Wednesday, December 31, 2025
Tuesday, December 30, 2025
Shree
Shree
Anybody's experience is evolving and connecting and an
open loop. So how things get conceived, perceived and acted upon are to be seen
in an expansive way and not a rigid way.
Many times we impose our beliefs onto people. It is
worthwhile to take a step back, slow down, consider the alternatives,
understand perspectives and work through it.
Yet for me, this is only to be seen as venting of things
that are perceived as complex. This may not be assumed as a compulsion or an
inner expectation. That, by _doing_ this, a meaning gets created. Therefore not
me or anyone else needs to evaluate or judge this process of expression nor is
it required to be perceived in that manner by my self. Why this process happens
and what it creates as an action and experience is a function of Existence. Why
should some answer desperately be found?!...
Hari Om.
Shree
Life is full of complexity and pushes and pulls. The mind
tends to search for a balance and for this, a discovery of sorts is
inevitable.
In the process, many things happen, many changes get
perceived, many thoughts occur, many preferences are expressed in subtle
ways...all is a part of the search. The search is an integral aspect of the
human dimension and in it, there would be many questions for which, only
pondering on them is suggested.
Pondering has its own place. It needn't be expressed or
delivered or articulated. It is an experience that is allowed to enter a mind.
It doesn't seek anything, it is not for clarification, it doesn't have any
definition of time or place and it is not defined by any 'thing'.
I don't see any reason why pondering dreams ought to get
defined in any specific way to create action at a ground level in some time and
place. Dreams may come through. Let them. To force to come through, is quite a
stressful way to ensure action.
Hari Om.
श्री
भगवंत सारे कार्य घडवून आणतो, आपल्याला ते जाणवू
किंव्हा नाही. जाणवण्यासाठी कार्य किंव्हा कर्तव्य, श्रद्धा,
प्रयत्न कायम असायला लागते.
विचारच मुळात विघटित असतात आणि त्याच्यातून _स्मरण_
होते, तर काय करावे?! विचारांचे स्पंदने
जसे येतात, तशी साखळी तैय्यार होत राहते आणि अधिकाधिक विचार
प्रज्वलित राहतात.
जेवढा जास्ती विचार करू, तसा तो मनात घट्ट
होत जातो, आणि तसा भाव प्रज्वलित राहतो. विचाराने विचार सुटत
नाहीत. ते कार्य करून, श्रद्धा ठेवून विलीन होऊ शकतात. विलीन होणे,
म्हणजे स्थिर माध्यम ध्यानी येणे.
ह्याचा सरळ अर्थ असा आहे, की काळजी चे विचार
आणखीन काळजी निर्माण करतात. त्याच नियमाने, भगवंताचे विचार
भगवंताचे कार्य दर्शनास आणू शकतात.
त्या अर्थाने विचार हा जोडण्याचा दुवा आहे. काय जोडावे,
ते मनाने पक्के करावे आणि तसा मार्ग पत्करावे.
हरि ओम.
श्री
सर्वच्या सर्व गोष्टी शब्दात मांडू शकत नाही. काही स्तरांचे कार्य किंव्हा
परिणाम दृश्याच्याही अधिक सूक्ष्म स्थितीत वावरत राहतो,
ज्यामुळे शेवटी दृश्यात घडणाऱ्या हालचाली दर्शन देतात.
परिणाम, हा एक तर्फी प्रकार न राहता,
सर्व ठिकाणी, सर्व स्थितीत, आत ते बाहेर चक्र
प्रमाणे प्रकार असतो. म्हणून विचार स्थिती हे ही _चक्र_
आहे जिच्यामुळे तसा भाव आणि स्मरण प्रज्वलित राहते. ह्याचा अर्थ भाव आणि स्मरण
देखील चक्र क्रिया आहे.
आता चक्र क्रियाचे स्थान प्रस्थापित कश्यामुळे होते - हा मूळ प्रश्न आहे.
त्याचे उत्तर आहे *भगवंत*. ते ओळखण्यासाठी आपण सूक्ष्म चक्रात प्रवेश करणे गरजेचे
ठरते. तिथे "प्रवेश" करणे म्हणजे आत्ताच्या दृश्याचा स्थितीत परिवर्तन
होऊ देणे (दृश्याशी न गुंतणे) आणि सूक्ष्मात स्थित होणे.
हे घडण्यासाठी मार्ग आहे नामस्मरणाचा.
हरि ओम.
श्री
अस्तित्वात मूळ स्थिरपणा जो आहे, तो म्हणजे *आनंद
भाव*. हे माध्यम आहे, अनुभव आहे, कार्य आहे,
जिवंतपणा आहे. ह्या आनंदाला काळ, स्थळ,
हेतू, रूप, आकार
"नाही". त्यातून, इच्छेखातीर तो आनंद अवतरून खूप सारे रूप आणि
आकारामध्ये वाटला जातो आणि क्रिया दाखवतो आणि संबंधित राहतो. त्यातूनच आपणही होतो.
नंतर ते चक्र अनेक स्थितीत वावरत राहत आणि आपला प्रवास सुरू राहतो.
अस्तित्व म्हणजे चक्र क्रिया आणि त्यातून येणारा परिणाम किंव्हा आनंदाचा रंग
किंवा भाव किंवा अनुभव.
ह्यावरून भीती का असते, हे ओळखावे. आपल्या आत नेमके काय होते,
हे समजून घ्यावे आणि आपला संबंध दृश्याशी कसा निगडित होतो,
हे ओळखावे. कार्य करणे भाग आहे आणि अनुभव असणे, हे ही स्थित आहे.
कार्य आणि भगवंताचा संबंध त्यातून जोपासावे.
ओळखून बदल होणे स्वाभाविक आहे. जे काही परिवर्तन होईल,
ते योग्य होईल.
हरि ओम.
श्री
कधी कधी काय होते की भगवंत आणि वेगाचा त्याचा संबंध बौद्धिक पद्धतीने जोडणे
कठीण असते. तसा तो संबंध थेट नसावा. म्हणून त्यामुळे व्याकुळ होऊ नये. माझीही गती
आहे, वेग आहे, संबंध आहे. माझ्या
वेगाचा संबंध दृश्याशी व्हायला हवा, हा अट्टाहास किंव्हा
अपेक्षा शिथिल करावी. त्याने काय होईल? प्रथम भीती वाटेल की
दृश्यावर स्वतःचा ताबा निघून जाईल. इथे आपली मनोरचना दिसून येते,
दृश्यांची संकल्पना दिसते आणि त्यातील घटक दिसून येतात.
हे सर्व शांतीने ओळखावे लागते, विषय म्हणून नाही.
तसे करत गेल्यावर जे ध्यानात येते, ते म्हणजे समाधान.
हरि ओम.
श्री
व्यक्त होणे ह्या हेतूच्या आणखीन सूक्ष्म होणे आहे. दृश्य होणे,
ते दिसणे, हे न संपणारे गुंतणे ठरते. दृश्य जाणवण्यातही अनेक
स्तर असतात, ज्यांचाही एकमेकांशी संबंध असतो,
म्हणून विचार सूक्ष्म होत जाण्याच्या अनेक स्तर आणि परिणाम असतात,
ज्याला सामोरे जायला लागतं.
विचार अस्तित्व शक्तीतून, म्हणजेच भगवंताकडून,
तैय्यार होतात, आणि त्यातून स्मरणही. *विचारांना सामोरे जाणे आले.*
विचार नुसते "बघावे" शांतीने. त्याला प्रतिक्रिया देत रहाणे किंव्हा
मुल्य देणे गरजेचे नसते, कारण त्याच्याही पलीकडे सूक्ष्म स्थिती असते. विचार
गूढ असतात, आणि ते शांतीने बघितले तर त्याचे गुढत्व उमगते आणि
त्यात आपण योग्य पद्धतीने सामोरे जाऊ शकतो. विचार गूढ जाणवले,
तर दृश्यही गूढ जाणवायला लागते.
कुठल्याही होण्याचे कारण गूढ जाणवायला हवे.
माझ्या मते, "प्रकट कार्य" हा सर्वात महत्वाचा प्रश्न आणि गूढ
स्थिती ओळखावी. ते कळणे, मानवी जीवाचे ध्येय मानून घेणे. सर्व dnyan
संपादन करण्याची दिशा तिथे सूचित करायला हवी.
हरि ओम
Wednesday, December 24, 2025
श्री
श्री
अस्तित्व भाव हा अनेक स्तर, चक्र,
क्रिया, स्थिती - असा असतो. त्यामुळे परिणाम होतो आणि
त्यामुळे अनुभव मनात येतात. मी फक्त देहाशी मर्यादित नाही. तर मी विचार आहे,
भावना आहे, वासना आहे आणि सूक्ष्म भगवंत आहे. सर्व भगवंताचा
विलास आहे. मी माझे स्मरण फक्त देहाशी निगडित केल्यामुळे भगवंताचे स्मरण
"विसरतो" किंव्हा ते ध्यानात येत नाही. ज्या हालचाली जाणवतात,
रूप दिसते, आकार दिसतात, बदल दिसतात,
संबंध जाणवतात - ते सर्व मनोरचनेशी निगडित असते. हा प्रकार आत ते बाहेर असा
जोडला गेला आहे आणि त्यामुळे आतील स्पंदनांचे रूपांतर होऊन बाहेरचे दृश्य जग दिसते
आणि त्याचा परिणाम परत आत आपण घेतो. इथे परिणाम म्हणजे _संस्कार होणे_
, असा समजावा.
दररोजच्या जीवनात तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात - वैराग्य,
प्रेम आणि कर्तव्य. हे तिन्ही गोष्टी एकच आहेत आणि त्याच्यातील मतितार्थ एवढाच
की आपण विशाल आणि सूक्ष्म व्हावे आणि अमर्यादित व्हावे. तसे झाल्यास विचार देहाशी
फक्त निगडित न राहतात खूप सूक्ष्म होतात आणि म्हणून दृश्याचा प्रभाव होत नाही
(वैराग्य) आणि स्वतः सिद्ध प्रेम भावना जागृत होते (शांती) आणि कामाचा हेतू गळून
पडतो (कर्तव्य).
भगवंत त्याचे त्याचे कार्य करतच असतो, आपण काहीही विचार
करो किंव्हा न करो. त्यात आपण कार्य करावे. बौद्धिक संबंध जोडताना वरील दोन्ही
गोष्टी भिन्न वाटू शकतील आणि त्यामुळे त्रास होऊ शकेल,
शंका उत्पन्न होईल. तरीही सतत चिंतन करत गेल्यामुळे कालांतराने शांती भाव
संक्रांत होईल. ह्या एकत्रीकरणावर श्रद्धा ठेवावी. Believe in
synthesis.
भगवंत पर्यंत पोहोचायला त्याच्या नामाचे स्मरण करत रहावे.
हरि ओम.
श्री
काळजी करू नये. गोष्टींचे होणे, असणे,
निघून जाणे, हालचाली असणे, गती वाटणे,
अनुभव होत राहणे हे असणार. You need not convert all of this
into some sort of "data" to control, define, resolve, evaluate and so
on. Awareness is *not* data.
अस्तित्व जीवात तात्पुरतेपण असणार स्थळाचे, काळाचे,
देहाचे, परिस्थितीचे. त्यावरून काही ठरवायचे असते,
किंव्हा प्रतिक्रिया द्यायचे असते, असे काही नाही. मुळात
तात्पुरतेपणाचा विचार का करावे, हा प्रश्न स्वतःला
विचारा. आणि तात्पुरतेपण भाव म्हणजे नेमके काय, हे शोधा. काय
तात्पुरते असते, ते का असते आणि त्यातून काय अर्थ काढावा,
हे बघावे. शांत कसे होऊ आपण, हे ओळखावे.
हरि ओम.
श्री
सूक्ष्म शक्ती सर्व ठिकाणी असते, तिचे कार्य असते आणि
तिच्यातून गुण, रूप, आकार,
बदल, संबंध, भाव,
हालचाली, चक्र, परिणाम,
स्मरण ह्या गोष्टी येत राहतात, वावरत राहतात आणि
विलीन होतात. ह्याला शक्तीचे शुद्ध _कार्य_
म्हणावे. ह्याचा गूढ अनुभव संक्रांत होणे गरजेचे ठरते.
आपण होतो, म्हणून दृश्याशी संबंध येतो,
परिणाम करून घेतो आणि प्रतिक्रिया देत राहतो. त्याच्यातून खूप सारे विषय,
कोडी आणि बडबड. हे कसे स्वीकारले जाऊ शकते आणि कसे शांत होऊ आपण?!
ह्याचा विचार करावा.
Today, there is a general and intense confusion about
things, their forms, fragments, speed of change and unable to recall anything
and indecisiveness. Fragmentation or justification or planning occurs at such
speeds that *relevance* of understanding, instructions, time, space,
dependence, equation seems extremely short term or even microscopic in scope.
This causes noise, chaos and _dismantling of aesthetics_ , according to
me.
If this becomes our default mindscape, what is the place
of 'beauty' in our minds henceforth?!! Can we hope to even imagine beauty and
conceive of such experiences and spaces?...
I think relevance, beauty, aesthetics, principle,
relations are all connected. This can also have relation to memory and
truth.
Therefore the current complex situation of 'things'
related to society, environment, politics, consumption, progress, advancements
have their origins in our crumpled mindscape.
इथे शांत होऊ पाहणे, ह्याला खूप सैय्यम लागू शकेल.
हरि ओम.
श्री
प्रवास अस्थिर बहिर्मुख संकल्पनेपासून ते अंतर्मुख होण्या पर्यंत होत असावा.
बहिर्मुखच्याही छटा असाव्यात, जसे की वासने पासून
ते चक्र ते साखळी ते देह ते काळाचा अर्थ ते भीती ते तात्पुरतेपण ते वेगळेपण ते
मिश्रित भावना ते अपुरेपण वगैरे. त्यामुळे होणारी तळमळ आणि ताबा मिळवण्याची धडपड.
ह्या क्रियेमध्ये "मी" भावनेचा उगम किंव्हा निर्मिती असते आणि त्यामुळे
सर्व घटकांना आपण मुल्य देतो, खरे मानतो आणि
त्याचे परिणाम भोगतो, तसे स्मरण ठेवतो. अनुभव.
ह्या वरील गोष्टीला टप्पा मानून, प्रवृत्ती
सूक्ष्माकडे वळणे महत्वाचे असते. त्यामुळे आपले मन रूपाच्या आणि आकाराच्या
हालचालींचा पलीकडे स्थित होते. "हालचाली" हा गूढ शब्द आहे. तो निर्मिती,
गुंतणे, परिणाम, बदल,
प्रकृती, भोग असे सारे अर्थ सुचवितो. हालचालींचे बीज भगवंताकडे
असते, त्यातून प्रकट होते. म्हणून आपल्यावर आणि जीवनावर
त्या सूक्ष्म कार्याचा परिणाम उमटत राहतो. त्या परिणामाचा भाग म्हणजे अनंत रूपे
आणि आकार साकारले जाणे, संबंधित राहणे, तात्पुरते असणे.
हे वरील कार्य ओळखणे आणि आत्मसात करणे आले. नाहीतर आपण कष्ट आणि काळजीला
आमंत्रण देत राहतो.
म्हणून दृश्यात वावर चालू राहताना भगवंताचे चिंतन करत राहावे.
हरि ओम.
श्री
वरील विचारांचा अर्थ हा की स्मरण हेतू ठेवून होते. स्मरण करण्याची
"गरज" भासते, ह्यातच वासनेचे स्थान किंव्हा परिणाम दिसून येतो.
त्या परिमाचा अर्थ बदल, साखळी, भाव,
संबंध, परावलंबन असा दिसून येतो. म्हणजे आपल्या
अस्तित्वाच्या कल्पनांना किंव्हा विचाराला असा *हेतू* असतो.
हे कार्य सूक्ष्मातून होते, म्हणून तो अर्थ
बुद्धीच्या ध्यानात तेव्हाच येतो जेव्हा बुद्धी सूक्ष्म होते.
For pure bliss, there is no need to remember anything.
Since "we" become "different" from Divine Will, we are
required to remember our form. Now the inquiry can be why this obligation to be
different and why this struggle to realise the truth? We don't know. It should
only be accepted.
I see a lot of people involved in trying to "express
their thoughts", not realizing perhaps, that it is quite immaterial in the
long run. Expression is *not* a compulsory conscious requirement. Nothing is
compulsory. To be something or to have a memory is also not compulsory. To
remember things is not compulsory. We remember, so we demarcate, set boundaries
and plan action based on what gets remembered. This is a conditional state of
existence. In philosophical terms, that is a limitation of the mind. Mind
therefore, need not exist. It is a step or a pause.
There is a reason why babies don't remember and elders,
too, don't care too much about remembering. Both have transcended awareness of
body and mind.
I feel at times, _remembering_ can complicate things
unnecessarily if used to construct boundaries. Remembering ought to become
peaceful.
हरि ओम.
श्री
विचारांची स्वभाविक खेच बहिर्मुख असते, देहाशी किंव्हा
दृश्याच्या हालचालींशी जोडली गेली असते. दृश्याचे अस्तित्व आहे का,
हा प्रश्न एका अर्थ उपयोगाचा नाही, कारण दृश्याचे स्मरण
तेव्हाच प्रज्वलित राहते जेव्हा "मन" स्थित असते. म्हणजे मनाच्या आतल्या
हालचालीतून (ज्याला आपण भगवंताचे कार्य म्हणू), दृश्यात आपला वावर
राहतो.
त्यातून खरे ध्येय कालांतराने असे ठरू शकते मनाला की "मी कोण आहे",
आणि त्याचा शोध घेणे. त्यात अनेक गोष्टी मनात संक्रांत होऊ द्यावा लागतात,
जसे की श्रद्धा, सैय्यम, प्रयत्न,
आपुलकी, स्थिरता, कर्तव्य,
मौन पाळणे, प्रतिक्रिया नसणे, हळुवार होत राहणे,
सूक्ष्म होणे, कोड्यांच्या पलीकडे जाणे,
स्वतःला पूर्ण ओळखणे, अंतर्मुख होणे वगैरे.
त्यातूनच स्मरणांचा प्रकार किंव्हा स्वरूप ठरत जाते. जे मंडळी शांत असतात,
त्यांना व्यवहारातील कुठलीही गोष्ट, व्यक्ती,
स्थळ किंव्हा काळाची आठवण होण्याची गरज भासत नाही. त्यांच्या लक्षात किंव्हा
ध्यानात एक भगवंताशिवाय कुठलीही गोष्ट (वासनेतून प्रकट होणारी) ध्यानात असत नाही.
म्हणून ते मंडळी मनाच्याही पलीकडे स्थित असतात.
ह्याच्या उलट आपला प्रकार आहे. बारीक सारीक गोष्टी आठवण्यात आपण स्वतःची
सार्थकता मानतो! कोण काय बोललं, कसं बोललं,
केव्हा बोललं, काय झालं, कसं झालं,
काय खाललं गेलं, कुठे गेलो, कसे गेलो....सतत
दृश्याचा अनंत रूपांशी आणि आकारांशी बडबड, चर्चा,
तर्क, भेद वगैरे! त्याचा परिणाम होतो,
हे आपण मान्य केलं, तर आपण बडबड कमी करतो आणि कामाला लागतो.
कर्तव्य करावे. हा ग्रंथांचा गाभा आहे. त्यातून शांती भाव संक्रांत होऊ शकतो.
काहीही जरी व्यवहारातील गोष्टी आठवले नाही, तरी मार्ग उचित आहे,
हे ओळखावे.
हरि ओम.
श्री
द्वैतात वावरताना स्वतःच्या आतील क्रिया काय होत आहेत हे सांगितले तरीही ते
इतरांना कळतील किंवा पटतील असे सांगता येत नाही.
आपण मोकळे होण्याचा प्रयत्न करतो, तरीही वाक्यातील
सूक्ष्म भावना इतरांना जाणवतील तसे नाही. त्यात त्यांचाही दोष नाही,
आणि आपलाही नाही. द्वैताचा स्वभाव तसा आहे, त्यामुळे संबंधित
होताना भेद होत राहतो.
मूळ प्रकरण असे आहे की स्वतःला विघटित, तात्पुरतेपण आणि
वेगळे वाटत राहिल्यामुळे त्याच रूपाचे स्पंदने दृश्याशी संबंधित राहतात आणि
परिणामही करत राहतात. जे पेरू त्याचे फळं आपल्याला मिळतील. हा अस्तित्वाचा गुण
धर्म आहे, म्हणून परिणाम (दुहेरी) टाळणे अशक्य.
त्यातून हा निष्कर्ष निघतो, की वासनेचे कार्य
काय असते, ते सूक्ष्म असल्यामुळे, बुद्धीच्या
ध्यानाच्या पलीकडे स्थित असते (पलीकडे म्हणजे आणखीन सूक्ष्म किंव्हा उर्ध्व गती).
म्हणून वासनेला स्वीकारण्यास आणि त्याला कार्याचा अर्थ ओळखण्यास मन सूक्ष्म
होणे गरजेचे आहे. त्याच्यापेक्षाही सूक्ष्म होत गेले की भगवंताची शुद्ध शक्तित
मनाचे रूपांतर होते. म्हणजे आपण विलीन होतो.
It is about _realization_ of existence. It is not a
mandate or a destination or a compulsion to do so. Therefore realization is an
inner attitude towards _knowledge_.
हरि ओम.
श्री
दडपण असते, ते विचाराच्या स्वभावातून निर्माण होते - जास्त
किंव्हा कमी...विचार रूप बघते, आकार बघते,
संबंध बघते, परावलंबित राहते, निष्कर्ष करण्याचा
प्रयत्न करते वगैरे. त्याला एकंदरीत आपण "प्रपंच" समजून घेतो. त्यात
हेतू मांडतो, म्हणजे स्वार्थी राहतो, म्हणजे अहं वृत्ती
प्रज्वलित ठेवतो, म्हणून होणारा त्रास/ कष्ट/ चिंता/ काळजी वगैरे.
हे निर्माण होण्याचे "कारण" आत्मसात होणे गरजेचे ठरते शांत होण्यासाठी.
_निर्मिती_ विचारातून होत नसते, म्हणून कारण,
कोड्यांचे उत्तरे, उगम, विषयांचे समाधान हे
बुद्धीच्या हातात असते का?!! की ते सूक्ष्म भगवंत शक्तीच्या कार्यातून घडते?
हे ओळखण्यासाठी त्या शक्तीचे सतत चिंतन करणे हिताचे ठरते आपल्याला. तसे आपण
करू.
हरि ओम.
श्री
देवा, तुझी *कृपा* सदैव कार्य करत असते दृश्यावर. मला वाटतं
की कृपेचा भाव शांत, स्थित असतो (तसा अनुभव घ्यावा लागतो) आणि तो
कुठल्याही "करणाच्या" पलीकडे किंव्हा अधिक सूक्ष्म प्रकृतीचा असतो.
म्हणून तो स्थिर, कायम, आकाराहीन असतो.
अस्तित्वाला दुसरा अंग आहे, जिथे गुणांचा लाग
नाही - जे गुणांच्या भाषेत मांडू शकत नाही, जे रूपातीत आणि
आकारहीन असते, ज्यात बदल किंव्हा हालचाली होण्याची गरज नाही,
ज्याला सुरुवात आणि शेवट नाही, जे एकच आहे.
वासना, विचार, भावना परावलंबित
असतात आणि कारणावर निर्भर असतात. म्हणून ते मिश्रित आणि अस्थिर राहतात. हे घटकही
आपण अस्तित्वाचे गुण धर्म म्हणू शकतो, म्हणजे ते दैवी
उद्भवत आहेत आणि देवाची *इच्छा* त्यांच्यावर कार्य करत राहते. म्हणजे मी कुठून आलो,
कसा आलो, काय करतोय आणि कुठे जाणार असतो - हे भगवंताच्या
इच्छेवर पूर्ण ठरतं.
जे घटकेला लागू, तेच प्रवाहाला, बदलांना,
म्हणजे परिस्थितीला आणि भोगाना. म्हणजे एकमेव नियम द्वैताला लागू ठरतो (मला
आणि दृश्याला).
वास्तविक मी आणि दृश्य हा मनस्थितीचा _परिणाम_
असतो. द्वैत खरे एकच असते (दुहेरी असते, चक्र असते,
सर्वांगीण असते, क्रियेतून उमटत राहते). म्हणून जशी कृपा आपल्याला
जाणवते, तसे शांती भाव सगळीकडे पसरते.
कृपा जाणवण्यासाठी नामस्मरण करावे.
हरि ओम.
श्री
आपला प्रवास कदाचित बहिर्मुख ते त्याचा संबंध अंतर्मुख होण्याशी कसा असतो,
असा असावा. त्यात सर्वांगीण भाषेत शोध घेणे कार्य स्वतःकडून होते. त्यात विचार
आले, भावना आल्या, देह आले,
स्थिती आल्या, अनुभव आले, परिणाम आले,
बदल आले, भाव आले, प्रश्न आले,
मुल्य आले. ह्या सर्वांना टप्पे म्हणायला हरकत नाही,
जेणेकरून चिंतन होऊन स्थिरता प्रकट होते, किंव्हा आपण त्यात
"स्थित" होतो.
ह्याचा अर्थ असा की प्रत्येक घटकेला महत्व आहे आणि प्रत्येक घटक संबंधित असतो,
बदल खुणावतो, स्मरणात ठेवतो - हेच शक्तीचे कार्य *ओळखणे* आहे.
आलेले अनुभव, प्रश्न, तात्पुरतेपण
त्यासाठी महत्त्वाचे असतात की त्यातून अभ्यास होतो. हे का ते,
द्विधा मनस्थिती, शंका, आपल्या वाटेला येणे
असते मार्गाची आखणी करण्यासाठी.
आपण अर्जुन आहोत. आणि आपल्याला कृष्ण होण्यासाठी मार्ग आत्मसात होणे आले. तो
मार्ग शुद्ध श्रद्धेने सामोरे येतो. देव आपल्या सर्वांना शक्ती देवो.
हरि ओम.
श्री
हे ओळखणे महत्वाचे असते की आपल्या जीवनात भगवंत विराजमान असतो आणि सर्व
व्यवहार त्याला साक्षी ठेवून करायला लागतात. एक धागा जर प्रपंचशी जोडला असेल,
तर त्याची सुरुवात भगवंतापासून होत असते.
म्हणजे शांतीने सर्व करावे आणि बदल बघत रहावे. शांतीने सर्व अनुभव आत्मसात
करावे आणि चिंतन अखंड करत रहावे.
हरि ओम.
