Friday, January 31, 2025

श्री

 श्री 


आपण किंव्हा कुठलही रूप दृश्यात वावरणार किंव्हा कुठलही बिंदू, शक्तीचे डोह असते. Outlet. शक्ती किंवा अस्तीत्व भाव किंव्हा मूळ तत्व आहे _म्हणून_ गती, गुण, संबंध, बदल, क्रिया, परिणाम आहे. आपण सतत शुध्द स्पंदनेतून प्रतिक्रिया प्रकट करत असतो. We are the receivers of signals and express them in the phenomenal world where those signals transform and create an effect. 

मला माहित नाही की हे कार्य आपण का विसरतो - कदाचित ती भगवंताची इच्छा असेल - परिवर्तन होऊन गुंतून राहणे आणि वावरणे आणि त्याचे पाऊल गहन असणे. मी असा का आणि सतत प्रश्नात का असतो, हे दैवी इच्छा मानणे आणि त्यावरून जो काही परिणाम होईल, तो स्वीकारणे. त्रासून घेण्याची काय गरज आहे मग?! 

तात्पुरतेपण, रूप, अर्ध सत्य भाव - ह्याने काहीही निष्कर्ष निघत नाही! म्हणजे ह्या भावनेला तसा काही हेतू नाही! परिणाम, जो काही वाट्याला येतो, त्याला खाजगी मानू नये, किंव्हा मनाला लावून घेऊ नये. Don't take the phenomenon personally! 

ह्याचाच अर्थ की शांत व्हावे. 

हरि ओम.

Wednesday, January 29, 2025

श्री

श्री 

अस्तीत्व भाव हे नामाच्या सामर्थ्याने, भगवंताच्या कृपेने आत्मसात होऊ शकते. जसे सध्याचे अनुभव, जिवंत असण्याचा भाव, अवलंबून परिस्थिती, विचार चक्र, गुंतून राहण्याची गरज _खरे वाटते_ (मग त्याला "कारण" कोणतेही असो); तसच *भगवंत* खरा आणि सत्य असतो. 

"कारण" ही शक्तीची निर्मिती होणारी क्रिया आहे - जे सुक्षमापासून ते अनेक स्तरात उतरता उतरता शेवटी दृश्यात किंव्हा स्थूलात प्रकट होते (emergence). म्हणजे मी ही संकल्पना किंव्हा दृश्यांची कुठलीही घडामोडी - ह्यांना अनेक सूक्ष्म पाठीमागचे कंगोरे असतात आणि पुढेही येतात आणि मध्येही असतात! दृश्य फक्त वरची स्थिती आहे, जिला सूक्ष्म स्थिती "कारण" बनते व्हायला. 

Emergence is often seen to be acknowledged even in the concept of behavioral geography by tribals in their understanding or sense of relationship to geography. One example is of Pueblo Indians and there are countless others too in other ancient worldviews. So the point is: this learning of self can be *realized* in any medium in any concept of space and time. Since it is realized, it should be the *truth* beyond any known concept or belief.

हरि ओम.

श्री

 श्री 


जिवंतपणाचे रुप भगवत शक्ती मुळे प्रकट होते. त्यात अनेक क्रिया होऊन स्मरण शक्ती किंव्हा भाव तैय्यार होतो, ज्यामुळे शुध्द भगवत भाव "विसरायला" होत - इतकं एकनिष्ठ आपले मन दृष्याशि होते! म्हणजेच की मन हे कुठल्याही शक्तीचे संकल्पना निर्माण करू शकते आणि त्याचे परिणामही भोगते! ह्याला "चक्र" असे संबोधित केले आहे. साहजिकच, चक्राच्या आत शिरणे आणि बाहेर येणे (म्हणजे शांत होणे) संभव आहे. निर्मिती सुरू करून विस्तार पावणे जशी क्रिया आहे, तसेच शांत होऊन सगळीकडे सत्य, सूक्ष्म स्थितीत स्थिर होणे आहे. दोन्हीही आपणच करतो! दोन्हीही एकाच अस्तीत्व नाण्याचे दोन बाजू आहेत! Wave/ space _and_ particle/ form. दोन्हीत तेच अस्तीत्व वस्तू आहे, फक्त रूप निराळे आहे. वेगळेपणा भ्रम आहे परिणाम भोगण्याचा - तो सत्य नाही. नाण एकच आहे, ह्यासाठी आपण स्थिर व्यायला हवे. 

प्रपंच असतोच, आणि अनुभव आपल्या रूपाला साजेस तशे येतात. पण त्यात शुध्द भाव ओळखता आला पाहिजे. कुठल्याच बिंदुची, थेंबाची, रुपाची, संकल्पनांची, भावनेची चिंता करू नये - अजिबात नाही. सर्व भगवंत आहे, ह्यावर श्रद्धा भक्कम करणे. म्हणजे आपण स्वस्थ चित्त होतो. 

हरि ओम.

Sunday, January 12, 2025

श्री

 श्री 


शक्ती कुठलही रूप घरू शकते. तिच्यात स्तर, स्थिती, घटक, चक्र, गुंतागुंती, बदल, गती, गुण आणि भाव असतो - किंव्हा तसा तो *प्रकट* होतो. तिला स्वतःची जाणिव असते म्हणून तिने केलेले _आकार किंव्हा जीव_ (हे दोन्ही एकच आहे), जिवंत असतात आणि एका स्मृती मध्ये वावरत असतात. त्या स्मृतीतून संकल्पना, अर्थ, संबंध, दृश्याचे भासणे - अश्या गोष्टी अनुभवास येतात. एकंदरीत ह्या सर्व घडामोडींना _दैवी इच्छा किंव्हा दैवी संकल्पना_ (Divine Imagination) म्हणू. इथे "imagination" हा शब्द जिवंत रूप घेणे सत्यतून असा होतो. मूळ संकल्पना अर्थातच भगवंताची, जी आपण विसरतो, म्हणून दृश्य जग अनुभवतो. 

ह्या साऱ्या घडामोडींमध्ये म्हणून शांत होणे आणि भगवंताचे कार्य ओळखणे हे आपल्या हिताचे ठरते. म्हणजे भगवंता पर्यंत पोचणे किंव्हा त्याचा अनुभव आत्मसात करणे. 

सतत काहीतरी निर्माण करत राहण्याची वासना आपण बाळगतो, म्हणून दृश्य वस्तू किंव्हा आकार किंव्हा रूप निर्माण करतो. त्या क्रियेचा _परिणाम_ आहे, त्या क्रियेचे _संस्कार_ आहेत. त्याने भाव  होतो, जो तात्पुर्तेपण आणि वेगळेपण भासून देतो आणि त्याला आपण धरून ठेवतो. _असुरक्षितता_. जो पर्यंत ही खोल भावना असते ध्यानात, तो पर्यंत स्वस्थता येणे कठीण. म्हणजे स्वस्थ होणे ह्यात मनोरचनेचे प्रयत्न आहेत - त्यात दुसरा कुणी काहीही मदत करू शकत नाही. 

म्हणून नामस्मरण.

हरि ओम.

Shree

   Shree 


It is not required i suppose, to make a dash onto a "thing" with the assumption that the "thing" would be the missing link of a puzzle. Far from it! Because the "thing" is born out of an imagination of some expectation of completeness (believing already that we are incomplete!), but since all "things" change, our anticipated hold on that "thing" is bound to fizzle out and annoy us. 

Things are related. So an anger is related to many other traits happening at many other scales and times. So is regret or guilt - many deeper feelings that keep reviewing many other connections of space and time - immediate or in future or in the past. 

A question may come - which is - are all above feelings ridiculous? I don't know and i don't think so. Being human calls for many layers of connections that generate something as anger or something deeper as regret or guilt or pain or something as humorous or a plain happy moment. None of these responses is a "point" or isolated or assumed to be continued.  So the entire "flow" and vibrations are just that - flow. No need to scan or analyze the reasons for the phenomenon. 

Hari Om


 श्री 

घर हे काय आहे आणि त्यात कुठले पहेलू असतात किंव्हा असावे हा चर्चेचा विषय होण्याची गरज नाही. स्पष्टीकरण होण्याचा विषय नाही. माझ्या आयुष्यात किंव्हा जाणिवेत वेगवेगळ्या घटकांचे आणि त्यावरून होणाऱ्या भावनांचे स्थान काय आहे, साखळी काय आहे - ह्याने मी ठरू नये आणि कुणीही त्यावर बोट दाखवून कुणालाही हिणवू नये. 

मी कोण, परिवार काय, कुटुंब नियोजन काय, माणसे कोण, स्वभाव काय, त्यांच्यातील संबंध काय, बदल काय, क्रिया काय, गती किती, आपले कोण, परके कोण - हे असू द्यावे आणि बदलुही द्यावे आणि गळूनही द्यावे. संकल्पनांना मन धरून ठेवते - ते नैसर्गिक मानणे. माझे असणे किंव्हा होणे काहींना त्रास देईल आणि शंका घ्यायला भाग पाडेल...पण त्यावरून माझी कृतीची व्याख्या घडावी का? मला भीती आहेच की. ती जेव्हा मावळेल तेव्हा मावळेल. त्यावरून कष्टी होण्याची गरज नाही. साखळी किंव्हा संबंध ज्या पद्धतीने होऊ पाहतात, ते स्वीकारावे. ती आपली वाट.

हरि ओम.

Thursday, January 09, 2025

श्री

 श्री 


अस्तीत्व शक्ती असल्यामुळे त्यात भाव असतो आणि क्रियाशील असते. ती स्वतः सिद्ध असते आणि त्यासाठी कुठलही "कारण", "हेतू" लागत नाही. ती आहेच. आपणही शक्तीचे रूप आहोत. शुध्द शक्तिकडे जाण्यासाठी भावांतून आणि क्रियेतून जाणे आले. हेच शक्तीचे "जागे होणे" असे म्हणतात. शक्ती आहे भगवंताची. 

रूपाला मर्यादा आहेत आणि ते वेगळेपण भासवते आणि तात्पुरते राहते ह्यावर विचार करणे नको. कारण कितीही विचार केले, तरी रूपाचा स्वभावात काही बदल होणार नाही, जर बुद्धीच्या भाषेत बघितले तर! 

इथे चिंतनाची गरज किंव्हा तिचे महत्वाचे स्थान आहे. चिंतन अशी क्रिया समजली पाहिजे की त्यात भाव शुध्द होत जातो आणि शेवटी शांत आणि स्वतः सिद्ध होतो. चिंतनात चिकित्सक वृत्ती किंव्हा तर्क लढवणे बाजूला ठेवायला लागते - किंबहुना त्याला शांत करायला लागते. शांत होणे ही क्रिया आहे, तो क्षणाचा निर्णय नसावा. म्हणजे घडामोडी गूढ असतात, ह्याची प्रचिती आणि स्वीकार होणे आवश्यक. घडामोडी फक्त बुद्धीच्या भाषेत समजून घेण्यात गफलत आहे. म्हणून गोष्टी दैवी क्रियेतून साखळी निर्माण करत येतात, वावरतात, बदलत राहतात आणि विलीन होतात - हे ओळखणे. दृष्यावरच फक्त लक्ष केंद्रित केले (जे बुद्धी करते); तर गूढ क्रिया मान्य होणे कदाचित कठीण जाईल. म्हणून दृष्यचाही उगम गूढ आहे (जसा बुद्धिचाही किंव्हा माझा ही) हे ओळखणे, मान्य करणे, स्वीकारणे. म्हणजे अट्टाहास आणि अहं भाव सोडून देणे. मी पण सोडून देणे. 

कसे पुढे घडेल ह्याची अजिबात चिंता करू नये, कारण बुद्धीला टिंबा प्रमाणे जाणीव असते - तीच जाणीव शांत होण्यात सूक्ष्म आणि विशाल होते. श्रद्धा ठेवा त्या शुध्द शक्तीवर.

हरि ओम.

श्री

 श्री 


कुठल्याही अस्तित्वाच्या क्रियेला शुध्द हेतू असतो. तो कळण्यास आपल्यालाही शुध्द होणे गरजेचे आहे. आपण स्वतः एका हेतूमुळे रूप धारण केले आहे आणि त्या प्रमाणे संबंध निर्माण करतो, चक्र निर्माण करतो, दृष्यशि संबंध ठेवतो आणि नाती जोडतो आणि अर्थात ह्या क्रियेचे परिणाम भोगतो. त्याला आपण भाव म्हणू शकतो आणि साखळी होणे असे ही म्हणू शकतो. म्हणजे बाहेरील संबंध किंव्हा आकार हे आतल्या स्थितीवरून प्रकट होतात. बाहेरचे दृश्य खरे नाही - त्याला गुंतून ठेवणारी डोर म्हणजे आतील भाव किंव्हा हेतू. 

हेतू खूप सूक्ष्म आणि प्रभावी ठरते. वास्तुकलेत हेतू दाखवण्याचे काही प्रयोजन पाहिजे, जिथून इतर सर्व काही रूपरेषा आखता येऊ शकेल. म्हणजे हेतू ही जाणीव व्हायला हवी आणि ती सूक्ष्म भूमिकेतून येते, हे ध्यानात यायला हवे. तिथून हेतुला आकार कसे द्यावे, हे शोधावे आणि नंतर ते योग्य पद्धतीने वास्तू मध्ये कसे घडवावे हे बघावे. प्रत्येक वेळेला किंव्हा घटकांमध्ये आकार बदलेल, पण मुळातील हेतू तोच राहतो.

तसेच प्रत्येक वेळेला परिस्थिती, माणसे, देह, रूप बदलेल, पण आतील हेतू (कारण) तेच राहते. म्हणून आतील हेतू कसा घडतो आणि कुठून घडतो, हे बघावे. 

हेतुला शुध्द कसे करावे, हे बघावे. त्या शुध्द होण्याच्या प्रक्रियेत भगवंत भाव प्रकट होतो.

हरि ओम.

Shree

Shree 

Current tools call for algorithm to optimise choices and consumption and expenditure. I call this reinforcement of habit, in ways that we "need not remember" and need not engage in any critical perspective. It becomes very much deep rooted to an extent that it feels like our skin. Take the example of mobile and advertisements.

Our daily patterns of living also are a force of habit. Without critical perspective many things become highly deep rooted and triggered by a Force called _awareness_. 

Critical engagement is to decode various strands of vibrations and to understand how a habit or a pattern and it's _feel_ develops. At the root of this exercise, is the capacity to understand how an imagination of self _operates_ in the world of phenomena. 

There is an aspect of pattern, memory, connection and tendency in all of this - either detrimental or constructive in all of this. I can become limited in awareness or I can expand awareness to go beyond. Either way, it is the work of Existence that operates. I may become aware of it or remain ignorant. By becoming aware, it offers peace, it is promised. By remaining ignorant, it offers stress. 

Our existence, as a feeling, can become peaceful or can become stressed out. If that's the line, then criticalness is to accept the process in which peace gets established.

Hari Om.

Saturday, January 04, 2025

श्री

श्री 

विचारांचा, साखळीचा, वासनेचा उगम माहीत नाही आणि म्हणून भगवंताची जरुरी आहे, तो भाव प्रकट होण्याची गरज आहे. उगम क्रिया तो असल्यामुळे होते, असे संत सांगतात, त्यांचा तसा अनुभव आहे. म्हणून त्यांना सगळीकडे भगवंताची शक्ती कार्य करत असण्याची प्रचिती येते, आपल्याला मात्र दृश्य जग जड दिसते! हा जाणिवेचा फरक आहे. 

म्हणून भगवतस्वरुपाचे चिंतन करत राहणे आले आपल्यासाठी. त्याचा परिणाम असा होतो की विचार येतात आणि जातात, पण प्रतिक्रिया देणे किंव्हा त्यातून साखळी निर्माण करण्याची इच्छा आपण करत नाही.  कालांतराने कदाचित विचारही उद्भवत नाही. ती स्थिती दिव्य समजावी आणि तिथे शांती स्थित असते. 

कुठल्याही गोष्टीचा, स्थळाचा, काळाचा, कार्याचा परिणाम स्वतःवर होऊ न देणे (सूक्ष्म होणे) म्हणजे भगवत भाव. 

हरि ओम.

श्री

श्री 

कुठलाही क्षण किंव्हा आकार किंव्हा संबंध किंव्हा नातं किंव्हा कार्य हे जाणिवेतून अनुभवू शकतो. हेतू जाणिवेतून घडतो. म्हणून जाणीव जितकी व्यापक, सूक्ष्म आणि प्रेमळ, तितका हेतू निःस्वार्थी आणि दृश्याचा परिणाम मनावर कमी उठतो, किंव्हा दृश्य - वस्तू आपली जाणीव भगवंताची छटा मानू लागते, ओळखू लागते. थोडक्यात आपण कायम स्वस्थ राहतो. 

काहींच्या बाबतीत हे उपजतच असते. काहींना योग्य मार्ग चालायला लागतो, जेणेकरून स्वतःचे अंतःकरण शुध्द होत जाते. मार्ग म्हणजे भगवंताचे स्मरण सतत जागृत ठेवण्याचा प्रयत्न करणे आणि त्यावरून आपले कर्तेपण शून्य टक्क्यांवर असते हे ओळखणे. सर्व कर्तेपण भगवंताच्या इच्छेने होते हे ओळखणे. जो काही भाव आहे, जी काही परिस्थिती, जे काही वेगळेपण आणि विचार चक्र येऊ पाहतात, ते भगवंताच्या अस्तित्वामुळे आकार घेऊन आहे, हे ओळखावे. ह्याचाच अर्थ की बुद्धीच्या पलीकडे जाणीव सूक्ष्म करणे, किंव्हा बुद्धी शांत होऊ देणे, किंव्हा बुद्धीच्या चशमानी सर्व गोष्टींचा अर्थ न लावणे, किंव्हा स्वतःला दृष्यावरुन लेखू नये. 

बुद्धी म्हणजे स्वतः एका जाणीवेच्या स्थितीतून उद्भवते. म्हणजे बुद्धीच्या स्वभावाला हेतू असतो. त्यावरून वेगळेपण, बेचैनी, चक्र, बदल, परावलंबन, स्वार्थीपणा, आणि इतर भावना त्या बरोबर _साखळी_ सारखे प्रकट होत राहतात. 

म्हणून बुद्धीला शांत करणे हे महत्वाचे कार्य आहे, जेणेकरून नंतरची (संबंधित असलेली) साखळी होण्याचा प्रश्नच उरत नाही!

किचकट आणि विखुरलेले संबंध समजून घेण्याची जरुरी नाही आणि त्याकडे लक्षही देऊ नये आणि बोलूनही दाखवू नये. Do not bother about fragmentation - as a dimension of thoughts. चिंता किंव्हा त्रास - हे ही साखळीच आहे, ज्यावरून आपण शांत होत नाही आणि ते घालवण्यासाठी मार्ग बुद्धीच्या भाषेत होऊ शकत नाही. 

त्यासाठी भगवंताचे चिंतन करणे हा एकच मार्ग आहे. अस्तित्वाचे स्वरूप जाणण्यासाठी भगवंत म्हणजे काय आणि त्यात मी कोण असतो, हा संबंध ओळखणे गरजेचे ठरते.

हरि ओम.

Friday, January 03, 2025

श्री

 श्री 


अस्तीत्व भाव शक्तीमुळे येतो आणि शक्तीचे असणे म्हणजे सतत क्रिया करत राहणे. म्हणजे शक्तीला जाणीव असते आणि क्रिया असते आणि त्यामुळे अनुभव निर्माण होतो. 

त्या क्रियेमुळे बऱ्याच स्थिती निर्माण होऊ पाहतात आणि "मी" चे संकल्पना निर्माण करतात - त्याला कर्तेपण म्हणू. म्हणजे "मी" देखील एक संकल्पना आहे शक्तीमुळे आलेली ज्याच्यामुळे कर्तेपण माझ्याकडे ओढून घेतो किंव्हा समजुतीमुळे रुपावर चिकटून राहतो किंव्हा ते रूप/ चक्र/ अनुभव/ परिणाम प्रकट करत राहतो आणि त्या पद्धतीने "दर्शन" घेत राहतो. 

हे चक्र किंव्हा होणे, वावरणे, जाणे - गूढ आहे. त्या निर्मितीचा हेतू बुद्धीच्या भाषेत नसतो म्हणून बुद्धीला भीती वाटते. ह्याचाच अर्थ की आपली श्रद्धा शक्तीवर कमी पडते. म्हणून आपण सतत बुद्धीच्या भाषेत वावरतो आणि खटपटीत राहतो. स्वस्थता मिळणे कठीण ह्या प्रकारे जगलो तर! बुद्धीने दाखवलेला अस्तित्वाचा आकार किंव्हा रूप खरे नाही (किंव्हा संपूर्ण सत्य नाही). म्हणून बुद्धीने केलेले तर्क वितर्क सुद्धा अपुरे आणि तात्पुरते आहेत आणि त्यावरून आपली स्वतःची व्याख्या आणि गरज पूर्णपणे ठरवू नये. मी दृष्यावरून ठरतं नाही. मी फक्त एका भगवंताचा आहे आणि तोच खरा आहे. असा भाव खोलवर प्रकट होऊ द्यायला लागतो. 

संकल्पना बुद्धी करते. भाव जाणिवेचा असतो. भाव सत्यता दर्शवते आणि त्यातील एक स्थिती आहे संकल्पना. म्हणून संकल्पनेला शांत होऊ देणे गरजेचे असते म्हणजे शुध्द भावाची प्रचिती येते.

हरि ओम.

श्री

 

श्री 

  *मी* हा भाव खूप खोलवर स्पंदनातून आणि त्यावरून साखळीतून निर्माण होतो आणि इतर शक्तिरुपंबरोबर गुंतून राहतो/ संबंधित असतो. त्यातून मन गुंतून राहणे आणि दृश्यात वावरणे असे परिणाम होतात. म्हणून त्याला बीज आणि झाड ह्याची उपमा दिली आहे. कुठल्याही बिजेचं झाड होत आणि त्याचे फळे भोगायला लागतात. त्याला _साखळी_ म्हणतो किंव्हा _परिणाम_.

 म्हणून मूळ शक्तितून सर्व काही घडतं हे ध्यानात राहू द्यावे. तसच, त्यात वासना मिसळली तर त्या साखळीतून देहबुद्धी झाली आणि दृश्य भावाचे संस्कार रोवले गेले आत. 

 हा प्रकार कसा असतो, हे शांतपणे, प्रतिक्रिया न देता बघायला लागते. म्हणजेच विचार "कुठून" प्रकट होतात आणि ते कसे विस्तार पावतात, हे ध्यानात येते. विचाराची मालमत्ता माझी नाही. विचारांना "मी" समजतो ह्यातच माझी गफलत होते आणि त्या समजुतीने, तसा संबंध ठेवल्यामुळे मला सुख - दुःख होते. 

 वरील स्पष्टीकरण झाले. स्पष्टीकरण मार्ग दाखवतील, पण त्यातून जातांना अनेक वृत्ती उठतील (अनेक अनुभव येऊ घालतील). त्यात शुध्द भाव प्रकट करणे किंव्हा नामावर प्रेम बसवत राहणे - ह्याला प्रयास लागतात. 

 आपण ज्या स्थितीत आहोत, त्यात बेचैन होऊ नये. ह्या तात्पुरत्या स्थिती मुळे स्थिरतेचा मार्ग दिसणार आहे. स्थिती कशीही असू द्यावी - त्यात भगवंताचे स्मरण ठेवावे. आपण दृश्याच्या स्वभावसाठी नसतो. आपण भगवंताच्या शांतीसाठी आलो आहे - त्यात आपल्याला विलीन व्हायचे आहे.

 हरि ओम.

श्री

 श्री 


अनुभव, दृश्य, जन्म, भाव हे ध्यानात येणे, त्यात भगवंताची इच्छा आहे. आपले होणे, येणे, वावरणे, विलीन होणे - हे त्याच्या संकल्पनेत असलेला मार्ग आहे. हे होत राहणार, आपण निर्माण होणार, भाव येणार, बदल असणार, अनेकात वावरणार, अस्थिर राहणार, शोध घेणार, सैय्यम ठेवणार, श्रद्धा वाढवणार - हे सगळं होणार. ते होणार. आज ना उद्या ते होणार.

चिंता करू नये. सर्व गोष्टींचे चक्र असते, लाटा असतात, जाळ असते, भरती आणि ओहोटी असते, उगवणे आणि मावळणे असते, चढ आणि उतार असते आणि ह्यालाच हालचाली म्हणायचे. हालचाली येणे आणि जाणे मधून भासते - ती रेश नसते! जर सर्वच तसे असेल तर आपलेही येणे आणि जाणे हे निश्चित आहे तर! म्हणजे अदृश्य - दृश्य हे असणारच आहे! 

आपण मग काम का करतो? वरच्या हालचाली ध्यानात येण्यासाठी. कार्य त्यासाठी असते; सिद्ध होण्यासाठी नाही. आकार दिसणे, प्रतिक्रिया मनात येणे, कृती करणे, विचार मांडणे, धावपळ करणे ह्या सर्वातून पलीकडे होणे आहे - त्यास _मुक्ती_ असे म्हणतात. तसा भाव जागृत होणे, हे स्वाभाविक गुण ओळखले जाते मानवाचे. त्याचे पाऊल खुणा मानव दृश्यात सोडतो. ते ओळखावे.

हरि ओम.

Shree

Shree

Separation creates a cycle of thoughts which enforce the feelings of temporariness, impermanence, fear, and its response. Intellect tries to decode this feel by variables, but that’s probably not enough since the answer to this feel is not in any intellectual pursuit of an answer – but more to do with acceptance of Existence and Its states – which consecutively create an intellect. 

Acceptance is an existential process of calming the form of vibrations. Whatever thoughts come and go, there is no need to decode it with the assumption that it must lead to peace. This is a conditional demand – far beyond even what the intellect can catch! And hence it may come as a surprise or a shock to the intellect that despite its best efforts, confusion, anxiety, fear is still felt by the mind. 

Learning of this mystery takes time. In this case, I am equating learning with expanding awareness. It is not required to know the scale of phenomenon in its visual size. Expanding visual knowledge holds no key to peace, I think. Nor does restrictions in any way. Knowledge is to go inward as a dimension of existence and that constitutes the real scale of things. In doing so, the limitations imposed by any form of manifestation seem to go away. 

Hence this is an important path.

Hari Om.



Shree

Observe the urge to rectify a situation. All forms are preceded by a Divine Force that causes all actions, intents, cycles, processes and effects. Whatever situation one is; it is complete in itself as a satisfactory state of existence and certain thoughts come and go for a reason and not “all” thoughts ought to get generated for a decision.

 Generation and analysis and sequence of thoughts is not a prerequisite of peace or a condition for peace. On the contrary, “no” thought is required to be engaged with to ascertain peace. That is – a thought is not to be seen as something leading to peace.  

I may analyse such things and may refine the approach. Certain things will continue to remain ambiguous and that is to be accepted as ok. Realization may happen when it should. 

In the action of observation, make room for something mysterious to develop.

Hari Om.

श्री

 श्री 


मन विषय धरून ठेवते - ते धरणे आणि गोष्टींशी/ रूपाशी/ आकारांशी _संबंधित_ राहणे हे वासनेतून घडतं असते. ती वासना चक्र दर्शवते, गुंतून ठेवते, साखळी निर्माण करते आणि तसे परिणाम किंव्हा अनुभव किंव्हा स्मरण प्रकट करते. ह्याचा अर्थ आपल्यासाठी असा होतो की साखळी काय करावी किंव्हा वासना कुठले प्रकट करावे हे प्रयत्नाने आपण बदलू शकतो. म्हणून विचार, भावना, संबंध, कार्य, हेतू - ह्याला महत्व आहे, कारण हे घटक शक्तिरुप आहेत - म्हणजे त्यांचा परिणाम सर्व ठिकाणी होत असतो. 

वृत्ती स्वार्थी आहे, ह्याचा अर्थ असा की तिचे परिणाम आणि साखळी फक्त स्वतःच्या देहावर केंद्रित राहते.  स्वार्थीपणाचा अर्थ खोलवर असा की आपण स्वतःचा रूपाला चिकटून राहतो आणि ते शक्तिरूप जे काही दाखवेल त्याला आपण खरे मानतो. चिकटून राहणे ही क्रिया खूप गुंतलेली, खोल, घट्ट आहे म्हणून कुणी काहीही म्हणा, आपल्याला जे वाटतं तसंच आपण वागत राहतो आणि परिणाम भोगतो. हे होत राहणार. 

तरीही हे पचनी पडले की कुठे दुरुस्त करायला हवे हे कळून येते. आणि तो मार्ग पत्करला की हेच चिकटणे शिथिल होते. त्यातून शांती प्रकट होते.

हरि ओम.