Monday, August 04, 2025

श्री

 श्री 


दृश्य म्हणजे बदल, मिश्रण, गुंतणे, साखळी, भाव. This is the pattern of perception or memory or imagination. Pattern also generates feelings or a "sense" of existence. So the pattern is _aware_ of itself. 

त्यात स्थिर होणे, हे अभिप्रेत आहे, कारण आपण ह्या सर्व मिश्रित गोष्टींमुळे हेतू आणतो, चक्र करतो, विषय सोडवत बसतो आणि परिणाम भोगतो. आज एक तर उद्या वेगळे आणि आज काय, काल काय की उद्या काय - हा सर्व बदलणारा प्रवाह आणि जाळ्यासारखा एकात एक गुंतलेला, म्हणून सर्वांचा सहभाग असतो भाव निर्माण करण्यात. हे होत राहणार...त्या अर्थाने रूप, आकार, गती, संदर्भ, परिस्थिती गूढ असतात आणि ते "काल्पनिक" क्रिया दर्शवतात. अस्तित्वाच एक अंग जे आहे, ते म्हणजे कल्पना रचणे आणि त्या प्रमाणे कार्य करायला भाग पाडणे. त्या अर्थाने कल्पनेला खूप मोठा आणि गूढ अर्थ आहे आणि खऱ्या अर्थाने कल्पना होणे, ही भगवत इच्छाच आहे आणि कार्य आहे. 

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home