Saturday, October 11, 2025

श्री

 श्री 


माणूस असल्यामुळे, त्या जीवाचा स्वभाव असणार आहे, जो परिणाम भोगेल, विचार करेल, भावना जाणवतील, संबंधात येईल, प्रश्न असतील, शोध होईल, गोंधळ उडेल, सातत्याने प्रयत्न असतील, श्रद्धेचे उगम होईल....

वृत्ती, विचार, भावना, देह ह्या साखळीचे मिश्रण म्हणजे प्रपंच किंव्हा परिस्थितीची _जाणीव_ होत राहणे. त्या साखळीला गृहीत धरल्यामुळे होणाऱ्या भावना म्हणजे तात्पुरतेपणा, वेगळेपणा, अस्थिरता वगैरे. म्हणजे चक्र असण्याची जाणीव किंव्हा बुद्धी असल्याचे परिणाम. 

ह्या वरील परिस्थितीचे भान येत असताना भगवत भावाचे स्थान निर्माण करण्याची गरज माणूस (आपण) शोधतो, किंव्हा स्थिरता प्रकट होण्याची शक्यता. सगळं जिवंत राहण्याचीच लक्षणं आहेत, पण _सत्यता होणे_ , हे ही शांतीचे स्वरूप आहे अनुभवात. सत्यात स्थिर होणे, कायम राहणे, म्हणजे पलीकडे जाणे, अदृश्याची प्रचिती होणे. 

अदृश्य देखील हे एक सत्य, आनंदी, शांत, शुद्ध *माध्यम* आहे अस्तित्वात. त्याच्या असण्यामुळे त्याचा परिणाम *कार्य* होण्यात घडतो, प्रचितीला येतो, जाणवतो. ते कार्य होताना, *स्मरण* अनेक स्तरांच्या साखळीत घडते, ज्यावरून जीव ही *भावना* (perception) प्रचितीला किंवा उदयास येते. 

Interestingly there is a book on "Questions of perception". Maybe the inquiry would be that what *states* of existences could be accessed through perception? Is it only a body or mind or intellect or something even more subtle than those? And would subtle states inform spatial experiences?...So is spatiality only visual or mental or subtle than that or _coming_ from subtle states? 

हरि ओम.



श्री 

एकटेपणा आणि आपुलकी ह्या दोघांचा मिश्रित वावर आपल्या भावनेत (perception) स्थित असतो. ते भावना एका विशिष्ट प्रकट होणाऱ्या *कार्यामुळे* निर्माण होतात, म्हणजे ते अनुभवाच्या स्थानात असतात. त्यातून आपण क्रिया करतो, संबंध जोडायला घेतो, व्यवहार करतो, आपले आणि परके हे व्याख्या लावतो वगैरे...

ह्या भावनांचा उगम किंव्हा कार्य भगवंत माध्यम आहे. ते असणे ही भगवत इच्छा स्वीकारावी. त्या भावनांच्या व्यवहारातून आपल्याला स्वच्छ आपुलकी भावनेत स्थिर व्हायचे आहेत. 

तो आपला प्रवास झाला.

हरि ओम.



श्री 

भोग कुणाला टळले नाहीत. भोग हे कोड किंव्हा विषय नाही. ते असणार  आपल्या विशिष्ठ अस्तित्वाच्या जाणिवेमुळे. त्याला प्रमाण मानून, त्याचा अर्थ समजून घेऊन शांतीचा प्रवास पत्करायचा आहे आपल्याला.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home