श्री
श्री
माझ्या मते, कुठल्याही भीतीला उत्तर देण्याची किंव्हा गुंता सोडवण्याची गरज तशी नसते. भीती, ही स्वाभाविक मानवी भावना ओळखली, तर तिला शांत होण्याचा मार्ग गूढ असतो, हे ओळखावे.
भीती प्रवाहात असते, खूप गूढ असते आणि क्षणात सामावलेली नसते, जर आणि तर ह्या भाषेत नसते. म्हणून ती शांत होण्याचा प्रवास असतो.
त्याला शांत व्हायला वेळ लागू शकतो...त्यावरून स्वतःला लेखू नये. भीती अशी का असते, हे सांगणे कठीण इतरांना आणि ते इतरांना कळेल अशी खात्री नाही आणि इतरांना कळली तरी ते साथ देतील असेही नाही. म्हणजे भीती परिस्थितीवर अवलंबून नसून, विचार शरणीत स्थित असते. त्यासाठी शांत होण्याचा मार्ग म्हणजे विचार शरणीत योग्य परिवर्तन होणे.
हरि ओम.
