श्री
श्री
श्रद्धा, म्हणजे अंतर्मुख होणे, सर्व रूपाच्या हालचालींच्या पलीकडे स्थित होणे, हे कदाचित हळू होते मनात...सातत्याने नामाची आठवण काढली तर.
विचार, हे परावलंबी प्रकरण आहे. ते स्थळ, काळ, क्रिया, रूप, आकार, वृत्ती, परिस्थिती ह्यावर अवलंबून राहते. कारण ह्या गोष्टी अस्थिर असतात, विचारही अस्थिर राहतात आणि त्यातील एक परिणाम असा होतो की बेचैनी वाटते भीती वाटते, तात्पुरते वाटते (तशी जाणीव आहे विचारातच किंव्हा आत ते बाहेर असणाऱ्या संबंधांचीही जाणीव दिली आहे).
आधार वाटण्यासाठी आपण खूप साऱ्या विषयांवर अवलंबून राहण्याचा ध्यास घेतो - जसे की नाती गोती, काम, अभिमान, कर्तृत्व, माहिती, गोष्टींचा उपभोग, शरीराच्या मागण्या वगैरे...त्यातून त्या गोष्टींचे खूप समर्थन करतो आणि बडबड करत राहतो, जसं की बोलून सर्व सुरळीत होईल किंव्हा रिकामे होईल!! जी वृत्ती असते आत, त्यातून बोलल जातं किंव्हा संकल्पना मांडल्या जातात आणि ते संस्कार आणखीन घट्ट होतात मनात. हा मनाचा स्वभाव दुहेरी तलवारासारखा आहे. जे रोवून घालू, त्याचेच झाड होते आणि फळं भोगायला लागतात.
अंतर्मुख होण्याची क्रिया, म्हणजे वरील परावलंबी गोष्ट शिथिल करणे, आणि शुद्ध शक्तीची जाणीव जागृत होऊ देणे. त्याचा दुसरा अर्थ हा की स्थळ आणि काळाच्या हालचालींच्या पलीकडे भाव स्थित होणे आणि त्या हालचालींचा म्हणून परिणाम न होणे. थोडक्यात शांती लाभणे.
हरि ओम

0 Comments:
Post a Comment
<< Home