शक्ती करते किंव्हा त्यालाच शक्ती म्हणतात. कार्य, हेच अस्तित्व आहे आणि ते कायम असणारं आहे. कार्य, हे अनंत आहे, म्हणून त्याला हेतू ही उपमा अपुरी पडते. कार्य, हा अंतर्मुख भाव आहे. कार्याचे अनेक स्तर असावेत आणि जाणिवे प्रमाणे त्यांचे त्यांचे भाव आणि परावलंबांच्या क्रिया होत राहतात. तरीही सारे कार्यात, जे मूळ साखळीत ओवलेल कार्य आहे, ते आहे भगवंताचे. दृश्यात साखळीचा अर्थ पहिले काय,दुसरे काय, आधी काय, महत्वाचे काय असे असते. पण अध्यात्माच्या दृष्टीने साखळीचा अर्थ विश्लेषण प्रयोग असतो, म्हणून जीवाने साखळी स्वतः ओळखावी लागते आणि त्यातून भगवत भाव प्रचितीला आणायला लागतो. त्याला म्हणून गुढपणा असतो. आणि त्यातूनच शांत होणे ही संकल्पना येते. सर्व एकातच सामावलेले असते, म्हणून सर्व *एक आहे* हे जाणून घेणे.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home