श्री
श्री
वृत्तीचे उगम बिंदू नसते, ते खूप साऱ्या संस्कारातून, साखळीतील प्रवाहात राहते आणि संबंधित होते, क्रिया करवते, भाव आणते, चक्र निर्माण करते, परिणाम झेलायला लावते, वेगळेपण भासवते, विघटित दृश्य दाखवते, भावना त्यामुळे प्रज्वलित ठेवते, विषय निर्माण करवते वगैरे. म्हणून, वृत्ती पूर्ण स्वीकारायला लागते स्वतःची. तो झाला आपला अनुभव, जो प्रमाण मानावा आणि त्यातून न्यून वाटून घेऊ नये आणि दुसऱ्याची तुलना देखील करू नये आणि चिंताही करू नये. अर्धवट वाटत राहणे, हा वृत्तीतून आलेला भाव आहे आणि तो शांती बाळगून नाहीसा होईल. म्हणजे आपल्यात काही तसा दोष नसतो आणि वाईट विनाकारण वाटण्याचीही गरज नाही.
एकदा हे ध्यानात ठेवले की त्याप्रमाणे स्वच्छ मनाने मार्ग पत्करायला हरकत नाही. मार्गाचे योग्य फळ भगवंत देईलच, ह्यावर श्रद्धा असावी. परिवर्तन, साखळी, गुंतागुंती, बदल - ह्यावर विनाकारण चिंता असू नये. ही सर्व भगवत इच्छा आहे, तर त्या प्रमाणे त्याकडे बघावे.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home