Sunday, April 13, 2025

श्री

 श्री 


जन्माच्या हालचाली अनुभवणे आणि दृश्यात वावरणे ही भगवंत इच्छा मानावी. त्यात भगवत शक्तीचे स्मरण विसरणे, म्हणजे साखळीला प्रकट करणे, त्यात गुंतून राहणे आणि परिणाम भोगणे आले. ते करत राहताना सत्याचा शोध आणि स्थिर होणे, हे ही आले. म्हणजे शक्ती परत जागी होणे आले. 

जशी भरती आणि ओहोटी होत राहते, बाकीच्या हालचाली होतात, चढण उतार होत राहतात, तसे काहीसे हे आहे - विस्मरण (म्हणून जन्म) आणि स्मरण (म्हणून स्थिरता). इथे पहिले काय येते, ह्या प्रश्नात अडकून काही उपयोगाचे नाही. दिलेल्या परिस्थितीतून समाधान भाव कसा प्रकट करावा ह्याकडे बघावे. परिस्थिती भगवंतांनीच निर्माण केली आहे, कारण कुठलही स्थळ आणि कुठलाही काळ त्याच्या इच्छा शक्तीतून प्रकट होतो आणि रूप धारण करतो. म्हणून सर्व घडामोडींना दिव्य पाया आहे आणि त्यात असा मार्ग आहे किंव्हा कळतो, की तो थेट भगवंताचे दर्शन घडवून आणतो. हे होणार. शांतीत आपण स्थिरावणार, कारण त्याचीच इच्छा आहे. आपण त्या इच्छेची आद्न्या पालन करत आहोत, त्याच्या कार्यात सामावले आहोत. 

म्हणून स्तर, स्थिती, साखळी, क्रिया - ह्या सर्वांना स्थान आहे आणि ते प्रकट होणार. बदल, रूप, हालचाली, अनुभव येणार, ते ही बदलत राहणार. पुढे काही जरी निर्माण झाले, तरी ते भगवंताचे देणे आहे, हे ओळखणे. दृश्यांची निर्मिती हे त्याचे कार्य आणि त्या निर्मितीचे परिणाम होणार, हे ही आले त्या ओघाने.

वास्तुकलेचा विचार असा करावा असे वाटते. कुठल्याही पद्धतीतून विचारांची साखळीतून कार्य करत, भगवत भाव कलाकृतीत आणणे. भगवत भाव प्रत्यक्षात आणणे, हा प्रवास आहे आपला. म्हणजे तो भाव आणण्यासाठी किंवा होण्यासाठी, परिस्थितीची किंव्हा कुठल्याही रुपाची पार्श्वभूमी पाहिजेच असे काहीही नाही. म्हणून न्यून बाळगू नका. There ought not to be any given condition or a precedent study or a precedent process to realize the truth through architecture. Truth is discovered as one's core centre. 

अभ्यास जो आहे तो स्वतःच्या अंतरंगाचा आहे आणि ते अंतरंग कसं उमटत हा आहे. स्पष्टीकरणाच्या भोवऱ्यात अडकू नये, कसे बदल होतात, का होतात आणि अर्थ कसा होतो हे ही पटवून देण्याच्या जबाबदारीत जाऊ नये. जे होते सगळ्यांसाठी, ते योग्यच होते अशी श्रद्धा वाढवावी. मूळ दृश्यात शोधण्यात जाऊ नये. सर्व स्वच्छ मनाने स्वीकारावे. 

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home