श्री
श्री
दररोजचे स्मरण वेगळे असावे. कुठल्याही गोष्टीला, म्हणजे मर्यादेच्या संकल्पनेला, धरण्यात आपले हित नसावे. धरणे वृत्तीतून येते आणि त्याला आपण सर्वस्व मानतो. वृत्ती आहे, कारण ती भगवंताकडून येते. पण वृत्ती काय दाखवते आणि परिणाम करते, हे बघावे. ती आकार दाखवेल किंव्हा जाणिवेत आणून देईल किंवा शांत आत्मा, जिथे वृत्ती शांत होते. ह्यावरून कळते की "मी" ही संकल्पना अस्तित्वाच्या स्थितीशी निगडित आहे, आणि ती शांतही होऊ शकते. म्हणजे "मी कोण" हे रूप किंव्हा आकाराने किंव्हा दृश्याने ठरवावे का, संबंधित असावे का?
मनाचे कार्य म्हणजे विघटन करत राहणे आणि शांती शोधत राहणे. दोघांमध्ये दोघांचे _मिसळलेले_ प्रमाण असते (yin and Yang diagram) आणि त्यातून _गती किंव्हा बदल_ जाणवत राहतात. जितके प्रमाण विघटनेचे जास्ती, तितके स्मरण आकुंचित, तात्पुरते आणि वेगवान. जितके शांतीचे प्रमाण अधिक, तितका बदल हळुवार आणि सूक्ष्मपणा अधिक.
कशाला "धरावे" हे मनाने ठरवायचे आहे.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home