Tuesday, June 09, 2026

श्री

श्री 

विचार कुठले येतील, कसे येतील, का येतील - ह्यावर आपला अधिकार नसतो. विचार एक प्रवाह दर्शवतो, त्यातून बऱ्याच काही संबंधित गोष्टी प्रस्थापित होऊ पाहतात, जर त्यांना धरून राहिलो तर किंव्हा तसे स्मरण होऊ दिले तर. म्हणजे विचार होण्याचे किंवा असण्याचे कार्य भगवंताला द्यावे, आपल्या मनाला नाही. आपले अस्तित्व म्हणजे "मन" नसते. 

म्हणून मनाने आणि मनातून जे काही निर्माण होत असले, तरी त्यात _गुंतण्याची गरज नसते_. हे अतिशय महत्वाचे निदान आहे, जे आत्मसात करून शांती भाव प्रस्थापित होऊ शकते. मनाची शक्ती सूक्ष्म, विशाल आणि शांत होऊ द्यावी. 

शांत राहिलो, तर मनात बरेच गूढ, सूक्ष्म विचार येत राहतात, ज्याचा अंदाजही केला गेला नसतो. ते नुसते बघावे आणि त्याला हेतू लावू नये (की कुठून आले, का आले, कसे आले, काय घडेल, वगैरे). त्यातून शांती भाव संक्रांत व्हायला लागते. 

त्यातून स्वतःला संपूर्ण स्वीकारणे घडते.

हरि ओम.

Shree

 Shree 


Liberation is about all the things that can cause involvement...be those thoughts, feelings, bodies, relations or any other concept. 

Not knowing the idea of birth or death can also create a fear of the Unknown and create entanglement. ह्याला भगवंताच्या भावाचे विस्मरण म्हणतात, म्हणून भीती येते आणि त्यात गुंतायला होते.

Therefore searching for a point of liberation might be an illusionary idea. It has got more to do with accepting an ambiguous, fluid existence and realization. 

Not knowing anything is a blessing in disguise, because that can generate the experience of trust.

Hari Om.

Shree

Shree 

Control is applied mostly as identifying variables, establishing connections among them, deciding priorities among them and managing their flow as per set priorities. 

This results in two things - absolute control, creation of escape and therefore creation of too many variables that get formed by this idea and then controlling new ones again! This means that every form of control (as an imagination) is going to also create a counter point of 'escape' and new variables in the process. Hence we need to accept what it is, we are creating and why. 

I think if we understand this cycle, another approach would emerge and that would probably mean to renounce control because of increased awareness of interdependence. If I control any variable "out there", it will cause some other form of control over me! Therefore, _I can't or shouldn't stop any flow of things._ But why start with the idea of control ?! This is a very difficult inquiry to understand. Because the answer isn't to be found in any situation. It is in the mindset that _seeks_ control.

वरील ताबा ह्याचे कार्य दुहेरी असते...म्हणजे "मी" ह्या भावनेचा परिणाम दृश्यावर होतो, स्वतःवर होतो आणि संबंध प्रस्थापित करण्यात होत राहतो. "मी" हा प्रकार मर्यादित असतो आणि त्यामुळे होत राहणारा परिणाम. मर्यादा, अहं भाव ह्याचे स्पंदने ताबा, भीती, राग, चिंता, काळजी - ह्या मध्ये प्रकट होत राहते. त्याचे उत्तरे मनाने दाखवलेल्या मार्गावर (म्हणजे विघटनांवर) आधारित नाही आहे, हे मान्य व्हायला हवे. म्हणून ह्या प्रकरणाला शांत करणे गूढ असते, ते सहज सहजी होणे कठीण, कारण आपली सवय मुळात कर्म, स्वार्थी राहण्याची आहे. 

आपण कुणावर किंव्हा कशावरही नियंत्रण घडले चुकीचे ठरते. वृत्ती बदलत नाही सांगण्यावरून. त्यांना स्वतः परिवर्तित होणे लागते. म्हणून त्यांच्यावर ताबा सोडावे. नात्यावर ताबा सोडावे. 

देहावर आपला ताबा असत नाही. प्रारब्ध कसेही येते. देह सरळ जातो, कधीतरी पडतो, खालती घसरतो...त्याला काहीही होते. मग त्यावर ताबा ठेवण्यात काय तथ्य आहे?! 

तसंच विचारांचे, भावनांचे असते. ते परावलंबित झाल्यामुळे, चक्रात वावरत राहतात. परावलंबित वृत्ती असल्यामुळे तिथे ताबा ठेवण्याचे बीज स्थित राहते, म्हणून सतत त्याचा त्रास होतो. 

कामाचे तसेच आहे. कामाचे स्वरूप कसे होईल, काय सांगितले जाईल, काय अपेक्षा असेल हे सांगणे कठीण. कामाला सेवा म्हणून बघावे, त्यातून काय मिळेल, असे बघू नये. 

मुळात आयुष्याकडून काय मिळेल मला, अशी अपेक्षा ठेवणे त्रासाला कारण ठरते. सर्व कार्य भगवंताचे असते, ज्याला आपण उगाचच ताबा मिळवण्याची अपेक्षा ठेवतो. हा अभ्यास आहे शांत राहण्याचा. प्रारब्ध कसेही जरी असले, तरी नामावर श्रद्धा कायम ठेवावे.

हरि ओम.

Monday, June 08, 2026

श्री

 श्री 


जाणिवेला सत्य पाहिले, तर ते अमर्यादित असते. शुद्ध अस्तित्व म्हणजे जाणीवच आहे, त्याला आपण _कार्य_ असेही संबोधले आहे. सर्व सृष्टी _जाणिवेनी_ भरलेली असते. त्याच्या स्तरांमुळे, सूक्ष्म आणि शांत असलेली सृष्टी जड, स्थूल अणि अस्थिर वाटते. म्हणजे रूप आणि आकार हे जाणिवेचे _प्रतीक_ आहे. जशी जाणीव, तसा संबंध, तश्या हालचालींचे स्वरूप, तसे स्मरण, तश्या भावना, तसे आकार, तशी परिस्थिती, तसा परिणाम, वगैरे.

प्रारब्ध म्हणजे असे ओळखणे की दृश्याचा स्वभाव अस्तित्वामुळे प्रस्थापित होत राहणार आहेच, ज्याच्यामुळे ध्यानात अनुभवांचा प्रवाह असणार, प्रवास असणार, शोध असणार, विविध घटक असतील, प्रश्न असतील, सामोरे जाणे भाग येईल, वगैरे. प्रत्येक जन्म - मरण ह्या हालचालीत/ गतीत हे असे दिसणारच आहे. 

जाणिवेला विचार आणि भावना (मन) मर्यादा तैय्यार करतात. त्यातून सारे संबंध येत राहतात, परिणाम भोगला जातो, परिस्थिती अनुभवली जाते. म्हणून जाणीव शुद्ध होऊ देणे महत्वाचे ठरते. प्रश्न जाणिवेचा आहे, कुठल्याही रूपाचा, आकाराचा, देहाचा, नात्यांचा, कामाचा नाही. आपण कोडी, बहिर्मुख असल्यामुळे, परिस्थितीत सोडवण्याचा प्रयत्न करतो - मग ते सर्व कोडी कामाशी, देहाशी, नात्यांशी, विचारांशी, भावनांशी निगडित असावीत असे आपण मानतो. हा अपुरेपणाच्या भावनांचा _परिणाम_ ओळखावा. 

मूळ प्रश्न मनातून आहे, कार्याच्या स्वरुपात असतो. नाम म्हणून निर्हेतूने, समर्पण करत घ्यायला लागते. नामाचा विस्तार, भाव, कार्य, अनुभव जाणवण्याला खूप महत्त्व आहे. त्या नामाच्या कृपेची प्रार्थना करावी.

हरि ओम.

श्री

श्री 

 _स्वतःच्या अपुरेपणाचे_ रूप असे का असते आणि कुठून येते आणि कसे प्रस्थापित होते आणि काय परिणाम दर्शवते, हा *स्वतःला स्वीकारण्याचा* भाग आहे. 

स्वतःला शांतीने स्वीकारावे आणि कुठलाही हेतू मांडण्याची जरुरी असू नये. सर्व भगवंताचे माध्यम करते, म्हणून माझ्या असण्याला देखील त्याची इच्छा कार्य करते. ही भावना आत स्थिर होऊ द्यावे, जाणीव तशी होऊ द्यावे. आपण अस्तित्वात आहोत. कुठल्यातरी इच्छेखातर दृश्याशी संबंध जोडला गेला आहे. आता ते स्वीकारून, अंतर्मुख होऊन भगवंताचे सानिध्य परत संक्रांत होऊ द्यावे.

हरि ओम.

श्री

 श्री 


आपले भवितव्य, मनस्थिती,  शांती भाव - परिस्थितीवर, नात्यावर, जबाबदाऱ्यांवर, कामावर *ठरण्याची अजिबात गरज नाही*. प्रवाह होत राहणार, त्यात स्वतः आपण कुठे हवे, असा विचार आणण्याची गरज नाही ध्यानात. विचार एका पद्धतीचे किंव्हा एका स्वरूपाचे असे का येऊ पाहतात, हे सांगणे अवघड किंव्हा नाही कळत. ते कळले नाही, तरीही त्यात गुंतण्याची आणि कोडी सोडवण्याची _गरज_ असते का?! विचारांचे संपूर्ण रूप कळले नाही, तरी त्यामुळे त्रास, कष्ट, व्याकुळ होण्याची गरज नाही. जे काही आहे, जे काही येत राहते, जे काही येणार असते, जे काही निर्माण होते, ते भगवंताच्या इच्छेने येते.  _गरज_ स्वतःची जाणीव प्रज्वलित ठेवते. ती शुद्ध झाली, की गरजही उरणार नाही, तरीही शांती भाव संक्रांत होईल. 

हरि ओम.

श्री

श्री 

स्पष्टीकरणाला जर खूप कारण लागले, तर समजावे की आपण खूप परावलंबित झालेले आहोत. मनाचा मार्ग स्पष्टीकरण देत राहण्याचा असतो, म्हणून ते नाहिसे करण्यास ते आणखीन विघटित मार्ग पत्करते, ज्यामुळे स्पष्टीकरणाची गरज क्षणो क्षणी प्रकट होत राहते! 

स्वस्थता ह्याचा मार्ग, वरील मार्गाच्या विरुद्ध आत्मसात होण्याचा आहे. म्हणजे कारण शोधण्याची गरज न उत्पन्न होणे, धरून न ठेवणे, देह बुद्धी विलीन होऊ देणे, प्रवाह दिसणे, कार्याची ओळख होणे, सूक्ष्म होणे, चिकित्सा सोडून देणे, शांत होणे, वगैरे. आपण कप्प्यात वावरत नसतो. म्हणजे एक कप्पा स्थळ, दुसरा कप्पा काळ, तिसरा कप्पा क्रिया, चौथा काम, पाचवा नाती, सहावा व्यवहार, सातवा स्मरण, आठवा आणखीन काही....कप्पा करण्याची हौस विलीन व्हायला हवी. कोडी, विषय, कप्पे, गती, मन, गुंतणे, सोडवणे, सिद्ध होऊ पाहणे - हे एकाच धाग्यात बांधल्या गेलेल्या संकल्पना आहेत. एक सोडवता सोडवता सगळा गोळा सोडवायला लागतो. त्यात मनाचे कष्ट आहेत. दुसरा मार्ग नामस्मरणाचा की त्यातून शांती भाव आत्मसात झाली म्हणजे समजावे की कप्पे विलीन झालेले आहेत.

हरि ओम.


श्री 

वरील लेखातून हे ही जाणवते की अहं भावामुळे किंव्हा जीवाच्या होण्यामध्ये सिद्ध करणे हा त्यात उपजत भाग येतो, म्हणून कप्प्यात संकल्पना मांडत राहणे आणि त्याला सोडवणे असे आपण गुंतत राहतो! हा अहं भावाचा परिणाम ओळखावा - किंव्हा प्रवाहाला सतत विघटन स्वरूपात मांडत राहणे आणि त्यामुळे अनंत रूप आणि आकाराना सामोरे जात राहणे! 

मन विशाल आणि सूक्ष्म होऊ देणे म्हणजे प्रवाहाची जाणं प्रज्वलित होणे आणि सर्व कर्तेपण भगवंत माध्यमाला सुपूर्त करणे. 

प्रवाह सत्य आहे, कप्प्यात गोष्टी होणे नाही.

हरि ओम.

Thursday, June 04, 2026

श्री

 श्री 


विचारांकडे "नुसते न गुंतता बघावे लागते". हा गूढ प्रकार आहे. आपण बऱ्याच सूक्ष्म गोष्टी शब्दात मांडू शकतो, पण त्यावरून लगेच व्यवहारात त्याचे नियोजन करावे अशी अपेक्षा असणे जरा कठीण आहे. _शब्द_ म्हणजे पूर्ण सत्य नाही किंव्हा पूर्ण ताबाही नाही. माझ्या मते, "मी", किंव्हा होणे, किंव्हा कुठल्याही दृश्यात घडामोडी ह्यावरून ताबा मिळवण्याची व्याख्या कदापि होत नसते. म्हणजे दुसऱ्या अर्थाने, कशानेही _हेतूची_ संकल्पना निर्माण होत नाही/ निर्माण करू नये. जिथे विचारांमध्ये कुठेही (कुठल्याही स्तरात किंव्हा रूपात) गुंतणे झाले (identification with _any_ form of thought), तिथे हेतू आला, भाव आला, स्मरण आले, तात्पुरतेपण आले, वगैरे. 

अस्तित्व भाव खूप गूढ आहे, की तिथे अनुभव हेतुला धरून किंव्हा हेतूशी संबंधित नसतो. जन्म, मरण, चक्र, स्मरण, भाव, हेतू, परिणाम, व्यवहार, इच्छा, गुंतणे, भीती, राग, सुख आणि दुःख, परावलंबन - हे _एकाच_ वेळेला प्रकट होतात. इथे स्तर अनेक, माध्यमे अनेक, कार्य अनेक - कुठे मूळ शोधावे आणि त्यावरून लेखावे स्वतःला किंव्हा इतरांना?!!

 *शोधाचा* अर्थ दोन प्रकारे ओळखता येतो. विचारांच्या पातळीवरून (म्हणजे त्याच्या सर्व स्वभावात गुंतून) शोध व्हावे. पण विचारांना अंत नाही, म्हणून ह्या मार्गावरून शोधाचा अंत नाही, किंव्हा सत्य पूर्णपणे कळणे अवघड. दुसरी पद्धत म्हणजे विचारांची मर्यादा आत्मसात होणे आणि त्यांना शांत होऊ देणे आणि स्थिर होणे/ सूक्ष्म होत राहणे/ श्रद्धा वाढवणे/ पलीकडे जात राहणे/ अंतर्मुख होणे. इथे पूर्णपणे स्थिर होणे, म्हणजे शोधाचा अंत होणे, असे आपण ओळखू शकतो. स्वतःला विलीन होऊ द्यावे लागते, की त्यातून शांती प्रस्थापित होते.

हरि ओम.

श्री

श्री 

सर्व हालचालींचा किंव्हा अस्तित्वाच्या कार्याचा *अवाका* ध्यानी यायला हवा. Scope.

तो अवाका येऊ घातला किंव्हा जाणिवेत आला, की मन स्थिरावते, कारण तो पर्यंत ते सूक्ष्म आणि विशाल आणि अमर्याद झालेले असते. 

ह्याचा सोप्पा अर्थ हा की मन,  ज्या स्वभावाचे बनले जाते, वासने पासून ते देह पर्यंत, त्यामुळे त्याचे स्मरण, भाव, क्रिया, व्यवहार, संबंध दृश्याशी ठरतो. _मनाचे अस्तित्व आणि त्यामुळे जाणवणाऱ्या हालचाली कोण निर्माण करते?_ उत्तर आहे - भगवंत माध्यम.  

ह्या भगवंत माध्यमाचे कार्य ध्यानी येणे अवघड, जिथे अहं भाव असेल. मनाला पूर्णपणे अर्पण करावे लागते आणि शांत होऊ द्यावे लागते, तरच भगवंताचा भाव आत्मसात होऊ शकतो. हा अभ्यास आहे, जो हाथी घ्यायला लागतो. 

परिस्थिती, होण्याची क्रिया, हालचाली, संबंध, परिणाम - हे अत्यंत गूढ प्रकरण आहे, जिला मनाच्या दृष्टीने बघितले तर सरळ सुरुवात किंव्हा शेवट नाही. *परिस्थिती आत्मसात* होणे महत्वाचे आहे, तिच्यावर ताबा मिळवणे नाही. सर्व कार्य भगवंताचे असल्यामुळे दृश्यात होणाऱ्या घडामोडी त्याच्या इच्छेने असतात, हे ओघाने आले. म्हणजे हालचालींचे स्वरूप गूढ असते, म्हणून ते शांतीने सामोरे जाऊन स्वीकारावे लागते. 

आपल्याला सध्या संकल्पना, अनुभव, परिणाम, चक्र एका मर्यादित पद्धतीने जाणवत राहतात आणि त्यालाच सर्व मूल्य देण्याची घाई करत राहतो. त्यामुळे कष्टी होतो. असे असून सुद्धा, भगवंताचे चिंतन सतत सुरू ठेवले तर वरील मनोरचनेत योग्य परिवर्तन होते आणि सत्य ध्यानी यायला लागते. 

राग कशासाठी आणि कुणावर आणि का? तसेच विचार किंव्हा भावनांचा योग्य वापर कसा असावा, हे जाणून घेणे. परिस्थिती आपल्यावर कशीही येईल...त्यावर आपण काहीच करू शकत नाही. आपण फक्त शांतीने द्यावे आणि चिंतन करावे भगवंताचे.

हरि ओम.

श्री

 श्री 


भगवंताचे चिंतन, किंव्हा नामस्मरण दर क्षणी आत्मसात करावे कारण, विचारांचा भाव अनेक स्वरूपात वावर होत असतो ज्यात मन तिथे गुंतले असते. म्हणजे कधीतरी विचार संकल्पना करेल, नुसते बसेल, कधीतरी ते प्रत्यक्ष गोष्टीना सामोरे जाण्यात मग्न असेल, तर कधीतरी ते परिमाण झाल्यावर त्यावर टीका करेल किंवा त्यात गुंतून राहील. सर्व _विचार परिस्थितीत_ भगवंताचे भान प्रस्थापित व्हायला हवे, कारण सर्व क्षणात त्याच्यातून सर्व हेतू प्रस्थापित होत असतात. म्हणजे "होण्याचे कारण" - मग ती इच्छा असो, की संकल्पना, का प्रत्यक्ष अनुभव, किंव्हा परिणाम - सर्वांना अस्तित्व भाव कारणीभूत ठरते. किंव्हा दुसऱ्या पद्धतीने सांगायचे तर सगळी साखळी, स्तर, स्मरणांचा प्रकार - सर्व भगवंतामध्ये सामावलेले असते. लाट कशीही असू द्यावी, भरती आणि ओहोटी कशीही येऊ द्यावी, चढ उतार कसाही असू द्यावा, प्रत्यक्षात भगवंताचे कार्य चालू असते...आणि म्हणून ह्या सर्व प्रकारच्या _हालचाली होत राहतात_. 

मनाचीही हालचाल असते, वस्तुंसारखी. ही हालचाल अदृश्य असते किंव्हा गूढ असते. त्या हालचालीला - *कार्य* - असेही संबोधले असते. म्हणून मन म्हणजे काय आणि ते कसे होते, हे अध्यात्मातील प्रश्न असतात. 

जीवाच्या पार्श्वभूमीवरुन बघितले, तर जाणीव शुद्ध आणि सूक्ष्म होत राहणे, म्हणजे सर्व हालचालींचा अवाका ध्यानात येणे आणि मन स्थिर होणे. 

हरि ओम.

Tuesday, June 02, 2026

श्री

 श्री 


कुणाला ठामपणे पूर्णतः माहित नसते की आपण इथे का आलो आणि कसे आलो. हा प्रश्न बौद्धिक पातळीच्या आणखीन पलीकडचा आहे, आतून येणारा आहे - जिथून सारे काही उगम पावते आणि चक्रा सारखे प्रस्थापित होते. 

आध्यात्मिक पातळीवरून विचारांचा अर्थ गूढ आहे, जो सूक्ष्मातून, अनेक कार्यांमुळे _उगम_ पावतो, ध्यानात येतो, स्तरातून येतो, साखळीत अवतरतो, बुद्धी, भावना, देह ह्या प्रकारे जाणवतो, भाव आणि स्मरण देतो, व्यवहार करायला लावतो, परिणाम दर्शवतो, चक्रात गुंतवून ठेवतो वगैरे. थोडक्यात तसे पाहिले, तर विचारांना देखील एक _स्वभाव_ आहे, जो भगवंत माध्यमामुळे रूपात साकार होतो. त्या स्वभावाला वेगळेपणाने बघणे, हे आध्यात्मिक मार्गातील महत्त्वाची कामगिरी ठरते जीवाची. 

वेगळेपणाने बघितल्यावर, आपण आणखीन सूक्ष्म असतो आणि मूळ शांती आहोत, हे जाणवते. मग विचारांच्या प्रभावाखाली (तात्पुरतेपण) आपण (जाणीव) राहत नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने शांती लाभते. जाणिवेचे *शुद्ध* स्वरूप म्हणजे *शांती*. 

त्यासाठी भगवंत माध्यमाचे चिंतन जरुरीचे असते.

हरि ओम.


श्री 

लपवणे हा relative भाग झाला. जेवढी आपल्याला परावलंबिक आणि relative गोष्ट जाणवते हेतू न ठेवता, तेवढे शांत आपण होऊ शकतो. इथे relative, परावलंबन, संबंध, एकाच अर्थाने आहे. ह्या वरील विश्लेषणात आपण "गुंतलो", तर त्याचा प्रभाव मनावर होतो आणि सुख - दुःखाची बाधा होते. गुंतू नये, असे कुणी म्हणत नाही. किंबहुना जन्म आहे, तर गुंतणे होणार. 

सांगण्याचे तात्पर्य की आपल्या मनोरचने प्रमाणे _ठराविक गोष्टी_ (गुंतल्यामुळे, संकल्पनेत वावरल्यामुळे, संबंधित राहिल्यामुळे, परावलंबिक असल्यामुळे) ध्यानात येतात आणि तसे स्मरण प्रस्थापित होते. मुद्दा हा आहे, की त्या ठराविक गोष्टीवरून स्वतःला आणि इतरांना आणि अस्तित्वाला आपण पूर्ण अर्थ देण्याचा प्रयत्न करतो आणि इथे आपली चूक होते. 

वरील निर्मिती संपूर्णपणे तात्पुरती असते, म्हणून आपल्या समजुती देखील तात्पुरत्या ठरतात (बदलणाऱ्या, वेगळ्या, संबंधित वगैरे). _ह्यावरून लोकांचे मतभेद होण्यास कारण ठरते_. ज्या लोकांना हे कळते की सर्व निर्मितीची इच्छा आहे, त्यांना ह्या मतभेदात राहण्याची काडीमात्र इच्छा नसते, किंबहुना मतभेदाचे स्थान त्यांच्या लेखी नसते. 

म्हणून लपवण्याच्या प्रवृत्तीतून बरेच काही दर्शनास येते. इतरजण आपल्यापासून काहीतरी लपवतात - त्यावरून स्वतःला लेखण्याची गरज नाही. आपण जसे सूक्ष्म होऊ, तसे आपल्या ध्यानी असे दिसून येईल की खूप लोकं खूप गोष्टी लपवण्याचा आटापिटा करत राहतात आणि आपल्याला दोष देतात की त्यांचे मन आपल्याला ओळखता येत नाही! वास्तविक आपल्या ध्यानात सूक्ष्म स्थिती वावरत असल्यामुळे इतर स्थूल भावनांकडे लक्ष जात नाही. त्याचे काही वाटून घेण्याची गरज नाही आणि आपण उत्तर किंवा स्पष्टीकरण द्यायला बांधील नाही, आणि त्या गोष्टी सांगताही येणार नाही.

हरि ओम.